mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापुरातील वाळू लिलावात ठेकेदारांना ‘नो’ इंटरेस्ट, एकाचाही नाही सहभाग; पर्यावरण समितीकडे पुन्हा प्रस्ताव

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 27, 2021
in सोलापूर
मंगळवेढयातील जप्त १६१.८८ ब्रास वाळू साठ्याचा जाहीर लिलाव

टीम मंगळवेढा टाईम्स ।

सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील 9 ठिकाणचा वाळू लिलाव प्रशासनाने जाहीर केला होता. त्यासाठी ऑनलाईन निविदा मागविल्या होत्या. 20 मे पर्यंत मुदत देण्यात आली होती. तरीही लिलावासाठी ठेकेदारांमध्ये निरुत्साह दिसून आला.

यंदा सप्‍टेंबर पर्यंत वाळू लिलावाला परवानगी आहे.हा हंगाम पावसाळ्याचा आहे. प्रशासनाला कोट्यवधीचा महसूल भरून अपेक्षित वाळू उपसा करणे अशक्य असल्याचे कारण सांगत आणि ठेकेदारांनी लिलाव प्रक्रियेकडे पाठ फिरवली आहे.

या लिलावास अल्प प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत असल्याने जिल्ह्यातील वाळू ठेकेदारांनी लॉबिंग केल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, ठेकेदारांनी लिलावात सहभाग घेतला नसला तरी अवैध वाळू उपसा मात्र जोमाने सुरू असल्याचे दिसून येते.

गेल्या तीन ते चार वर्षांपासून जिल्ह्यातील वाळू लिलाव रखडले होते. त्यामुळे यंदा वाळू लिलाव जाहीर झाल्याने त्यासाठी मोठी चढाओढ लागणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

जिल्ह्यातील अनेक मोठ-मोठे ठेकेदार वाळू लिलाव निघावेत, यासाठी देव पाण्यात ठेवून बसले होते. तसेच वाळू लिलाव बंद असल्याने जवळपास 40 ते 50 कोटी रुपयांचा जिल्ह्याचा महसूलही बुडत होता. त्यामुळे यंदाचा वाळू लिलाव गाजणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

मात्र पावसाळा तोंडावर असल्याने वाळू उपसा करण्यासाठी अपेक्षित दिवस मिळणार नाही, आपले आर्थिक नुकसान होईल, या भीतीपोटीच जिल्ह्यातील वाळू ठेकेदारांनी लॉबिंग केल्याचे दिसून येत आहे.

वाळू लिलावासाठी 20 मे पर्यंत ऑनलाईन नोंदणी करणे अपेक्षित होते. तसेच नोंदणी केलेल्या वाळू ठेकेदारांनी 25 टक्के रक्कम इसारा म्हणून 24 मे पर्यंत भरणे आवश्यक होते. तर 24 मेच्या सकाळी 11 ते 3 यावेळेत वाळूसाठ्यासाठी ऑनलाईन बोली कार्यक्रम नियोजित करण्यात आला होता. त्यापैकी काही ठिकाणांचा लिलाव घेण्यासाठी ठेकेदार इच्छुक आहेत, तर काही ठिकाणी ठेकेदारांनी दुर्लक्ष केले आहे.

त्यामुळे वाळू लिलाव प्रक्रियेस अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने जिल्हा प्रशासनाला पुन्हा एकदा प्रक्रिया राबविण्याची वेळ आली आहे. एरव्ही ठेकेदारांची वाळू लिलाव घेण्यासाठी चढाओढ असते. मग यंदा वाळू ठेकेदारांनी लिलावाकडे का पाठ फिरविली, असा प्रश्न आता प्रशासनालाही पडला असला तरी वाळू धंद्यात आपले नुकसान होऊ नये, यासाठी ही व्यावसायिक मंडळी एकत्रित आली.

त्यांनी प्रशासनालाच तोंडावर पाडण्याचा प्रयत्न केला असल्याचे आता उघड झाले. त्यामुळे प्रशासनाच्या पुढच्या भूमिकेकडे त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

वाळू उपशासाठी मुदतवाढ मागणार : प्रशासन

जिल्ह्यात पुकारण्यात आलेल्या नऊ ठिकाणच्या वाळू लिलावासाठी जून ते सप्टेंबरपर्यंत मुदत होती. मात्र पावसाळा तोंडावर असल्याने काही दिवसांत नदीपात्रात पाणी येणार आहे. त्यामुळे अपेक्षित वाळू उपसा होत नसल्याने ठेकेदारांचे आर्थिक नुकसान होणार असल्याने त्यांनी याकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे या लिलावासाठी आणि वाळू उपशासाठी सप्टेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ मिळावी, यासाठी प्रस्ताव शासनाला पाठविण्यात येणार असल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी दिली आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: वाळू लिलावसोलापूर

संबंधित बातम्या

सोलापुरात पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती ‘अशी’ भरा ऑनलाइन

बटईने दिली जमीन आणि रातोरात मालकच बदलला! माजी आमदारावर गंभीर आरोप; काय आहे २० एकरांचं गूढ?

October 14, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 10, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
Next Post
नागरिकांनो लक्ष द्या! मंगळवेढ्यातील सर्व दवाखाने,क्लिनिक आज बंद राहणार

कोरोना काळात सोलापूर जिल्ह्यातील डॉक्टर अहोरात्र सेवा; वैद्यकीय कामात राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप, डॉक्टरांचा काम बंदचा इशारा

ताज्या बातम्या

दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी खळबळ! सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं

October 16, 2026
मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

तरुणांसाठी मोठी संधी! मंगळवेढ्यातील नामांकित ‘अर्जुन पीव्हीसी पाईप’ कंपनीत तातडीने भरती सुरु; दररोज मिळणार आकर्षक वेतन व सुविधा; आजच 9673635511 संपर्क साधा

October 15, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शिक्षण क्षेत्रात खळबळ! खासगी शिक्षण संस्थांचा काळाबाजार; विद्यार्थी खरेदी विक्रीचा महाघोटाळा उघड

October 15, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

सहकारी बँकांमध्ये दहा वर्षे तळ ठोकलेले बँक संचालक अपात्रच; कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय : ‘हे’ दिग्गज येणार अडचणीत

October 15, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा