टीम मंगळवेढा टाईम्स ।
पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार झाला आहे. दुपारी दीडच्या सुमारास घडली घटना आहे.
ठेकेदारीच्या वादातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहेत. एका व्यक्तीनं केलेल्या गोळीबारात कोणीही जखमी झालेलं नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर आज दुपारी गोळीबार झाला. मात्र, या घटनेत कोणालाही जखम झालेली नाही. पिंपरी चिंचवड पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरु आहे. ही घटना आज दुपारी दीडच्या सुमारासल घडली.
आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर ठेकेदारीच्या वादातून गोळीबार झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला मात्र, यामध्ये कोणालाही जखम झालेली नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे हे 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पिंपरी मतदारसंघातून विजयी झाले आहेत. यापुर्वी ते 2009 मध्ये देखील निवडून आले होते.
अण्णा बनसोडे यांनी 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार यांचा 16 हजार 856 मतांनी पराभव केला होता. 2014 मध्ये अण्णा बनसोडे यांचा गौतम चाबुकस्वार यांनी 2 हजार मतांनी पराभव केला होता. 2014 च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अण्णा बनसोडे यांनी पिंपरी मतदारसंघात जनसंपर्क वाढवला होता.
2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकासआघाडी सरकारमध्ये अजित पवारांना मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा असताना तुम्हाला कोणतं पद मिळणार? असा प्रश्न अण्णा बनसोडे यांना विचारण्यात आला होता.
त्यावर उत्तर देताना अण्णा बनसोडे अरे आमच्यासाठी दादा हेच मुख्यमंत्री आहेत , असं म्हणाले होते. अण्णा बनसोडे अजित पवार समर्थक आमदार मानले जातात.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
![ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा](https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2021/12/WhatsApp-Add.gif)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज