सोलापूर । मारहाण , दादागिरी , जागा हडपणे , बेकायदा सावकारी अशा गंभीर गुन्ह्यातून नागरीकांना त्रास देणाऱ्या डी.के. सामाजिक संघटनेचा संस्थापकाला शहर पोलीस आयुक्तालयाने एमपीडीए अंतर्गत कारवाई करून मंगळवार दि.१ सप्टेंबर २०२० रोजी पुण्याच्या येरवाडा कारागृहात रवानगी केली.
दशरथ मधुकर कसबे ऊर्फ डी . के . ( वय ४५ , रा . मुकुंद नगर , भवानी पेठ , सोलापूर ) असे सराईत गुन्हेगाराचे नाव आहे . त्याच्या विरूध्द फौजदार चावडी पोलीस ठाणे मध्ये त्याच्या विरूध्द गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत तसेच जोडभावी पेठ पोलीस ठाण्यामध्ये गंभीर स्वरूपाचे १ ९ गुन्हे दाखल आहेत.
यापूर्वी सन २००४ आणि सन २०१६ मध्ये दोन वेळा त्याच्या विरूध्द एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली होती परंतु त्याच्या वर्तनामध्ये सुधारणा होत नाही असे दिसून आले त्याच्या विरूध्द पुन्हा सन २०२० मध्ये खाजगी सावकारी करून कर्जदाराला खंडणी मागून त्याला जीवे मारण्याची धमकी देवून शारीरीक व मानसिक त्रास दिला हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे.
त्यावरून त्याच्या वर्तनामध्ये सुधारणा होत नाही हे पाहून पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी त्याच्या विरूध्द एमपीडीए अंतर्गत स्थानबध्दतेची कारवाई केली आहे . त्याला मंगळवार दि. १ सप्टेंबर रोजी स्थानबध्द करून येरवाडा तुरुगांत पाठवण्यात आले असल्याचे पोलीस आयुक्तालयाकडून सांगण्यात आले.
MPDA’s action against Dashrath Kasbe, a notorious criminal from Solapur, for the third time
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज