टीम मंगळवेढा टाईम्स ।
विधान परिषदेच्या सहा जागांसोबत सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक जाहीर करावी या मागणीसाठी अक्कलकोट नगरपालिकेचे विरोधी पक्षनेता अशपाक बळोरगी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
यावर आज सोमवारी सुनावणी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतेच मतदारसंघाची राज्यातील सहा निवडणूक जाहीर केली.
यातून सोलापूर आणि अहमदनगरला वगळण्यात आले. या दोनही मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकूण मतदारांपैकी किमान ७५ टक्के मतदार पात्र नाही.
याबाबतचा अहवाल जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारकडून आल्याचेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले होते. याविरुद्ध जिल्ह्यातील नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य एकत्र आले.
या सदस्यांच्या वतीने अशपाक बळरोगी यांनी केंद्रीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त राज्य सरकारविरुद्ध याचिका दाखल केली.
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर. डी.धानुका आणि न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्यापुढे आज सोमवारी सुनावणी होणार आहे.(स्रोत:लोकमत)
याचिकाकर्त्याचे तीन मुद्दे
सोलापूर जिल्ह्यात सध्या एकूण ८२.८२ टक्के मतदार पात्र आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी चुकीचा अहवाल पाठविला. सध्या १२ नगरपालिका कार्यरत आहेत. यातील तीनवर प्रशासक आहे.
नव्याने जाहीर नगरपालिका, नगरपंचायतीचे मतदार निश्चित नाहीत. केवळ या नगरपालिका व नगरपंचायतींची अधिसूचना जाहीर झाली आहे. याचा विचार जिल्हाधिकाऱ्यांनी केलेला नाही.
जिल्हा प्रशासनाने पाच नव्या नगरपालिका कार्यरत असल्याचे सांगताना या भागातील जिल्हा परिषद सदस्यांचा मतदार म्हणून समावेश केला . त्यामुळे या भागातील लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्याला मतदानाची संधी मिळणार आहे.
जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापतींना मतदानाचा अधिकार आहे . हा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न होतोय. जिल्हा निवडणूक आयोगाने सोमवारी अधिसूचना काढताना यावर विचार करावा. निवडणूक जाहीर करावी.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज