mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

नागरिकांनो! पोलिसांनी विनाकारण वाहन अडविल्यास वाहनचालकांना ‘या’ नंबरवर तक्रार करता येणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 3, 2021
in सोलापूर, राज्य
अखेर विसाव्या दिवशी सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकपदी झाली ‘यांची’ नियुक्ती

टीम मंगळवेढा टाईम्स ।

परराज्यातील तथा परजिल्ह्यातील वाहनांना विनाकारण अडवून त्रास देणाऱ्या वाहतूक पोलिसांवर आता कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली.

नाकाबंदी अथवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर केसेस करण्यापूर्वी त्यांची सर्वप्रथम नोंद पोलिस ठाण्याच्या दैनंदिनीत करून कंट्रोल रूमलाही कळविणे बंधनकारक असते, असे आदेश त्यांनी मंगळवारी काढले आहेत.

महामार्ग असो वा राज्य मार्गांवर नाकाबंदी करण्यापूर्वी संबंधित पोलिस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यांसह पोलिस मुख्यालयास त्याची माहिती देणे बंधनकारक आहे.

नाकाबंदी सुरू असताना डमी वाहनचालक पाठवून पोलिस उपअधीक्षकांकडून कार्यवाहीची पडताळणी केली जाणार आहे.दरम्यान, ट्रिपल सीट, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, वाहन वेडेवाकडे चालविणे, फॅन्सी नंबरप्लेट अथवा नंबरप्लेटच नाही, अशा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर निश्‍चितपणे कारवाई करावी.

ते नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे डोळ्यांनी स्पष्टपणे दिसते. मात्र, दुसऱ्या वाहनांना अडविताना कंट्रोलची परवानगी घ्यावीच लागेल असे स्पष्ट निर्देश पोलिस अधीक्षकांनी दिले आहेत.

विनाकारण वाहन अडवून कागदपत्रांची मागणी केली जाते. काही ठिकाणी गैरप्रकाराच्या तक्रारीही ऐकावयास मिळतात. या पार्श्‍वभूमीवर पोलिसांची प्रतिमा मलिन होऊ नये यादृष्टीने सोलापूर ग्रामीण वाहतूक शाखेच्या पोलिस अंमलदारांनी काम करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

वाहन मालक,चालकांनी “या’ नंबरवर करावी तक्रार

महामार्गांवर तथा राज्य मार्गांवर सोलापूर ग्रामीण वाहतूक शाखेचे पोलिस अंमलदार विनाकारण दुचाकी, चारचाकी अथवा परराज्यातील वाहने अडवून त्यांना त्रास देत असल्यास संबंधित वाहनचालकांनी 0217-2732000 व 0217-2732009 आणि 0217-2732010 या क्रमांकांवर संपर्क करावा.

तर 7264885901 आणि 7264885902 या व्हॉट्‌सऍप क्रमांकावरही फोटोद्वारे तक्रार नोंदविता येणार आहे.

…तर कडक कारवाई केली जाईल

दशविधी, लग्न, वारकरी दिंडी, धार्मिक कार्यक्रमासाठी जाणाऱ्या वाहनांना विनाकारण अडवून त्रास देऊ नये. वाहतूक शाखेच्या पोलिस अंमलदारांनी संशयास्पद वाटणाऱ्या तथा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर निश्‍चितपणे कारवाई करावी.

विनाकारण त्रास देणाऱ्यांबद्दल तक्रार प्राप्त झाली आणि त्यात तथ्य असल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल.- तेजस्वी सातपुते,पोलिस अधीक्षक, सोलापूर

कुटूंबासह प्रवास करणारी वाहने अथवा महिला चालक असलेली वाहने विनाकारण अडवू नयेत,चारचाकी अथवा दुचाकीवरून ज्येष्ठ नागरिक प्रवास करीत असल्यास ते वाहन अडवून विनाकारण कागदपत्रांची मागणी करू नये,

पोलिस उपनिरीक्षक अथवा त्यावरील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच करावी नाकाबंदीची कारवाई,नाकाबंदीचे ठिकाण व नाकाबंदीची वेळ पोलिस ठाण्याच्या दैनंदिनीसह कंट्रोलला कळविणे राहील बंधनकारक,

पोलिस उपअधीक्षकांनी नाकाबंदीच्या ठिकाणी अचानक भेट देऊन नाकाबंदीवेळी गैरप्रकार अथवा विनाकारण त्रास दिला जातोय का याची खातरजमा केली पाहिजे.परजिल्ह्यातून अथवा परराज्यातून येणाऱ्या वाहनांना टार्गेट न करता संशयास्पद अथवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरच करावी कारवाई असे आदेशात म्हंटले आहे.(सकाळ)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुतेवाहनवाहन परवानासोलापूर जिल्हा

संबंधित बातम्या

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी खळबळ! सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं

October 16, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शिक्षण क्षेत्रात खळबळ! खासगी शिक्षण संस्थांचा काळाबाजार; विद्यार्थी खरेदी विक्रीचा महाघोटाळा उघड

October 15, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

सहकारी बँकांमध्ये दहा वर्षे तळ ठोकलेले बँक संचालक अपात्रच; कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय : ‘हे’ दिग्गज येणार अडचणीत

October 15, 2026
सोलापुरात पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती ‘अशी’ भरा ऑनलाइन

बटईने दिली जमीन आणि रातोरात मालकच बदलला! माजी आमदारावर गंभीर आरोप; काय आहे २० एकरांचं गूढ?

October 14, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; सोलापूर शिक्षण विभागाचे शाळांना आदेश; शासनाच्या निर्णयानुसार ‘या’ परीक्षांसाठी शुल्कमाफी लागू

October 14, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

हो पाऊस येणार! पंजाबराव डख यांनी थेट तारीख सांगितली; ‘जीवदान’ ठरणारा हवामान अंदाज समोर

October 13, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
Next Post
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ तारखेपासून जमा होणार PM किसान योजनेचा हप्ता, असे तपासा यादीतील तुमचं नाव

चौकशीच्या फेर्‍यात न अडकण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील 'या' अपात्र शेतकर्‍यांकडून ४७ कोटी वसूल

ताज्या बातम्या

दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी खळबळ! सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं

October 16, 2026
मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

तरुणांसाठी मोठी संधी! मंगळवेढ्यातील नामांकित ‘अर्जुन पीव्हीसी पाईप’ कंपनीत तातडीने भरती सुरु; दररोज मिळणार आकर्षक वेतन व सुविधा; आजच 9673635511 संपर्क साधा

October 15, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शिक्षण क्षेत्रात खळबळ! खासगी शिक्षण संस्थांचा काळाबाजार; विद्यार्थी खरेदी विक्रीचा महाघोटाळा उघड

October 15, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

सहकारी बँकांमध्ये दहा वर्षे तळ ठोकलेले बँक संचालक अपात्रच; कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय : ‘हे’ दिग्गज येणार अडचणीत

October 15, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा