टीम मंगळवेढा टाईम्स।
दारूच्या नशेत पायावर लघुशंका केल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून धारदार वस्तूने गणेश वायकुळे याच्या हाताच्या पोटरीवर वार करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी
सुहास(बापू) ज्ञानेश्वर कलुबर्मे (रा.जगदाळे गल्ली) व ऋषिकेश भागवत चौगुले(रा.उमदी ता. जत) या दोघांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील जखमी तथा फिर्यादी गणेश वायकुळे (वय 20,जगदाळे गल्ली) हा दि.26 रोजी रात्री 11.30 च्या
दरम्यान तो व त्याचा मित्र लखन बाळू चौगुले कामावरून घराकडे जात असताना जगदाळे गल्लीत आल्यावर वरील आरोपीने मोटर सायकलवर येवून दारूच्या नशेत लखन याच्या पायावर लघुशंका केली.
वरील आरोपीला पलिकडे लघुशंका कर असे म्हणाल्याने त्याने चिडून फिर्यादी व त्याचा मित्र लखन यास शिवीगाळ करून हाताने मारहाण करून त्यांच्या जवळील कोणत्या
तरी धारदार वस्तूने फिर्यादीच्या उजवे हाताचे पोटरीवर वार करून निघून गेले असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज