टीम मंगळवेढा टाईम्स ।
पत्नीने फोन करण्यासाठी पतीकडे मोबाईल मागितला. त्यावेळी पतीने माझ्याकडे मोबाईल नाही असे म्हणताच पत्नीने लोखंडी तवा पतीच्या डोक्यात फेकून मारला.
ही घटना माढा तालुक्यातील उंदरगाव येथेसकाळी साडेनऊच्या सुमारास घडली.याबाबत माढा पोलिसात आनंद हनुमंत माने (रा. उंदरगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वर्षा आनंद माने हिचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार फिर्यादीची पत्नी वर्षा आनंद माने हिने फिर्यादीस फोन करण्यासाठी मोबाईल मागितला.
त्यावेळी फिर्यादीने तिला माझ्याकडे मोबाईल नाही असे म्हणताच तिने चिडून फिर्यादीस शिविगाळ केली, तसेच हाताने शरीरावर मारहाण केली.
याचबरोबर बचाव करण्यासाठी फिर्यादी खोलीतून बाहेर जात असताना भांड्याच्या जाळीमध्ये ठेवलेला लोखंडी तवा हातात घेऊन फिर्यादीच्या डोकीत मारला. या घटनेचा अधिक तपास पो.ना.विशाल पोरे हे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज