mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

भारतासमोर आज आव्हान मोठ्या विजयाचे; स्कॉटलंडविरुद्धही आक्रमक खेळीची अपेक्षा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 5, 2021
in राष्ट्रीय
दुसऱ्या पर्वात चेन्नईची विजयी सुरुवात; मुंबईचा 20 धावांनी पराभव

टीम मंगळवेढा टाईम्स। 

उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या शक्यता दुसऱ्या संघांवर अवलंबून आहेत, अशा जर-तरच्या परिस्थितीत भारतीय संघ आज शुक्रवारी टी२० विश्वचषकात स्कॉटलंडविरुद्ध मैदानात उतरेल. हा सामना मोठ्या फरकाने जिंकण्याचा भारतीय संघाचा इरादा आहे.

अफगाणिस्तानवर ६६ धावांनी विजय मिळवल्यावर भारतीय संघाचे ही विजयी लय कायम राखण्याचे लक्ष असेल. भारताला या सामन्यात फक्त विजयच गरजेचा आहे नाही, तर नेट रनरेटदेखील सुधारण्याचे आव्हान आहे.

त्यासाठी हा सामना मोठ्या फरकाने जिंकणे आणि दुसऱ्या संघांतील सामन्याचा परिणामदेखील अनुकूल असण्यावर आशा आहे.

पाकिस्तान आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांकडून भारताला मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला. त्यामुळे भारताची धावगतीदेखील खूपच खराब झाली. भारतासाठी आता प्रत्येक सामना करो अथवा मरो, असा असेल.

पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरोधात अपयशी ठरलेल्या भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांना अफगाणिस्तान विरोधात लय सापडली. त्यांनी चांगला खेळ केला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस येण्याच्या वादग्रस्त निर्णयानंतर रोहितने गेल्या सामन्यात पुन्हा डावाची सुरुवात केली.

त्याने शानदार अर्धशतक करत आपला फॉर्म सिद्ध केला. त्याने सामन्यानंतर मान्य केले की, पहिल्या दोन सामन्यांत काही चुका झाल्या.

मात्र, सलग खेळल्याने मानसिक थकव्यामुळे अशा गोष्टी घडतात. रोहित, राहुल, ऋषभ पंत व हार्दिक पांड्या यांनी अफगाणविरुद्ध धावा केल्या. संघात परतलेल्या सूर्यकुमार यादवमुळे संघाची फलंदाजी मजबूत झाली आहे.

त्यासोबतच रवींद्र जडेजाही तळाच्या
क्रमावर उपयुक्त ठरला. गोलंदाजीमध्ये चार वर्षांनी खेळणाऱ्या आश्विनने चार षटकांमध्ये १४ धावा देत दोन बळी घेतले.

निर्धार दणदणीत विजयाचा
पाकिस्तान सलग चार विजयांसोबतच उपांत्य फेरीत पोहोचला आहे आणि न्यूझीलंडदेखील ग्रुप दोनमधून पोहोचण्याची शक्यता जास्त आहे.

अशात न्यूझीलंड जर, नामिबिया किंवा अफगाणिस्तानकडून पराभूत झाला, तर भारतासाठी उपांत्य फेरीची आशा असू शकते. भारतीय संघ सध्या तेच करणार आहे जे, त्यांच्या हातात आहे. विराट कोहली आणि संघाचे लक्ष्य हे स्कॉटलंडला मोठ्या फरकाने पराभूत करण्यावरच असेल.

कर्णधार विराट कोहलीने सामन्यानंतर म्हटले की, आश्विनचे पुनरागमन सकारात्मक राहिले आहे. त्याने त्यासाठी खूप मेहनत घेतली. आयपीएलमध्येही त्याने नियंत्रण आणि लय दाखवली आहे. तो चतुर आणि बळी घेणारा गोलंदाज आहे.

वरुण चक्रवर्ती दुखापतग्रस्त झाल्याने आश्विनला संधी मिळाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दबाव सहन करण्यात त्याचे अपयश समोर आले. त्याची पुढे खेळण्याची शक्यता कमीच आहे.

शमी आणि बुमराह यांनी या सामन्यात चांगली गोलंदाजी केली. स्कॉटलंडचा यष्टीरक्षक मॅथ्यू क्रॉसने न्यूझीलंड विरोधातील सामन्यात म्हटले होते. पूर्ण भारत त्यांचे समर्थन करत आहे.

न्यूझीलंडने स्कॉटलंडला १६ धावांनी पराभूत केले होते. स्कॉटलंड जिंकला असता, तर भारताचा मार्ग सोपा झाला असता. (स्रोत:लोकमत)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: भारत

संबंधित बातम्या

खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

तरुणपणी गोळी झाडली, म्हातारपणी शिक्षा झाली, 85 वर्षीय वृद्धाला 34 वर्षांनी कारावासाची शिक्षा; नेमकं प्रकरण काय?

June 5, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

धडाधड गोळीबार, सहा जणांचा मर्डर! मंगळवेढा तालुक्याच्या शेजारील राज्यात साऊथ सिनेमाला लाजवेल असं मन विचलित करणारं हत्याकांड; रस्ता रक्ताने माखला, हत्येचं कारण समोर

May 30, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

स्कॉर्पिओमध्ये माजी सरपंच, झेडपी सदस्य पत्नी, आई आणि भाचीसह चार जणांना जिवंत जाळलं; पहिल्यांदा अपघाताचा बनाव, पण.. थरकाप उडवणारी घटना समोर

May 29, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

नागरिकांनो! पुढील वर्षभर सोनं खरेदी करू नका, पेट्रोल डिझेल जपून वापरा, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले जनतेला आवाहनं, कारण काय?

May 11, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

पश्चिम बंगालमध्ये सत्ता येताच पीएम मोदींचा मास्टर स्ट्रोक; ‘या’, योजनेला दिली मंजूरी, नागरिकांना होणार मोठा फायदा

May 5, 2026
नागरिकांनो! उद्यापासून देशभरात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार; मोदी सरकारची मोठी घोषणा

बजेट कोलमडणार! पेट्रोल-डिझेलसह गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्याचे संकेत; नव्या दरांची ‘इतक्या’ दिवसांत होणार घोषणा

May 3, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

कामाची बातमी! मोदी सरकारचा 10 हजार रुपये पेन्शन देण्याचा विचार; ‘या’ लोकांना होणार मोठा फायदा

April 24, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

नागरिकांनो! गॅस सिलिंडरसाठी आता नवा नियम, हा नंबर नसेल तर सिलिंडर मिळणारच नाही; वाचा काय गरजेचं?

April 22, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

नागरिकांनो! देशात इंधनाचा तुटवडा नाही, लॉकडाऊनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार; मुख्यमंत्री फडणवीसांचा कडक इशारा

March 29, 2026
Next Post
ठाकरे सरकारला धक्का! मराठा आरक्षणावरील तात्काळ स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल; तडजोडीनंतर ॲट्रॉसिटी खटला होऊ शकतो रद्द

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे इफेक्ट! मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाचा निर्णय, शासकीय यंत्रणा लागली कामाला; ‘हा’ हेल्पलाइन नंबरही जारी

June 5, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

आता खेळ खल्लास! भेसळखोरांविरोधात तुकाराम मुंढे आक्रमक; शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय

June 5, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

शेतकऱ्यांनो! आधी ‘ही’ रक्कम बँकेत भरावी लागणार; मगच मिळणार कर्जमाफी व नवीन पीककर्ज

June 5, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

तरुणपणी गोळी झाडली, म्हातारपणी शिक्षा झाली, 85 वर्षीय वृद्धाला 34 वर्षांनी कारावासाची शिक्षा; नेमकं प्रकरण काय?

June 5, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

धक्कादायक! स्त्री रोगतज्ञ डॉक्टर लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात; 4500 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं

June 4, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

समृद्ध पंचायतराज अभियानात मंगळवेढ्यातील ‘या’ गावची छाप; जिल्हास्तरीय मूल्यमापन समितीकडून विकासकामांची पाहणी

June 5, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा