टीम मंगळवेढा टाईम्स ।
कर्नाटक राज्यातून मंगळवेढा मार्गे इचलकरंजी ( जि.कोल्हापूर ) कडे अवैधरित्या टेंपोमधून जाणारा 16 लाख 20 हजार रुपये किमतीचा गुटखा मंगळवेढयाच्या उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील यांनी आज पहाटे पाच वाजता पकडला.
वाहनचालक फजल सरदार मोमीन (वय 30) व त्याचा जोडीदार अमोल आप्पासाो शिंदे (वय 20 दोघे रा.इचलकरंजी),राजेश पांडव (हातकणंगले),बाबासाो आण्णा कांबळे वाहनमालक(रा.गोंदवले जि.सातारा) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची हकिकत अशी, कर्नाटक राज्यातील चडचणहून दि.2 च्या पहाटे चार वाजता एका टेंपोत अवैधरित्या गुटखा येत असल्याची गोपनीय माहिती मंगळवेढयाच्या उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील यांना मिळताच त्यांनी पोलिस नाईक अभिजीत साळुंखे,वाहनचालक वाघमारे यांच्या मदतीने मंगळवेढा शहरातील रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ सापळा लावला असता पहाटे पाच वाजता एम एच 11 बी एल 3358 हा टेंपो मंगळवेढयाच्या दिशेने येत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले.
डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील यांनी टेंपो चालकास इशारा करून तो थांबविला.व गाडीच्या चालकाचे नाव विचारले असता फजल मोमिन व त्याचा जोडीदार अमर शिंदे अशी नावे सांगण्यात आली.
पोलिस अधिकार्यांनी टेंपोची तपासणी केली असता त्यामध्ये मिनरल पाण्याचे बॉक्स एक लाईन व त्या पाठीमागे खाकी रंगाच्या बॉक्समध्ये आर एम डी गुटखा ठेवल्याचे निदर्शनास आले.
यामध्ये आर एम डी पान मसाला 1000 पाकिटे,व सुगंधी तंबाखू 1000 पाकिटे असा 10 लाख 20 हजार रुपये किमतीचा गुटखा असल्याचे तपासात उघड झाले.पोलिसांनी गुटख्यासह 6 लाखाचा टेंपोही जप्त केला आहे.
सदरचा गुटखा हा राजेश पांडव (रा.हातकणंगले) यांच्या सांगणेवरून घेवून जात असल्याचे तपासात उघड झाले आहे.दरम्यान,राज्यामध्ये तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी युवा पिढी बरबाद होवू नये हा उदात्त हेतू ठेवून संपूर्ण राज्यात गुटखाबंदी लागू केली आहे.
मात्र कर्नाटक राज्यातील चडचण येथे त्याची खुले आम विक्री होत असल्याने सर्रास मंगळवेढयातून गुटख्याची वाहतूक होत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास येत आहे.गुटख्यावर कारवाई करण्यासाठी अन्न भेसळ प्रशासनास अधिकार दिले
असतानाही हे अधिकारी सोलापूरात बसून का पहात असल्याने गुटख्याचा पुरवठा व राजरोसपणे विक्री होत असतानाही त्यांच्या आशीर्वादामुळे आर.आर.पाटील यांनी तरूणांसाठी केलेली ध्येयपुर्ती पूर्ण होत नसल्याचे ज्येष्ठ नागरिकांमधून बोलबाला सुरु आहे.
मंगळवेढयासाठी अन्न भेसळ प्रशासनाने अधिकारी नेमले असतानाही ते इकडे फिरकत नसल्याने गुटखा व्यवसाय बोकाळत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज