टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी ग्रामीण भागात जास्त रुग्णसंख्या असलेल्या भागात कंटेन्मेंट झोन (प्रतिबंधीत क्षेत्र) करण्याचा निर्णय घेतला आहे.
मंगळवेढा शहरातील दामाजी नगर, चोखामेळा नगर या भागात कंटेन्मेंट झोन (प्रतिबंधीत क्षेत्र) करण्याचा निर्णय घेतला आहे.
उद्या पासून कन्टेन्मेंट झोन तयार केले जाणार असून प्रतिबंधित क्षेत्रात दळणवळण पूर्णपणे बंद राहणार आहे. फक्त आरोग्य सेवा व अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असून प्रतिबंधीत क्षेत्रात कडक पोलिस बंदोबस्त राहणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील खालील तालुक्यात जास्त रूग्ण संख्या असलेल्या गावात प्रतिबंधीत क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.
हे आहेत ग्रामीण भागातील प्रतिबंधित क्षेत्र…
मंगळवेढा : दामाजी नगर, चोखामेळा नगर, सांगोला : कडलास, पंढरपूर : टाकळी,देगाव,सुस्ते, दक्षिण सोलापूर : मुस्ती, मोहोळ : पोखरापूर, माढा : २ झोन टेंभुर्णी, अक्कलकोट : समर्थ नगर, बार्शी : गौडगाव, भालगाव, करमाळा : विट, देवळाली, वांगी, जेऊर, माळशिरस : २ एरिया अकलूज, उत्तर सोलापूर : कौठाळी
वरील भाग प्रतिबंधीत क्षेत्र घोषित केले असून नागरिकांनी याभागात जाणे टाळावे तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांनी प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर संचार करु नये व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.(लोकमत)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज