समाधान फुगारे । मंगळवेढा शहरात व ग्रामीण भागात कोरोनाचा हाहाकार माजवला असून आज शहरातील एका 72 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर आज आणखी 20 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या 539 वर गेली आहे.
आज दि.4 सप्टेंबर रोजी 21 जणांचे स्वब ( RT – PCR ) कोरोना चाचणी अहवाल तपासणी कामी घेणेत आलेले आहेत. तसेच आज 287 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट घेण्यात आलेल्या आहेत. Eleven victims of Corona on mangalwedha, a 72-year-old woman from the city died
वरील 287 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट पैकी पॉझिटिव्ह – 14 आणि निगेटिव्ह – 273 जणांचे अहवाल आलेले आहेत. सदरचे नागरिक हे मंगळवेढा 7 , चोखामेळानगर 2 , दामाजीनगर 2 , खुपसंगी 1 , मानेवाडी 2 येथील आहेत.
सोलापूर येथे पाठविणेत आलेले स्वब ( RT – PCR ) चे 6 पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. सदरचे नागरिक हे डिकसळ 5 , मानेवाडी 1 येथील रूग्णांच्या निकटतम संपर्कातील आहेत.
मंगळवेढा तालुक्यात आतापर्यंत 539 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 332 रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आता पर्यंत 196 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आत्तापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे.
नागरिकांची योग्य ती काळजी घेत प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
Eleven victims of Corona on mangalwedha, a 72-year-old woman from the city died
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज