mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मुहूर्त ठरला! राज्यात ‘या’ तारखेपासून ‘शाळा’ सुरू होणार; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची परवानगी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
मुहूर्त ठरला! राज्यात ‘या’ तारखेपासून ‘शाळा’ सुरू होणार; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची परवानगी


टीम मंगळवेढा टाईम्स । देशभरात सुरू असलेल्या कोरोनाच्या कहरामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून सुरू असलेल्या या लॉकडाऊनमध्ये शाळा, रेल्वे आणि इतर महत्त्वपूर्ण संस्था बंद ठेवण्यात आल्या होत्या. आता हळूहळू विविध सेवा पूर्ववत केल्या जात आहेत.


 

मात्र यामध्ये शाळा सुरू होण्याबाबत पालकांचा नकारात्मक सूर दिसत होता. अशातच केंद्राने 21 सप्टेंबरपासून शाळा सुरू होणार असल्याचे जाहीर केले आहे.

एखादा विद्यार्थी किंवा शिक्षक आजारी असल्यास त्याने शाळेत येऊ नये. शाळेत एक वेगळा आयसोलेशन रुमही बनवला गेला पाहिजे. जेणेकरुन जर कोणी आजारी असेल तर तो आरोग्य सुविधा येईपर्यंत त्या खोलीत राहू शकेल. जर एखादा विद्यार्थी आजारी पडला तर त्याला पालकांसह स्थानिक आरोग्य यंत्रणेस माहिती द्यावी लागेल.


शाळा सुरू करताना विद्यार्थी, शिक्षक हा कोणत्याही लक्षण नसलेला व्यक्तीला शाळेत येण्यास परवानगी असणार आहे. मास्क, सॅनिटायजरचा वापर शाळेत वेळोवेळी खबरदारी म्हणून केला जाणार आहे. शाळेत सोशल डिस्टन्सिंग पाळलं जाण्यासाठी 6 फूट अंतर राखावे. यासाठी वर्ग खोलीत सुद्धा त्यानुसार आसनव्यवस्था करण्यात यावी, अशी नियमावली केंद्र सरकारने जारी केली आहे.

बाहेरील व्यक्तीस शाळेत येण्यास मनाई असणार आहे. लायब्ररी, मेस, कँटिनमध्ये सुद्धा योग्य ती खबरदारी घेण्यात यावी. ट्रान्सपोर्टेशनमध्ये बस, वाहन पूर्णपणे सॅनिटाइज केले जावे, अशा सूचना केंद्राने केल्या आहेत.

Students of class 9-12 will be permitted to visit their school on voluntary basis for taking guidance from teachers. It’ll be subject to written consent of their parents/guardians. Such visits & teacher-student interaction must be organized in a staggered manner: Health Ministry pic.twitter.com/QfTItiANxw

— ANI (@ANI) September 8, 2020

 

कंटेन्मेंट झोनमधील शाळा सुरू करण्यास परवानगी नाही. शिवाय कंटेन्मेंट झोनमध्ये राहणाऱ्या शिक्षण, विद्यार्थी, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याला शाळेत येण्यास परवानगी नसणार आहे.

शाळा सुरु करण्याआधी संपूर्ण परिसर, वर्ग, प्रयोगशाळा, टीचिंग परिसर एक टक्के सोडियम हायपोक्लोराइटने सॅनिटाईज करावा लागणार आहे. विशेषत: ज्या पृष्ठभागावर वारंवार स्पर्श केला जातो तो भाग स्वच्छ करावा. शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात अंतर 6 फूटांपेक्षा जास्त असावे.

ज्या शाळा क्वॉरंटाईन सेंटर म्हणून वापरण्यात आल्या त्या पुन्हा सुरू करण्यापूर्वी स्वच्छ आणि डीप सॅनिटाईल केल्या जाणार आहेत. या कालावधीत केवळ 50 टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना शाळेत बोलावले जाईल. शाळेत बायोमेट्रिक हजेरीऐवजी शाळा प्रशासनाकडून संपर्क कमी हजेरीसाठी पर्यायी व्यवस्था केली जाईल.

शाळेचा प्रवेश आणि बाहेर जाण्यासाठी गेट वेगळे असले पाहिजेत. त्याच वेळी शाळेत प्रवेश करताना गेटवर थर्मल स्कॅनिंग आणि हँड सॅनिटायझरची एक प्रणाली असावी. केवळ असे विद्यार्थी आणि शिक्षक ज्यांना कोणत्याही प्रकारचे लक्षणे नाहीत तेच शाळेत जाऊ शकतील. त्याचबरोबर गर्दी व्यवस्थापनासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी.


विद्यार्थी पेन्सिल, पेन, पुस्तक, टिफिन आणि पाण्याची बाटली यासारख्या गोष्टी शेअर करणार नाहीत, यावर शिक्षकांनी लक्ष दिलं पाहिजे. विद्यार्थी आणि शिक्षक दोघेही नेहमी मास्क घालावं लागणार आहे. शाळेतून वाहतुकीची सुविधा असल्यास दररोज वाहतुकीसाठी वापरले जाणारे वाहन रोज सॅनिटाईज केले पाहिजे.

The school will be open from September 21 to class IX, with the permission of the Union Ministry of Health

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Maharashtra Maza

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
मंगळवेढ्यासाठी 108 च्या दोन रुग्णवाहिका द्या : जिल्हा नियोजन मंडळ सदस्य अजित  जगताप यांची मागणी

मंगळवेढ्यासाठी 108 च्या दोन रुग्णवाहिका द्या : जिल्हा नियोजन मंडळ सदस्य अजित जगताप यांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजमाता अर्बन बँक रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; दामाजी चौकात बँकेची 24 तास ATM सेवा सुरू

मंगळवेढ्यात ‘राजमाता बँकेचा’ उद्या वर्धापनदिन; गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चहापानाचे आयोजन

March 18, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

​पोलिसांचा आशीर्वाद की यंत्रणेचा सुस्तपणा? गुन्हा दाखल असलेले ‘ते’ १० विद्यार्थी अजूनही मोकाटच; मनसेचा पोलीस महानिरीक्षकांना सवाल

March 18, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

मंगळवेढा हादरलं! चाकूचा धाक दाखवून भरवस्तीत घरफोडी; सव्वा लाखांचा मुद्देमाल लंपास; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

March 18, 2026
दक्षिण भागात म्हैसाळचे पाणी “टेल टू हेड” मिळणेसाठी आ.आवताडे यांची विधानसभेत मागणी; देवेंद्र फडणवीस यांचे सकारात्मक उत्तर

नदी वाचवा, निधी द्या! भीमेच्या शुद्धीकरणासाठी १०० कोटी द्या; आमदार आवताडेंची सरकारकडे आग्रही मागणी; विधानसभेत घुमवला आवाज

March 17, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

मोठी बातमी! ​गरीबांच्या हक्काच्या पैशावर डल्ला; लाचखोर ग्रामपंचायत कर्मचारी अटकेत

March 17, 2026
कामाची बातमी! मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया उपचार सुरू

मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य आरोग्य शिबीर: मोफत तपासणी आणि उपचारांची सुवर्णसंधी

March 17, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा