टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा पोलिस ठाण्याकडील सहा पोलिस कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या झाल्या असून यामध्ये एक महिला व पाच पुरुष यांचा समावेश असून अदयाप कार्यमुक्तीचा आदेश न दिल्याने हे कर्मचारी सध्या कार्यमुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत.
मंगळवेढा पोलिस ठाण्याकडून बदलून गेलेले कर्मचारी व ठिकाण पुढीलप्रमाणे :-
गोपनीय विभागाचे पोलिस हवालदार राजकुमार ढोबळे ( पंढरपूर ग्रामीण ) , दत्तात्रय तोंडले ( पंढरपूर तालुका पोलिस स्टेशन ) , पोलिस नाईक वर्षा बंडगर ( पंढरपूर ग्रामीण ) , भोजलिंग भोसले ( करकंब ) , पोलिस शिपाई नागनाथ गायकवाड ( पोलिस मुख्यालय)
या आदी कर्मचाऱ्यांचा कार्यकाल मंगळवेढा पोलिस ठाण्याकडील पाच वर्षे पूर्ण झाल्याने पोलिस अधिक्षक तेजस्वीनी सातपुते यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदलीचे आदेश काढले आहेत.
यापुर्वी महिला पोलिस नाईक अंबाक्का कोष्टी , पोलिस हवालदार दत्तात्रय तोंडले , पोलिस नाईक वंदना अहिरे या तीघांना तत्कालीन डी.वाय.एस.पी.दत्तात्रय पाटील यांच्या कार्यकाळात सहा महिन्याची मुदतवाढ मिळाली होती.
मुदत संपल्याने कर्मचार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मोहोळ येथून महिला पोलिस हवालदार शबनम शेख या नव्याने मंगळवेढा पोलिस ठाण्याकडे दाखल झाल्या आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज