mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

नागरिकांनो गोंधळू नका! महाराष्ट्रात सरसकट शिथिलता नाही, स्थानिक प्रशासन निर्बंधांबाबत निर्णय घेणार; वाचा सविस्तर

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 6, 2021
in राज्य
सोलापूरकरांच्या रेट्यामुळे आजपासून व्यापारपेठ खुली; शहरातील दुकाने आजपासून ‘या’ वेळेपर्यंत राहणार सुरू

टीम मंगळवेढा टाईम्स। 

ब्रेक दि चेनचे आदेश हे निर्बंध हटविण्यासाठी नसून निर्बंधांबाबत विविध पाच पातळ्या (लेव्हल्स) निश्चित करण्यासाठी आहेत.या पातळ्यांच्या आधारे सबंधित स्थानिक प्रशासन आपापल्या भागासाठी निर्बंधांबाबत योग्य तो निर्णय घेईल.

या सुचना प्रशासनासाठी आहेत,स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण त्या प्रमाणे निर्णय घेईल.कुणीही गोंधळू नये व इतरांना गोंधळवू नये असे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे.

कोरोनाचा संसर्ग राज्यभर सारखा नाही,त्याची तीव्रता कमी-जास्त आहे हे लक्षात घेऊन एकीकडे या विषाणूची साखळी तोडणे आणि दुसरीकडे आपले आर्थिक, सामाजिक दैनंदिन व्यवहार शिस्तबद्धरित्या सुरु कसे होतील हे पाहणे एवढ्याच करीता निर्बंधांच्या ५ पातळ्या ठरविण्यात आल्या आहेत.

या लेव्हल्स ( पातळ्या) निश्चित करण्यासाठी ऑक्सिजन बेडसची दैंदिन उपलब्धता आणि साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर हे निकष गृहीत धरण्यात येतील.

त्या त्या ठिकाणाचे स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या निकषांच्या आधारे निर्बंधांबाबत योग्य तो निर्णय घेईल.कोरोनाचा संसर्ग हे आपल्यासाठी अजूनही आव्हानच आहे. त्याला रोखण्यासाठी आपण कशा सुयोग्य पद्धतीने निर्बंधांसाठी निकष आखले आहेत व पातळ्या ठरविल्या आहेत त्याची माहिती आपणास असावी असा या आदेशाचा हेतू आहे.

आपापल्या भागातील स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या निकषांप्रमाणे निर्बंधांबाबत योग्य तो निर्णय घेईल, नागरिकांनी कोविडच्या या काळात आरोग्याचे नियम पाळून तसेच कोविड सुसंगत वर्तणूक ठेऊन आपापल्या जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयास सहकार्य करायचे आहे असेही राज्य शासनाने स्पष्ट केले आहे.

पालिका व जिल्हा स्वतंत्र प्रशासकीय घटक

वेगवेगळ्या जिल्ह्यांना विविध प्रशासकीय घटकांमध्ये विभाजित करण्यात आले आहे.

अ) बृहन्मुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, ठाणे मनपा, नाशिक मनपा, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, वसई,विरार, नवी मुंबई, नागपूर, सोलापूर, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांना वेगळे प्रशासकीय घटक म्हणून गणले जाईल.

ब) ३४ जिल्ह्यांमधील उर्वरित क्षेत्राला एक वेगळे प्रशासकीय घटक म्हणून गणले जाईल (यामध्ये मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचा समावेश नसेल)

क) जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासन एखाद्या दहा लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ठिकाणी वेगळे प्रशासकीय घटक म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव पाठवू शकतात. याचा अंतिम निर्णय राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे प्रशासकीय मान्यतेसाठी पाठवावे लागेल.

निर्बंधांचे स्तर

राज्य भरासाठी विविध वर्गात सामील होणाऱ्या क्षेत्रांकरिता पाच स्तर तर बनविण्यात आले आहे. या स्तरांची अंमलबजावणी त्या ठिकाणच्या साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर आणि रुग्णांनी भरलेले ऑक्सीजन बेडच्या दैनंदिन टक्केवारीवर अवलंबून असेल.

प्रत्येक आपत्ती व्यवस्थापन प्रशासन हे आपल्या कार्यक्षेत्रात सदर स्तरांच्या आधारे निर्बंध उठवतील. याकरिता विभिन्न मापदंड आणि सामान्य मार्गदर्शक तत्त्व खालील प्रमाणे जाहीर करण्यात येत आहेत.

स्तर १- ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांपेक्षा कमी असेल तसेच ऑक्सिजन बेड २५ टक्क्यापेक्षा कमी भरलेले असतील.

स्तर २ – ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांपेक्षा कमी असेल आणि भरलेले ऑक्सिजन बेडची टक्केवारी २५ ते ४० च्या दरम्यान असेल.

स्तर ३- पॉझिटिव्हिटी दर पाच ते दहा टक्के दरम्यान असेल आणि व्यापलेले ऑक्सीजन बेड ४० टक्क्यांपेक्षा जास्त असेल.

स्तर ४- ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर १० ते २० टक्के दरम्यान असेल आणि ६० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड रुग्णांनी भरलेले असेल.

स्तर ५- जेथे २० टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी जर असेल आणि ७५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त ऑक्सिजन बेड रुग्णांनी व्यापले असेल.

साधारण मार्गदर्शक तत्त्वे

पहिल्या स्तरासाठी नियमित सुपर स्प्रेडर,जे लोकल ट्रेनने प्रवास करतात,किंवा लग्नसमारंभातील गर्दी.

स्तर २ साठी गर्दीच्या ठिकाणी कमीत कमी हजेरी, सार्वजनिक ठिकाणी गटांमध्ये जमा होण्यास प्रतिबंध, तर तिसऱ्या स्तरासाठी पाच वाजल्यानंतर दररोज तसेच आठवड्याच्या शेवटी कमीत कमी वावर, आवागमन.

स्तर ४ साठी पाच वाजल्यानंतर तसेच आठवड्याच्या शेवटी आणि आठवडाभर कोणतेही आवागमन किंवा हालचालीवर पूर्णता बंदी.

फक्त आवश्यक आणि आपत्कालीन कारणांसाठी मुभा , पाचव्या स्तरात फक्त आपत्काल आणि आवश्यक कारणांसाठी ये-जा करण्याची परवानगी, स्तर तीन,चार आणि पाच साठी जिथे आस्थापना संध्याकाळी चार वाजेपर्यंत उघडे असण्याचा उल्लेख असेल त्या ठिकाणी असे अपेक्षित आहे की, हे आस्थापना मालक, दुकानदार व सेवा देणारे तसेच ग्राहक पाच वाजेपर्यंत सर्व आटोपून घरी पोहोचतील.

ज्या आवश्यक सेवांसाठी लोकल ट्रेनने प्रवासाची मुभा देण्यात आली आहे त्यात वैद्यकीय, शासकीय कार्यालय, विमानतळ, बंदरे यांची सेवा समाविष्ट असेल.आवश्यक वाटल्यास राज्य आपत्ती व्यवस्थापन प्रशासन इतर गोष्टींचा अंतर्भाव करू शकते.एखाद्या प्रवाशाला पासची आवश्यकता असेल त्या ठिकाणी एका वाहनामध्ये असलेल्या सर्वांसाठी वेगवेगळे पास असणे अभिप्रेत आहे. परंतु सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या वाहनांना वेगळे पास लागणार नाहीत.

सरकारी कार्यालय आणि आपत्कालीन सर्व सेवा तसेच कोरोना व्यवस्थापनासाठी १०० टक्के उपस्थितीसह काम केले जाऊ शकते. मुंबईतील इतर शासकीय कार्यालयांमधील उपस्थिती वर दिलेल्या पेक्षा जास्त असू शकते परंतु त्यासाठी मुख्य सचिव यांची परवानगी लागेल तर राज्यातल्या इतर भागात त्या त्या ठिकाणच्या आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाची परवानगी आवश्यक असेल.

आवश्यक सेवेमध्ये खालील गोष्टी समाविष्ट असतील

इस्पितळ, चाचणी केंद्र, दवाखाने, लसीकरण केंद्र, वैद्यकीय विमा कार्यालय, औषध केंद्र, औषध निर्माण कंपन्या इतर वैद्यकीय सुविधा देणारे तसेच त्याचे उत्पादन आणि वितरण करणारे, त्याची वाहतूक करणारे आणि या चैन मध्ये सामील असणारे सर्वांचा समावेश होईल. त्याचप्रमाणे लसीचे वितरण, सेनीटायझर, मास्क, वैद्यकीय उपकरण व इतर कच्चा माल यालाही आवश्यक सेवा म्हणून गृहीत धरले जाईल.

पशुवैद्यकीय सेवा, जनावरांसाठी आश्रय व पाळीव प्राण्यांसाठी खाद्य दुकाने. वन विभागाद्वारे घोषित केलेले वन विभागाचे काम वायु वाहन सेवा- यात विमान, विमानतळ, त्यांची देखरेख, विमान मालवाहतूक, इंधन व सुरक्षा यांचा समावेश होईल.

किराणा दुकाने, भाजी दुकान, फळांचे दुकान, दूध डेरी, बेकरी, मिठाईचे दुकान यांचाही समावेश असेल.

कोल्ड स्टोरेज आणि वखार सेवा. सार्वजनिक वाहतूक- यात विमान, रेल्वे, टॅक्सी, रिक्षा आणि सार्वजनिक बस. विविध देशांच्या मुत्सद्यांच्या कार्यालयात यातील कार्य.

स्थानिक प्रशासनातर्फे मान्सूनपूर्व काम
स्थानिक प्रशासनातर्फे सर्व सार्वजनिक सेवा
रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि त्याच्याशी संबंधित इतर सेवा

सेबीशी संबंधित सर्व कार्यालय
दूरध्वनी सेवे साठी लागणारी सेवा
मालवाहतूक पाणी पुरवठा सेवा कृषीशी संबंधित सर्व काम ज्यात बी बियाणे खत कृषी साहित्य आणि उपकरणांचा समावेश असेल.

सर्व वस्तूंचे आयात-निर्यात ई-कॉमर्स फक्त आवश्यक सेवा आणि सामान अधिस्वीकृती धारक पत्रकार पेट्रोल पंप आणि पेट्रोलची संबंधित उत्पादक सर्व मालवाहतूक सेवा

डाटा केंद्र, क्लाऊड सेवा, माहिती तंत्रज्ञान व त्याच्याशी संबंधित सेवा शासकीय व खाजगी सुरक्षा सेवा वीज आणि गॅस पुरवठा सेवा एटीएम आणि डाक सेवा बंदरे आणि त्याच्याशी संबंधित कार्य कस्टम हाऊस एजंट, बहुआयामी वाहतूक सेवेतील, जीवनावश्यक औषधी आणि इतर औषध उत्पादनाशी संबंधित आहेत

कच्चा माल पॅकेजिंगसाठी बाल तयार करणारे कंपन्या मान्सून आणि पावसाळ्याची निगडीत उत्पादन करणारे कंपनी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासनातर्फे आवश्यक घोषित केलेल्या सेवा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेलॉकडाउनशिथिलता

संबंधित बातम्या

आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आजपासून प्रक्रिया, विधानसभेसाठी १० हजार रुपये डिपॉझिट; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘या’ गोष्टींवर बंदी

मिनी विधानसभा निवडणुकांचेही ठरले! जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या तारखा जाहीर; ५ फेब्रुवारीला मतदान, निकाल कधी? वाचा वेळापत्रक; एका मतदाराला ‘इतके’ मते देता येणार

January 13, 2026
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मोठी बातमी! जिल्हा परिषद निवडणुकीचं संभाव्य वेळापत्रक समोर; आयोगाची आज पत्रकार परिषद

January 13, 2026
मोठी बातमी! सोलापूर व माढा मतदारसंघात ‘या’ तारखेला होणार मतदान; महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?, 4 जूनला निकाल

Breaking! राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या; सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला परवानगी

January 12, 2026
चल ग सखे पंढरीला…! आषाढी यात्रेसाठी आज मंगळवेढ्यातून एसटीच्या मोफत पाच फेऱ्या; दोन विठ्ठल भक्तांची भाविकांसाठी केले आयोजन

एसटीचा पास विसरला, पप्पांना फोन करा, ते पैसे देतील अशी विनवणी; तरीही कंडक्टरने भर हायवे-वर चिमूरड्याला बसमधून उतरवले; तातडीने आमदार आवताडेंनी केली ‘ही’ मागणी

January 12, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

कारभाऱ्यांनो आता चालणार नाही! केंद्र सरकारची ‘सरपंच पती’ प्रथेबाबत मोठी घोषणा; गाव पुढाऱ्यांना पंचायत राज मंत्रालयाचा दणका

January 10, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांनो! ई-पीक पाहणीसाठी उरले फक्त ‘इतके’ दिवस; ऑनलाइन-ऑफलाइन पद्धतीने नोंदणी कशी करायची?

January 12, 2026
मी मटण खाल्लं तर माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? सुप्रिया सुळेंच विधान चर्चेत; सत्ताधाऱ्यांवर केली ‘ही’ सडकून टीका

मोठी बातमी! सुप्रिया सुळे केंद्रात, रोहित पवार राज्यात मंत्री होणार? पवार गट NDAमध्ये जाणार? ताईंनी थेट सांगितलं

January 10, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

लाडक्या बहिणींची चिंता वाढली! ३० लाख महिलांना 3000 मिळणार नाहीत; तुमचंही नाव आहे का?

January 9, 2026

मोठी बातमी! ‘या’ तारखेला सार्वजनिक सुट्टी जाहीर, महाराष्ट्र सरकारचा निर्णय; कोणाकोणाला लागू?

January 9, 2026
Next Post
सावधान! तुमच्या मोबाईलमधला डेटा चोरणारे ३४ Apps Googleने हटवले; तुम्हीही करा डिलीट

सावधान! मंगळवेढ्यातील शिक्षकाचे फेसबुक अकाउंट हॅक करून मित्र आणि नातेवाईकांकडे केली 'ही' डिमांड

ताज्या बातम्या

आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आजपासून प्रक्रिया, विधानसभेसाठी १० हजार रुपये डिपॉझिट; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘या’ गोष्टींवर बंदी

मिनी विधानसभा निवडणुकांचेही ठरले! जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या तारखा जाहीर; ५ फेब्रुवारीला मतदान, निकाल कधी? वाचा वेळापत्रक; एका मतदाराला ‘इतके’ मते देता येणार

January 13, 2026
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मोठी बातमी! जिल्हा परिषद निवडणुकीचं संभाव्य वेळापत्रक समोर; आयोगाची आज पत्रकार परिषद

January 13, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

अभिनव उपक्रम! मोबाईल गेम्स, टी.व्ही. मालिकांच्या प्रभाव रोखण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ गावात अभ्यासाचा भोंगा सुरू; दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पहाटे वाजतो भोंगा

January 13, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

Breaking! नगरपरिषदेत उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी आज विशेष बैठक; ‘ही’ नावे चर्चेत; उपनगराध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष

January 13, 2026
कामाची बातमी! मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया उपचार सुरू

कामाची बातमी! मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत 100 रुग्णांच्या मणका व सांधे बदलीच्या मोफत यशस्वी शस्त्रक्रिया

January 12, 2026
मोठी बातमी! सोलापूर व माढा मतदारसंघात ‘या’ तारखेला होणार मतदान; महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?, 4 जूनला निकाल

Breaking! राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या; सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला परवानगी

January 12, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा