mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढ्यातून भरदिवसा मोटारसायकलची चोरी; घरफोडी, मोटारसायकल चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ; ‘या’ ठिकाणी झाल्या चोऱ्या

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 9, 2021
in मंगळवेढा, क्राईम
मंगळवेढ्यातून भरदिवसा मोटारसायकलची चोरी; घरफोडी, मोटारसायकल चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ; ‘या’ ठिकाणी झाल्या चोऱ्या

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा शहरातून भरदिवसा मोटारसायकल चोरी होण्याच्या प्रमाणात वाढ होत असून आज सकाळी मंगळवेढा-पंढरपूर रोडवरील बायपास येथे लावण्यात आलेली बुलेट चोरीला गेली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जयदीप रत्नपारखी हे आज सकाळी 5.50 ते 6.20 च्या दरम्यान (बुलेट क्रं. एम.एच.13.डी. एन. 8081) ही मोटारसायकल घाडगे कलेक्शन समोरील रोडवर लावून व्यायामासाठी जयदीप रत्नपारखी गेले असता तिथून ती चोरी करण्यात आली आहे.

निळ्या रंगाची असलेली बुलेट कुणास आढळल्यास 7720930008 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन रत्नपारखी यांनी केले आहे.

हुलजंती येथे घरफोडी १ लाख १७ हजारांचा मुद्देमाल लंपास

मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथील रेशनदुकानदार धोंडाप्पा कृष्णा भोरकडे (वय ४०) यांच्या घराच्या कपाटाचे लॉकरमध्ये ठेवलेले २५ हजार रुपये किमतीचे एक तोळयाचे गंठण, २५ हजार रुपये किमतीचे कानातील झुबे व बदाम , १२५०० रुपये किमतीच्या ठुशी , १२५०० रुपये किमतीचे कानातील धडकन , रोख रक्कम २२ हजार रुपये असा एकूण ९७ हजार रुपयांच्या मुद्देमालाची चोरी झाली आहे.

तसेच हुलजंती येथील नानासाहेब गोपाळ चोपडे यांच्या हॉस्पीटलचे बंद दरवाजाचे कुलूप कोयंडा तोडून आत प्रवेश करून २० हजार रुपयांची चोरी झाली आहे.

भोरकडे यांचा ९७ हजार तर डॉ.चोपडे यांची २० हजार असा एकूण १ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरांनी पळविला आहे.अज्ञात चोरटयाविरोधात भा.द.वि. सं.कलम ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक सत्यजीत आवटे हे करीत आहेत.

नंदूर येथे ६० हजार रुपयांच्या मुद्देमालाची चोरी

मंगळवेढा तालुक्यातील नंदूर येथे अज्ञात चोरटयाने घराचे दरवाजाचे कुलूप तोडून ६० हजार रुपयांचा मुद्देमाल पळविल्याची घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की , नंदूर येथील फिर्यादी शिवराज मल्लिकार्जून बिराजदार ( वय १ ९ रा.नंदूर ) यांचे दि . ६ जून रोजी सायंकाळी ७.०० ते ७ जून पहाटे ५.३० च्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरांनी घराच्या दरवाजाचे कुलूप कोयंडा तोडून कपाटात ठेवलेले ४० हजार रुपये किमतीचे ५/५ ग्रॅमच्या दोन अंगठया , रोख रक्कम , रोख रक्कम २० हजार रुपये असा एकूण ६० हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरांनी चोरून नेल्याची फिर्याद शिवराज बिराजदार यांनी मंगळवेढा पोलिसात दिली असून अज्ञात चोराविरोधात भा.द.वि. सं.कलम ३८०,४५७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा अधिक तपास स.पो.फौ.बाबर हे करीत आहेत.

आंधळगाव येथून मोटर सायकलची चोरी

आंधळगाव येथून सकाळी १०.०० चे दरम्यान आंधळगाव येथील नागणे वस्ती येथून काळया रंगाची बजाज कंपनीची मोटर सायकल ( एम एच १३ , सी एम ४३६३ ) अज्ञात चोरटयाने पळवून  नेल्याची फिर्याद अनिल शिवाजी नागणे यांनी मंगळवेढा पोलिसात दिली आहे.

अज्ञात चोरटयाविरोधात भा.द.वि.सं.कलम ३७ ९ एम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा पळवून अधिक तपास पो.ना. येलपले हे करीत आहेत .

नंदूर येथून मोटर सायकल पळविली

नंदूर येथील फिर्यादी दुर्यो धन शंकर पुजारी (वय ५०) यांची शाईन कंपनीची मोटर सायकल एम एच १३ एजी ७८२० दि . ७ जून रोजी रात्री ११.४५ ते ८ जून पहाटे ५.०० च्या दरम्यान नंदूर चौक नंदूर ता. मंगळवेढा येथे घरासमोर अंगणात लावलेली मोटर चोरटयांनी पळवून नेली आहे.

अज्ञात चोरटयाविरोधात भा.द.वि.सं.कलम ३७ ९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा अधिक तपास पो.ना. निंबाळकर हे करीत आहेत.

शासकीय कार्यालयातून संगणक साहित्यासह दुचाकीची चोरी

मंगळवेढा येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील संगणक , संगणक साहित्यासह व इतर एका खाजगी व्यक्तीच्या दुचाकीची अज्ञात चोरट्यांनी चोरी केली असून या बाबतची फिर्याद गटशिक्षणाधिकारी पोपट लवटे यांनी दिली आहे.

पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील पंचवीस हजार किमतीचा संगणक व पंधरा हजार रुपये किमतीचा जुना संगणक , दहा हजार रुपये किमतीचा शिक्षण विस्तार अधिकारी बजरंग पांढरे यांच्या निवासस्थानातील डीव्हीडी प्लेअर व पाणी फिल्टर आदी साहित्य अज्ञात चोरट्यांनी ता .४ ते ६ सकाळी नऊच्या दरम्यान चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: चोरीदुचाकी चोरीमंगळवेढा

संबंधित बातम्या

सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

मोठी बातमी! ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळीला अटक; एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध, नेमकं कारण काय?

October 5, 2026
मागेल त्याला टँकर! शेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये: आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना

मागेल त्याला टँकर! शेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये: आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना

October 4, 2026

ई-पीक पाहणीसाठी शेतकऱ्याकडे ५०० रुपयांची खंडणी; साहाय्यकाची हकालपट्टी करत पोलिसांत गुन्हा दाखल; ​दुष्काळी अनुदानाची भीती दाखवून पैशांची मागणी

October 4, 2026
मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! मंगळवेढ्यात घोषणाबाजीसह शांततेच्या मार्गाने शहर व तालुका कडकडीत बंद; उपोषणाला शहर अन् तालुक्यातून प्रचंड पाठिंबा

खोट्या अट्रोसिटीच्या विरोधात मंगळवेढा शहर कडकडीत राहिले बंद; आमदार समाधान आवताडे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन घेतले मागे

October 4, 2026
वाळू माफियांची मुजोरी तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंगळवेढ्यात संतापाची लाट! आजपासून तालुका बेमुदत बंद; खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घेण्यासह १२ आरोपींच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी; संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

October 3, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

चाकूने भोसकून थरार घडवणाऱ्या वडदेगाव येथील दत्ता बागल यांचा हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींची तुरुंगातच रवानगी; सोलापूर न्यायालयाचा दणका; वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य

October 4, 2026

चेकपोस्टवर थरार! पोलिसांची नाकाबंदी तोडून कार पळाली, पण पाठलाग करत दारूने भरलेला टेम्पो पकडलाच; १० लाखांच्या मुद्देमालासह मंगळवेढ्याचे दोघे अटकेत

October 2, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांच्या बांधावर आमदार! समाधान आवताडे आज मंगळवेढ्यातील दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यावर

October 2, 2026
कथित खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी करा; अन्यथा ३ ऑक्टोबरपासून मंगळवेढा तालुका बेमुदत बंद; समस्त मंगळवेढेकर नागरिकांचा पोलीस प्रशासनाला थेट इशारा

कथित खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी करा; अन्यथा ३ ऑक्टोबरपासून मंगळवेढा तालुका बेमुदत बंद; समस्त मंगळवेढेकर नागरिकांचा पोलीस प्रशासनाला थेट इशारा

October 1, 2026
Next Post
सोलापुरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी उद्या बोलावली बैठक; सर्व आमदार,खासदारांसह अधिकारी राहणार उपस्थित

'मामा' जाणार, दीड वर्षात सोलापूरला मिळणार चौथे पालकमंत्री! जिल्ह्यातील नेत्यांनी खा.शरद पवार यांच्यासमोर मांडली वस्तुस्थिती

ताज्या बातम्या

शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

सावकारांनो सावधान! शेतकऱ्यांना अडचणीत आणाल तर थेट…. मंत्री बावनकुळेंचा इशारा, पोलिसांना सूचना, बँकांनांही दिली ताकीद

October 5, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

मोठी बातमी! ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळीला अटक; एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध, नेमकं कारण काय?

October 5, 2026
मागेल त्याला टँकर! शेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये: आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना

मागेल त्याला टँकर! शेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये: आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना

October 4, 2026

ई-पीक पाहणीसाठी शेतकऱ्याकडे ५०० रुपयांची खंडणी; साहाय्यकाची हकालपट्टी करत पोलिसांत गुन्हा दाखल; ​दुष्काळी अनुदानाची भीती दाखवून पैशांची मागणी

October 4, 2026
मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! मंगळवेढ्यात घोषणाबाजीसह शांततेच्या मार्गाने शहर व तालुका कडकडीत बंद; उपोषणाला शहर अन् तालुक्यातून प्रचंड पाठिंबा

खोट्या अट्रोसिटीच्या विरोधात मंगळवेढा शहर कडकडीत राहिले बंद; आमदार समाधान आवताडे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन घेतले मागे

October 4, 2026
वाळू माफियांची मुजोरी तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंगळवेढ्यात संतापाची लाट! आजपासून तालुका बेमुदत बंद; खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घेण्यासह १२ आरोपींच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी; संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

October 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..