टीम मंगळवेढा टाइम्स।
शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिक्षक बांधवांचे जिव्हाळ्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिक्षक समितीने सातत्यपूर्ण पाठपुरावा करुन अनेक विषय मार्गी लावले असून उर्वरित प्रश्नांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही शिक्षक समितीचे माजी राज्य संपर्क प्रमुख सुरेश पवार यांनी दिली.
शिक्षक समिती सांगोला तालुका शाखेच्या वतीने आयोजित गुणगौरव सत्कार सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
यावेळी पवार यांनी शिक्षक समितीने भविष्य निर्वाह निधीची प्रक्रिया सुलभ करणे, एन.पी.एस.हिशोब , मार्च 96 मधील शिक्षकांची वेतन निश्चिती , कोविड कामांतून शिक्षकांना न्याय ,
सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांना वेळेवर निवृत्ती लाभ मिळावा यासाठी एस.ओ.पी.प्रणाली, स्वच्छ व सुंदर शाळा योजनेच्या अनुषंगाने समन्वयाची भूमिका , मुख्याध्यापक पदोन्नती व दिव्यांग बांधवांचा अनुशेष ,
महसुलच्या धर्तीवर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सोयी सुविधा , बी.एल.ओ मानधन, शिक्षण संचालक यांचे मार्फत CSRF फॉर्म भरणेबाबत लेखी मार्गदर्शन,स्थायित्वाचा लाभ,हिंदी भाषा सूट ,
वैद्यकीय देयकांसाठीच्या आजार यादीत कोरोनाचा समावेश असे अनेक विषय मार्गी लावले असून प्रलंबित मेडिकल बिले,1988 च्या शिक्षकांचे सेवासातत्य , जिल्हा स्तरावरुन थेट शिक्षकांच्या खात्यात वेतन जमा करण्यासाठी
सी.एम.पी. प्रणाली राबविणे, निवडश्रेणी या प्रश्नांसाठी पाठपुरावा करण्यात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी व्यासपीठावर शिक्षक समितीचे नेते राजेंद्र नवले , जिल्हाध्यक्ष अनिल कादे, अमोघसिद्ध कोळी , सुनिल कोरे , दत्तात्रय पोतदार , एकनाथ जावीर , भारत लवटे, हमजूभाई मुलाणी,सिंहगड इन्स्टिट्युटचे अशोक नवले, केंद्रप्रमुख बाळासाहेब इंगवले इ.प्रमुख मान्यवर उपस्थित होते .
यावेळी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष अनिल कादे यांनी सांगोला तालुका ही शिक्षक समितीची राजधानी असून संघटना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे गेली ६० वर्षे शिक्षक समितीने सर्वसामान्य शिक्षक व महिला भगिनींचा विश्वास संपादन केल्याचे गौरवोदगार काढले.
आजच्या गुणीजनांच्या गौरव सोहळ्यातून मिळणाऱ्या प्रेरणेमुळे तालुक्याच्या गुणवत्ता वाढीला चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली . यावेळी साहित्यिक संतोष जगताप , जुनी पेन्शन हक्क संघटनेचे प्रतिनिधी कृष्णा पवार , धनंजय धबधबे , धनाजी खंडागळे यांचाही निवडीबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी गुणवंत विद्यार्थी , नूतन मुख्याध्यापक तसेच निबंध व स्वच्छ – सुंदर शाळा पुरस्कार योजनेतील यशस्वी शाळा व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी श्रीमती राजश्री कोरे , वनिता जाधव, आण्णासो लेंडवे , रायबाण सर यांनी गौरवमूर्तींच्या वतीने मनोगते व्यक्त केले.
शिक्षक समिती महिला आघाडीच्या जिल्हा प्रतिनिधी म्हणून अंबिका शिंदे , सुनिता खंकाळ यांच्या निवडी करण्यात आल्या.त्यांना जिल्हाध्यक्ष अनिल कादे, सरचिटणीस अमोघसिद्ध कोळी यांच्या हस्ते गौरव करुन नियुक्ती पत्रे देण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्तविक शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष भारत लवटे यांनी केले . तर उपस्थितांचे स्वागत भागवत भाटेकर,मुरलीधर गोडसे , संजय बनसोडे ,सचिन चांडोले, प्रमोद इंगोले, राहुल चंदनशिवे, बशीर मुलाणी, राजेंद्र माने ,
आनंदा बामणे , राजाराम बनसोडे ,श्रीमती नयना पाटील ,अलका कोल्हे, सरला खाडे, शारदा सरगर, सुवर्णा पाटील यांनी केले .सूत्रसंचालन सिताराम बुरांडे , संतोष कांबळे यांनी केले तर आभार सरचिटणीस भागवत भाटेकर यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक समितीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.यावेळी तालुक्यातील शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज