mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर कोरोना ब्रेकिंग! आता दुकानदारांसह कर्मचाऱ्यांनाही कोरोना चाचणी बंधनकारक, अन्यथा कारवाई होणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 20, 2021
in सोलापूर
सोलापूर ग्रामीणमध्ये आज 244 जण कोरोनामुक्त, 223 नवे रुग्ण; वीस वर्षीय तरुणीचा मृत्यू

टीम मंगळवेढा टाईम्स ।

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सांगोल्यातील सर्व व्यावसायिकांच्या मालकांसह कामगारांचीही कोरोना चाचणी बंधनकारक राहणार आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी नागरिकांनी काळजी घेऊन नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी अंकित कुमार यांनी केले.

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने या विषाणूचा प्रादुर्भाव सांगोला तालुक्‍यात वाढू नये यासाठी सांगोला बचत भवन येथे बैठक पार पडली.

या बैठकीसाठी प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी अंकित कुमार, तहसीलदार अभिजित सावर्डे- पाटील, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, गटविकास अधिकारी संतोष राऊत, तालुका वैद्यकीय अधिकारी सीमा दोडमनी व इतर अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी अंकित कुमार पुढे म्हणाले की, नागरिकांसह सर्व व्यापारी बंधूंनी प्रशासनाला सहकार्य करून नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे.

तहसीलदार अभिजित सावर्डे-पाटील म्हणाले की, सांगोल्यामध्ये विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी कोरोना चाचण्या वाढविण्यात येणार आहेत. यामध्ये भीती बाळगण्याचे कारण नसून, दुकानदारांसह त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचण्या बंधनकारक करण्यात येणार आहेत.

सध्याच्या काळात होम आयसोलेशनसाठी कोणालाही परवानगी दिली जाणार नाही. यापुढील काळात बाहेर जाणारे ड्रायव्हर व इतर नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

मुख्याधिकारी कैलास केंद्रे म्हणाले की, या अगोदरही शहरातील सर्व नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य केले आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने सर्व व्यावसायिकांनी ग्राहकांची काळजी घेतली पाहिजे. दुकानदार व त्यांच्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी बंधनकारक असून यासाठी सर्व नियोजन केले जाईल.

कोव्हिड सेंटरला सर्व सोयीसुविधा देणार
सध्या वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन सांगोला येथील फॅबटेक कॉलेजमध्ये बुधवार (ता. 17) पासून पुन्हा कोव्हिड सेंटर सुरू करण्यात आले आहे.

कोव्हिड सेंटरविषयी नागरिकांनी भीती किंवा गैरसमज बाळगण्याचे कारण नसून, या सेंटरवर रुग्णांना सर्व सोयीसुविधा देण्यात येतील, अशी माहिती तहसीलदार अभिजित सावर्डे- पाटील यांनी दिली.(सकाळ)

घराबाहेर पडताना कोरोना नियमांचे पालन करा

सर्व नागरिकांनी घराबाहेर पडताना कोरोना नियमांचे पालन केले पाहिजे. नागरिकांनी मास्क न वापरल्यास किंवा सोशल डिस्टन्सिंग न पाळल्यास अशा नागरिकांवर निश्‍चितपणे कारवाई केली जाईल – भगवान निंबाळकर,पोलिस निरीक्षक, सांगोला

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: कोरोना चाचणीबंधनकारकसांगोला

संबंधित बातम्या

अंगणवाडी सेविकांची निघाली भरती, सोलापूर जिल्ह्यात ‘एवढ्या’ जागा; शिक्षण अट, उमेदवार निवडीचा अधिकार, अर्ज प्रक्रिया सविस्तर माहिती जाणून घ्या..

महिलांनो! सोलापूर जिल्ह्यात अंगणवाड्यांमध्ये नोकरभरती; पगार, पात्रता ते अर्जाचा शेवट दिवस; जाणून घ्या सर्व माहिती

July 17, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! पंढरपुरात आषाढी वारीच्या तोंडावर खळबळ; ‘या’ प्रसिद्ध मिसळ सेंटरसह हॉटेल्सवर तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई; तक्रारींसाठी नागरिकांनी ‘या’ क्रमांकावर संपर्क साधावा

July 17, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांसाठी देवमाणूस ठरले आ.समाधान आवताडे! उजनी आणि म्हैसाळमधून थेट शेतात पोहोचणार पाणी

July 17, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

डोळ्यांदेखत स्वप्ने जळतायत! पाऊस नसल्याने उभी पिके करपली; मंगळवेढ्यासह संपूर्ण जिल्ह्यात पाण्याची तीव्र टंचाई; ‘सोलापूर जिल्हा दुष्काळी जाहीर करा’, शेतकऱ्यांची आर्त हाक

July 15, 2026
सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

बहिणीची दादागिरी! सोन्याच्या दुकानात पूर्ण भागीदारीसाठी भावाला धमकी; ज्वेलर्ससमोर गोंधळ घालणाऱ्या बहिणीवर गुन्हा

July 15, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

खुनाचा प्रयत्न प्रकरणातून आरोपीची मुक्तता; मंगळवेढ्यात ॲड.ओंकार भुसे यांच्या न्यायालयीन कौशल्याची चर्चा

July 14, 2026

निवडणूक कामात हलगर्जीपणा; सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल; दिलेले काम मुदतीत केले नसल्याचा ठेवला ठपका

July 14, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

कर्नाटकात ८ तास, महाराष्ट्रात फक्त २ तास वीज? भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा आक्रोश; शेती धोक्यात; आम्हाला कर्नाटकात जाऊ द्या; शेतकऱ्यांचा सरकारला थेट इशारा

July 12, 2026
जिल्हा दूध संघ अध्यक्ष निवडीची बैठक ‘या’ महिन्यात; आज सर्वच संचालक गैरहजर

तुकाराम मुंडे पॅटर्नचा सांगोल्यात थरकाप! ग्राहकांच्या जिवाशी खेळणारे रॅकेट रडारवर; १५ लाखांचे ३७ हजार लिटर भेसळयुक्त दूध ओतले गटारात

July 12, 2026
Next Post
मंगळवेढ्यातील ‘त्या’ बोगस दाखल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ; ग्रामसेवकाला बजावली कारणे दाखवा नोटीस

...अन्यथा आयकर भरणाऱ्या शेतकऱ्याचे बँक अकाउंट फ्रीझ होणार; सोलापूर जिल्ह्यातील अपात्र लाभार्थींची आकडेवारी पहा!

ताज्या बातम्या

अंगणवाडी सेविकांची निघाली भरती, सोलापूर जिल्ह्यात ‘एवढ्या’ जागा; शिक्षण अट, उमेदवार निवडीचा अधिकार, अर्ज प्रक्रिया सविस्तर माहिती जाणून घ्या..

महिलांनो! सोलापूर जिल्ह्यात अंगणवाड्यांमध्ये नोकरभरती; पगार, पात्रता ते अर्जाचा शेवट दिवस; जाणून घ्या सर्व माहिती

July 17, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! पंढरपुरात आषाढी वारीच्या तोंडावर खळबळ; ‘या’ प्रसिद्ध मिसळ सेंटरसह हॉटेल्सवर तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई; तक्रारींसाठी नागरिकांनी ‘या’ क्रमांकावर संपर्क साधावा

July 17, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांसाठी देवमाणूस ठरले आ.समाधान आवताडे! उजनी आणि म्हैसाळमधून थेट शेतात पोहोचणार पाणी

July 17, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला! मतदार यादीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर; ‘या’ तारखेला प्रसिद्ध होणार प्रारूप यादी

July 17, 2026
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

अजित पवारांच्या जयंतीचा समावेश राष्ट्रपुरुष आणि थोर पुरुषांच्या यादीत, दादांची जयंती शासकीय कार्यालय, शाळा-महाविद्यालयात साजरी होणार; ‘या’ तारखेला राज्यभर पहिली शासकीय जयंती

July 16, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

मंगळवेढ्यात खळबळ! मॉलमध्ये काम करणाऱ्या २१ वर्षीय तरुणाचा भीमा नदीच्या पुलावरून पडून मृत्यू; घातपाताचा संशय?

July 16, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा