mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढयाचे प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांची बदली; अप्पासाहेब समिंदर नवे प्रांताधिकारी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 18, 2021
in मंगळवेढा, राज्य, सोलापूर
मंगळवेढयाचे प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांची बदली; अप्पासाहेब समिंदर नवे प्रांताधिकारी

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा व सांगोल्याचे प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांची विशेष भूसंपादन अधिकारी उस्मानाबाद येथे बदली झाली असून त्यांच्याजागी आप्पासाहेब समिंदर हे रुजू होणार आहेत.

आप्पासाहेब समिंदर अन्नधान्य वितरण अधिकारी सोलापूर येथे कार्यरत होते.

कोण आहेत अप्पासाहेब समिंदर

मंगळवेढा येथील सिमोल्लंघनाचे रितसर निमंत्रण देण्यास गेलेल्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या समोर उद्धट वर्तन करून धार्मिक भावना दुखावाणाऱ्या तत्कालीन तहसीलदार आप्पासाहेब समिंदर यांनी झाल्या प्रकरणी प्रांत अधिकारी यांच्यासमोर माफी मागीतली होती. त्यामुळे या प्रकरणावर पडदा पडला होता.

एकविरा माळावरील सिमोलंघनाचा तहसीलदारांचा मान असल्याने याचे निमंत्रणाची तहसीलदारांच्या हातात पत्रिका दिली असता असल्या फालतू प्रथा बंद करा, मी कार्यक्रमाला येणार नाही. त्यावेळेस वरिष्ठ अधिकार्‍यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता.

तरीही त्यांना न जुमानता आपला तोरा कायम ठेवत कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे मंडळ अधिकार्‍याकडून पुजा उरकून घ्यावी लागली होती.

तत्कालीन तहसिलदार अप्पासाहेब समिंदर यांनी 350 वर्षाच्या प्रथेला गालगोट लावून तमाम मंगळवेढेकरांच्या धार्मिक भावना दुखावल्या म्हणून त्यांना बडतर्फ करावे अन्यथा मंगळवेढेकरांसमवेत तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा सर्व पक्षीय कार्यकर्त्यानी दिला होता.

भीमा नदीच्या पात्रातून ओव्हरलोड वाळू वाहतूक केल्याप्रकरणी एंट्री न दिल्यामुळे केलेल्या कारवाईत आप्पासाहेब समींदर यांना दंड आकरण्यात आला होता.

हा दंड भरताना हिशोबात अढलेल्या विसंगतीमुळे मंगळवेढयाचे तहसीलदार आप्पासाहेब समींदर यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी तालुक्यातील कागष्ट येथील विजय भोसले यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाव्दारे केली होती.

वाळू उपशातील कारवाईकडे दुर्लक्ष केल्यामुळे यापूर्वीच्या तहसिलदारावर निलबंनाची कारवाई करण्यात आली असताना भोसले यांच्या तक्रारीमुळे मंगळवेढ्याचे तहसिलदार पुन्हा चर्चेत आले होते.

उदयसिंह भोसले यांच्या बदलीचे कारण

प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी मंगळवेढा येथील राष्ट्रीय महामार्ग क्र.166 भूसंपादनचे कामकाजात जमिनीचा मोबदला देण्यास टाळाटाळ केली तसेच मोबदला अदा करण्याच्या अनुषंगाने अनियमितता झाल्याने सदर महामार्ग पूर्ण होण्यास विलंब होत आहे.

राष्ट्रीय महामार्ग 166 भूसंपादन त्या अनुषंगाने आदा  करावयाच्या मोबदला बाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे सव्वीस प्रकरणी गंभीर तक्रारी प्राप्त झाल्या असून त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी उप विभागीय अधिकारी मंगळवेढा यांच्याकडून सहा महिन्यापूर्वी अहवाल खुलासा मागूनही त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अद्याप खुलासा सादर केला नाही.

ती वस्तुस्थिती विचारात घेता महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 च्या कलम 4(5) मधील तरतुदीनुसार उदयसिंह भोसले यांची सार्वजनिक सेवेच्या हितार्थ व प्रशासकीय सोयीच्या कारणास्तव त्यांच्या त्यांची बदली करण्यात येत असल्याचे आदेशात म्हंटले आहे.

राज्याच्या महसूल विभागाने राज्यातील 19 उपजिल्हाधिकारी यांच्या बदल्या केल्या त्यामध्ये सोलापूर महसूल उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्याकडे पंढरपूर प्रांताधिकारी म्हणून पदस्थापना मिळाली आहे तर अन्नधान्य वितरण अधिकारी आप्पासाहेब समिंदर यांना मंगळवेढ्याचा प्रांत अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे तसेच पुनर्वसन विभागाच्या उपजिल्हाधिकारी मोहिनी चव्हाण यांचीही बदली करण्यात आली असून त्यांना सांगली जिल्ह्यात महसूल उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे .

विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांची भंडारा निवासी उपजिल्हाधिकारी पदावर नियुक्ती झाली आहे, मंगळवेढ्याचे प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांची नियुक्ती उस्मानाबाद जिल्ह्यात विशेष भू संपादन अधिकारी म्हणून करण्यात आली आहे.

त्याचबरोबर महसूल विभागाने राज्यातील 14 तहसीलदारांच्या बदल्या केल्या असून त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील मंद्रूपच्या अप्पर तहसीलदार उज्वला सोरटे यांची बदली झाली आहे त्यांना सातारा या ठिकाणी स्थावर व्यवस्थापक राज्य शेती महामंडळ पदी नियुक्ती देण्यात आली आहे.

सोलापुरातील करमणूक कर शाखेचे बाळासाहेब शिरसाट यांची अक्कलकोट तहसीलदार पदी नियुक्ती करण्यात आली आहे तसेच लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे तहसीलदार प्रदीप शेलार यांची बदली अमरावती या ठिकाणी झाली असून त्यांच्या जागेवर पुणे येथून सोनाली मेटकरी या येत आहेत. मोहोळचे नायब तहसीलदार राजकुमार लिंबारे यांची पदोन्नती झाली असून ते तहसीलदार झाले आहेत. प्रशांत बेडसे यांची मोहोळच्या तहसीलदार पदी नियुक्ती झाली आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अप्पासाहेब समिंदरप्रांताधिकारीमंगळवेढा

संबंधित बातम्या

कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

बाबो..! कुत्र्याने कोंबडी पळवल्यावरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी; चौघांवर गुन्हा; कोंबडीच्या मागे कुत्रे लागल्यावरून चौघांकडून मारहाण

August 25, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

सावधान! बचत गट अन् भिशीच्या नावाखाली अडीच कोटींची फसवणूक, तिघांवर गुन्हा; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

August 25, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी फडणवीस सरकारला मुदत दिली; मागण्या पूर्ण न झाल्यास ‘या’ तारखेपासून उपोषण सुरू करणार

August 25, 2026
हुलजंतीत ‘कृष्णा महिला पतसंस्थेच्या’ नवीन शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा; १०० दिवसांच्या ठेवीवर १०% व्याजाची ‘शुभारंभ योजना’ लागू

हुलजंतीत ‘कृष्णा महिला पतसंस्थेच्या’ नवीन शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा; १०० दिवसांच्या ठेवीवर १०% व्याजाची ‘शुभारंभ योजना’ लागू

August 24, 2026
कोरोनाचे संकटामुळे राज्यसेवा पुर्व परिक्षा पुन्हा पुढे ढकलली

कोचिंग क्लासेसवर येणार कडक निर्बंध; महाराष्ट्र सरकार लावणार शिस्त; दिवसाला ५ तासांची मर्यादा; ‘इतक्या’ वर्षांखालील मुलांना प्रवेश मनाई, शुल्कवाढीलाही लगाम

August 25, 2026

शाळेत ‘तालिबानी’ कृत्य! शिक्षकाने लाकडी पट्टी अन् बुक्क्यांनी मुलाला तुडवले, २६ दिवसांनंतर अखेर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील घटना

August 24, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! ग्रामपंचायतीत जाऊनही ग्रामसेवक भेटत नाही? राज्य सरकारने गुपचूप घेतला ‘हा’ मोठा निर्णय; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

August 24, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंना नार्वेकरांकडून ‘राजकीय बूस्टर डोस’; आवताडे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण

August 23, 2026
शेतकर्‍यांना एफआरपीनुसार उसाची बिले दिली नाहीत; सोलापूर जिल्ह्यात ‘हे’ कारखाने रेड झोनमध्ये

साखरेचा भाव वाढला, मग उसाचा का नाही? शेतकऱ्याच्या घामाला योग्य किंमत मिळावी; प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष राकेश पाटील यांचा खरमरीत सवाल

August 23, 2026
Next Post
स्वाभिमानी छावाच्या वर्धापनदिनानिमित्त मंगळवेढ्यात आज मोफत नेत्ररोग तपासणी शिबीर

स्वाभिमानी छावाच्या वर्धापनदिनानिमित्त मंगळवेढ्यात आज मोफत नेत्ररोग तपासणी शिबीर

ताज्या बातम्या

कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

बाबो..! कुत्र्याने कोंबडी पळवल्यावरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी; चौघांवर गुन्हा; कोंबडीच्या मागे कुत्रे लागल्यावरून चौघांकडून मारहाण

August 25, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

सावधान! बचत गट अन् भिशीच्या नावाखाली अडीच कोटींची फसवणूक, तिघांवर गुन्हा; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

August 25, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी फडणवीस सरकारला मुदत दिली; मागण्या पूर्ण न झाल्यास ‘या’ तारखेपासून उपोषण सुरू करणार

August 25, 2026
हुलजंतीत ‘कृष्णा महिला पतसंस्थेच्या’ नवीन शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा; १०० दिवसांच्या ठेवीवर १०% व्याजाची ‘शुभारंभ योजना’ लागू

हुलजंतीत ‘कृष्णा महिला पतसंस्थेच्या’ नवीन शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा; १०० दिवसांच्या ठेवीवर १०% व्याजाची ‘शुभारंभ योजना’ लागू

August 24, 2026
कोरोनाचे संकटामुळे राज्यसेवा पुर्व परिक्षा पुन्हा पुढे ढकलली

कोचिंग क्लासेसवर येणार कडक निर्बंध; महाराष्ट्र सरकार लावणार शिस्त; दिवसाला ५ तासांची मर्यादा; ‘इतक्या’ वर्षांखालील मुलांना प्रवेश मनाई, शुल्कवाढीलाही लगाम

August 25, 2026

शाळेत ‘तालिबानी’ कृत्य! शिक्षकाने लाकडी पट्टी अन् बुक्क्यांनी मुलाला तुडवले, २६ दिवसांनंतर अखेर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील घटना

August 24, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..