mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पहिल्या टी२० सामन्यात भारताचा ५ विकेट्सने शानदार विजय; सामन्याचे हायलाईट्स, पाहा व्हिडीओ

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 18, 2021
in राष्ट्रीय
भारताचा लंकेवर 7 गडी आणि 80 चेंडू राखून मोठा विजय; टीम इंडियासमोर श्रीलंकेची हाराकिरी

टीम मंगळवेढा टाईम्स ।

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात काल बुधवारी टी२० मालिकेतील पहिला सामना रंगला. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने निर्धारित २० षटकांत ६ गडी गमावत १६४ धावा केल्या.

मार्क चॅपमन आणि सलामीवीर मार्टिन गप्टिल यांच्या अर्धशतकाच्या जोरावर संघाला या धावसंख्येपर्यंत मजल मारता आली.

प्रत्युत्तरात भारताने ५ विकेट्सच्या नुकसानावर १९.४ षटकात हा सामना जिंकला. यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने खणखणीत चौकार मारत संघाला विजयी शेवट करून दिला.

न्यूझीलंडच्या १६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून सूर्यकुमार यादने सर्वाधिक धावा फटकावल्या.

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत त्याने ४० चेंडूत ६२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तसेच रोहित शर्मानेही कर्णधार खेळी करत संघाच्या विजयात योगदान दिले.

मात्र केवळ २ धावांची त्याचे अर्धशतक हुकले. ३६ धावांवर २ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने त्याने ४८ धावा केल्या.

याव्यतिरिक्त रिषभ पंतनेही २० व्या षटकात धाकधूक वाढवणारी स्थिती निर्माण झाल्यानंतर चौकार खेचत संघाला मालिकेत १-० ने आघाडी मिळवून दिली. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.

तत्पूर्वी न्यूझीलंडकडून गप्टिलने सर्वाधिक ७० धावा केल्या. सलामीला फलंदाजीला येत त्याने ४२ चेंडूंचा सामना करताना संघासाठी ७० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

या खेळीदरम्यान त्याने ४ षटकार आणि ३ चौकार ठोकले. गप्टिलव्यतिरिक्त चॅपमननेही अर्धशतकी खेळी करत संघाला मोठ्या धावसंख्येवर पोहोचवले. त्याने ५० चेंडूंमध्ये २ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने ६३ धावा चोपल्या.

परंतु या दोघांना वगळता न्यूझीलंडच्या इतर फलंदाजांनी मात्र भारताच्या गोलंदाजांपुढे नांग्या टाकल्या. भारताकडून अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि आर अश्विन यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच दिपक चाहर आणि मोहम्मद सिराजनेही एका-एका विकेटचे योगदान दिले.

जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्त्व करेल तर न्यूझीलंडच्या नेतृत्त्वाची धुरा टीम साउथीच्या हातात असेल.

या सामन्यापूर्वी संध्याकाळी ६.६० वाजता उभय संघांमध्ये नाणेफेक झाली असून नाणेफेकीचा कौल भारताच्या पारड्यात पडला आहे. कर्णधार रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली आहे.

या सामन्यातून भारतीय संघाकडून वेंकटेश अय्यरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. तसेच श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज भुवनेश्वर कुमार आणि दीपक चाहर यांचे पुनरागमन झाले आहे.

न्यूझीलंड संघातही ४ बदल करण्यात आले आहेत. जिम्मी नीशम, कायल जेमीसन, ईश सोधी आणि ऍडम मिल्ने यांना बाकावर बसवत मार्क चॅपमन, टॉड ऍस्टल, रचिन रवींद्र आणि लॉकी फर्ग्युसन यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळाली आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: भारत क्रिकेट

संबंधित बातम्या

सोलापूर ग्रामीणमध्ये आज 244 जण कोरोनामुक्त, 223 नवे रुग्ण; वीस वर्षीय तरुणीचा मृत्यू

मोठी बातमी! कोरोनानंतर आता पुन्हा एका आजाराने डोके काढले वर; रुग्णांची संख्या वाढतेय झपाट्याने, गेल्या 24 तासांत…

August 26, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

धक्कादायक! शिक्षिकेने ६ वर्षांच्या विद्यार्थ्याच्या कानशिलात लगावली; पुढच्याच क्षणी चिमुकल्याचा जागीच तडफडून मृत्यू

August 22, 2026
मंगळवेढ्याचा शूर सुपुत्र अमर झाला! श्रीनगरमध्ये कर्तव्य बजावताना जवान वैभव आवताडे यांना वीरमरण; आज रात्री पार्थिव पुण्यात येणार

मंगळवेढ्याचा शूर सुपुत्र अमर झाला! श्रीनगरमध्ये कर्तव्य बजावताना जवान वैभव आवताडे यांना वीरमरण; आज रात्री पार्थिव पुण्यात येणार

August 15, 2026
दारुडा भाऊसाहेब! गटविकास अधिकारी कार्यालयामध्ये ग्रामसेवकाचा दारू पिऊन धिंगाणा; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

मद्यप्रेमींसाठी मोठी बातमी! ओल्ड मॉन्क, आरसीसह ‘या’ दारू ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी; FSSAI ने का उचललं हे पाऊल?

August 4, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले? दिल्लीच्या राजकारणात शरद पवारांची मोठी खेळी

July 23, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय; ‘या’ एका कागदपत्राची सक्ती कायमची रद्द; लाखो विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

June 27, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

भयंकर निष्काळजीपणा! डॉक्टरांच्या अनुपस्थितीत नर्सने केली प्रसूती; निष्पाप माता-बाळाचा बळी, चितेच्या राखेत पुरावा

June 22, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

मोठी बातमी! घरगुती गॅस सिलेंडर आणखी महाग होणार; केंद्र सरकारनं सांगितलं त्यामागचं मोठं कारण..

June 9, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

मोदीजी! सामान्यांनी जगायचं कसं? ​‘अच्छे दिन’ कुठे गेले? महागाईने गाठला उच्चांक; काँग्रेसची महागाई हटवण्यासाठी भाजपला आणले, पण आता जनतेवरच ‘महागाईचा सर्जिकल स्ट्राईक’

June 8, 2026
Next Post
दहावी-बारावीच्या परीक्षा घ्यायचं ठरल! ‘या’ तारखेपासून सुरुवात, परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

विद्यार्थ्यांनो! दहावीच्या परीक्षेचे अर्ज आजपासून ऑनलाइन पद्धतीने भरता येणार; याची घ्या काळजी

ताज्या बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 11, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 10, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा