mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

एकेकाळी कॉंग्रेसमध्ये माझ्या शब्दाला किंमत होती, आता किती किंमत आहे माहित नाही; माजी मुख्यमंत्र्यांचं खळबळजनक वक्तव्य

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 30, 2021
in राज्य, सोलापूर
सोलापुरात राष्ट्रवादीला मोठा धक्का ‘या’ बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

टीम मंगळवेढा टाईम्स ।

सध्याच्या काळात काँग्रेसची वैचारिक परंपरा लयाला जात आहे. एकेकाळी पक्षात माझ्या शब्दाला किंमत होती. पण आता ती राहिली आहे का माहिती नाही, अशी खंत माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली.

ते मंगळवारी इंदापूर येथील कार्यक्रमात बोलत होते. काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमासाठी आज माजी केंद्रीय गृहमंत्री,माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे इंदापूर मध्ये आले होते.

यावेळी कार्यक्रमाच्या व्यासपीठावर भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे देखील उपस्थित होते.यावेळी सुशीलकुमार यांनी पक्षाच्या सद्यस्थितीविषयी खंत व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.

१९७४-७५ च्या काळात काँग्रेसची वैचारिक शिबीरे भरवली जात होती. त्यामध्ये चुकीच्या धोरणांमध्ये सुधारणा केली जात असे. मात्र, सध्या तसे घडताना दिसत नाही. आम्ही नक्की कुठे आहोत, हे पाहणे अवघड झाले आहे.

काँग्रेसची ही वैचारिक परंपरा संपत चालल्याची खंत सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली. तसेच आपल्या शब्दाला पक्षात पूर्वीइतकी किंमत उरली आहे किंवा नाही, अशी साशंकताही त्यांनी बोलून दाखविली. त्यांच्या या वक्तव्याचे आता कशाप्रकारे राजकीय पडसाद उमटणार, हे पाहावे लागेल.

गेल्या काही दिवसांपासून राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसमध्ये अनेक अंतर्गत घडामोडी सुरु आहेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांचा विरोध आहे. पक्षातील २३ ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल करण्याची गरज व्यक्त केली होती.

तर दुसरीकडे राज्य पातळीवर महाविकासआघाडी सरकारमध्ये असलेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाची भाषा सुरु केली आहे. त्यामुळे महाविकासआघाडी सरकार अस्थिर होण्याची चिन्हे दिसत आहेत.

सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्याचा रोख नक्की कोणत्या दिशेने होता, याविषयी सध्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: काँग्रेससुशीलकुमार शिंदे

संबंधित बातम्या

धक्कादायक! मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 20 जण कोरोनामुक्त

खळबळजनक! पंढरपुरातील ॲसिड हल्ला प्रकरणाला नवं वळण; तरुणीचा धक्कादायक खुलासा

April 14, 2026
जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

भगीरथदादा आता प्रवास पुरे! ‘पक्षांतराचा प्रवास आता थांबवा’; सिद्धाराम म्हेत्रेंचा भगीरथ भालकेंना रोखठोक सल्ला

April 13, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

काळीज पिळवटून टाकणारी घटना! शेततळ्यात बुडून बहीण-भावाचा अंत; आजीसमोरच काळाचा घाला; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

April 14, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

बापरे..! सोलापुरातील वकिलास जीएसटीची १२१ कोटी दंडाची नोटीस; काय आहे नेमके प्रकरण?

April 12, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

अनिल सावंत ‘स्वगृही’ तर भालके ‘नाथांच्या’ चरणी; मंगळवेढा-पंढरपूरच्या राजकारणात ‘विठ्ठल’ कोणाला पावणार?

April 12, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! मंगळवेढ्यात सख्खा भाऊच बनला ‘यमदूत’; कुऱ्हाडीच्या एका वाराने होत्याचे नव्हते झाले; खुनामागचं खरं कारण वाचून अंगावर येईल काटा

April 11, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

मंगळवेढ्यात राजकीय धमाका! अनिल सावंतांचे ‘शिवबंधन’; कार्यकर्त्यांच्या अनेक वर्षांच्या इच्छेची पूर्ती होणार

April 10, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

कामाची बातमी! ‘या’ परवानग्यांचे अधिकार आता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय

April 9, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढ्याच्या विकासासाठी ३ कोटी ४७ लाखांचा निधी मंजूर; आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांना मोठे यश; ‘या’ कामांना मिळणार गती

April 8, 2026
Next Post
यंदाही गणरायाची प्रतिष्ठापना, विसर्जनाच्या मिरवणुकांनावर कोरोनाचे विघ्न; सरकारचे निर्बंध जारी

यंदाही गणरायाची प्रतिष्ठापना, विसर्जनाच्या मिरवणुकांनावर कोरोनाचे विघ्न; सरकारचे निर्बंध जारी

ताज्या बातम्या

धडपड गावासाठी! सामाजिक कार्यकर्ते नागराज व्हनवटे यांच्याकडून जयंतीनिमित्त गावाला ‘बाकडे’ भेट; पुणे येथे कार्यरत असूनही जपली गावाची नाळ

धडपड गावासाठी! सामाजिक कार्यकर्ते नागराज व्हनवटे यांच्याकडून जयंतीनिमित्त गावाला ‘बाकडे’ भेट; पुणे येथे कार्यरत असूनही जपली गावाची नाळ

April 14, 2026
धक्कादायक! मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 20 जण कोरोनामुक्त

खळबळजनक! पंढरपुरातील ॲसिड हल्ला प्रकरणाला नवं वळण; तरुणीचा धक्कादायक खुलासा

April 14, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात हुंड्यासाठी सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, सासू, दीर, सासर्‍यांविरोधात गुन्हा दाखल

आम्हाला मुलगाच हवा होता! पोटच्या लेकीला आणि सुनेस ठरवले ‘पांढऱ्या पायाची’; उपाशी ठेवून काढले घराबाहेर; मंगळवेढ्यात सासरच्यांचा अमानुष छळ; पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

April 14, 2026
जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

भगीरथदादा आता प्रवास पुरे! ‘पक्षांतराचा प्रवास आता थांबवा’; सिद्धाराम म्हेत्रेंचा भगीरथ भालकेंना रोखठोक सल्ला

April 13, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

काळीज पिळवटून टाकणारी घटना! शेततळ्यात बुडून बहीण-भावाचा अंत; आजीसमोरच काळाचा घाला; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

April 14, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

मंगळवेढेकरांची प्रतीक्षा आता संपणार ! महात्मा बसवेश्वर स्मारकाची जागा निश्चित; निधी कमी पडू देणार नाही; आमदार समाधान आवताडेंची ग्वाही

April 13, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा