mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

माजी राष्ट्रपती ‘भारतरत्न’ प्रणव मुखर्जी यांचं वयाच्या 84 वर्षी निधन !

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
माजी राष्ट्रपती ‘भारतरत्न’ प्रणव मुखर्जी यांचं वयाच्या 84 वर्षी निधन !

 

दिल्ली । माजी राष्ट्रपती ‘भारतरत्न’ प्रणव मुखर्जी यांचं निधन झालं आहे. ते 84 वर्षाचे होते. कोरोना आणि वाढत्या वयामुळं त्यांना 10 ऑगस्ट रोजी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आपला कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याबाबत त्यांनी स्वतः ट्विट करून सांगितलं होतं आणि संपर्कात आलेल्यांना टेस्ट करून घेवून आयसोलेट होण्याबाबत देखील त्यांनी आवाहन केलं होतं.  Former President Bharat Ratna Pranab Mukherjee dies at 84

10 ऑगस्टच्या रात्री त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यावेळी त्यांना व्हेंटिलेटर सपोर्ट देण्यात आला होता. शस्त्रक्रिया यशस्वी झाली मात्र व्हेंटिलेटर सपोर्ट कायम ठेवावा लागला होता. 11 ऑगस्ट रोजी हॉस्पीटलनं मुखर्जी यांची प्रकृती क्रिटिकल असल्याचं सांगत ते व्हेंटिलेटरवर असल्याचं स्पष्ट केलं होतं.

प्रणव मुखर्जी हे दीर्घ कोमात गेल्याचं नंतर हॉस्पीटलनं सांगितलं. तेव्हापासून मुखर्जी यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. अखेर आज 31 ऑगस्ट (सोमवार) त्यांचं निधन झालं आहे.

काँग्रेसचे दिग्गज नेता म्हणून राजकीय प्रवास करणारे प्रणव मुखर्जी हे 2012 ते 2017 दरम्यान देशाचे राष्ट्रपती होते. सन 2019 मध्ये त्यांना केंद्र सरकारनं भारत रत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देवुन सन्मानित केलं होतं.


भारतरत्न प्रणव मुखर्जी यांच्याबाबत थोडक्यात 

प्रणव मुखर्जी यांचा जन्म 11 डिसेंबर 1935 रोजी झाला. 1969 मध्ये त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना मुखर्जी यांना राज्यसभेचे खासदारकीचं तिकीट देण्यात आलं. ते राज्यसभेवर खासदार म्हणून निवडले गेले. सन 1973 मध्ये मुखर्जी यांचा केंद्र सरकारच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात समावेश झाला.

सन 1982 ते 1984 दरम्यान ते भारताचे अर्थमंत्री होते. सन 1980 ते 1985 दरम्यान ते राज्यसभेतील लिडर ऑफ हाऊस होते. राजीव गांधी यांच्या नेतृत्वाच्या वेळी मुखर्जी यांना थोडेसे बाजूला सारण्यात आले. त्यावेळी मुखर्जी यांनी स्वतःचा राष्ट्रीय समाजवादी काँग्रेस नावाचा पक्ष स्थापन केला. मात्र, नंतर 1989 मध्ये त्यांनी पुन्हा तो पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. दरम्यान, राजीव गांधी यांच्यानंतर पी.व्ही. नरसिंह राव हे पंतप्रधान झाले.


1991 मध्ये त्यावेळी मुखर्जी यांची नियुक्ती नियोजन आयोगाच्या प्रमुखपदी करण्यात आली. सन 1995 मध्ये मुखर्जी यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली. 2004 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ते पहिल्यांदाच (लोकसभेवर) निवडून आले. त्यावेळी युपीए सत्तेत आलं होतं. त्यानंतर संरक्षण (2004 ते 2006), परराष्ट्र (2006 ते 2009) आणि अर्थ (2009 ते 2012) मंत्रालयाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. ते मंत्रीगटाचे प्रमुख देखील होते.

जुलै 2012 मध्ये प्रणव मुखर्जी यांनी पी.ए. संगमा यांचा पराभव करत राष्ट्रपती पदाची निवडणूक मोठया फरकाच्या मतांनी जिंकली. 5 दशक राजकीय प्रवास केल्यानंतर ते भारताचे 13 वे राष्ट्रपती बनले. 2012 ते 2017 दरम्यान ते भारताचे राष्ट्रपती होते. सन 2019 मध्ये राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजेच ‘भारतरत्न’ देवून गौरविण्यात आले होते.

Former President Bharat Ratna Pranab Mukherjee dies at 84

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Desh-videshLatest NewsMaharashtra Maza

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
महाराष्ट्रात जिल्हांतर्गत वाहतुकीसाठी ई पासची गरज नाही; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्रात जिल्हांतर्गत वाहतुकीसाठी ई पासची गरज नाही; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

पत्नी मेंबर, पतीचा हस्तक्षेप चालणार नाही; पद गमावणार, गुन्हाही दाखल होणार; शासन आदेशाचे पालन आवश्यक; अधिकारीही सतर्क

January 30, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मोठी बातमी! मंगळवेढा नगरपालिकेच्या विषय समित्यांवर ‘या’ पक्षाचे वर्चस्व; सभापतीपदी सुनंदा आवताडेसह यांच्या झाल्या निवडी

January 30, 2026
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मोठी बातमी! जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे मतदान आणि निकाल पुढे ढकलला, तारखेत मोठा बदल; 5 ऐवजी ‘या’ तारखेला मतदान

January 29, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! नुकतेच संसार थाटलेल्या एका तरुण मजुराचा विमानतळावर डोक्यात दगड पडल्याने मृत्यू; सोलापूर विमानतळावर दुर्दैवी मृत्यू हृदय पिळवटून टाकणारा ठरला

January 29, 2026
अश्रूंच्या धारांनी बारामती चिंब! जिथून सुरूवात, तिथेच निरोप; उपमुख्यमंत्री अजितदादांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार; महाराष्ट्रावर शोककळा

अश्रूंच्या धारांनी बारामती चिंब! जिथून सुरूवात, तिथेच निरोप; उपमुख्यमंत्री अजितदादांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार; महाराष्ट्रावर शोककळा

January 29, 2026
मंगळवेढा बाजार समिती निवडणुकीत पहिल्या दिवशी ‘इतके’ अर्ज दाखल, बैठकांचे सत्र सुरू; निवडणूक रंगतदार होणार

शेतकऱ्यांनो! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे मंगळवेढा बाजार समितीतील लिलाव उद्या राहणार बंद; शेतमाल विक्रीस आणू नये

January 28, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा