टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यात सोलापूर-रत्नागिरी महामार्गासाठी संपादित झालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनींची नुकसान भरपाईची रक्कम हडप करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी अकील अहमद सय्यद काझी, मुजहिद महमद युसुफ काझी, शकील अहमद सय्यद अहमद काझी (रा. काझी गल्ली, मंगळवेढा, हल्ली सिध्देश्वर पेठ,सोलापूर) यांच्याविरोधात मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना 26/05/2015 रोजी सकाळी 11 वा.चे ते 4 चे दरम्यान अप्पर विभागीय आयुक्त पूणे यांचे कार्यालय ते मंगळवेढा पोलीस ठाणे हद्दीत घडला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, यातील आरोपी अकील अहमद सय्यद काझी, मुजहिद महमद युसुफ काझी, शकील अहमद सय्यद अहमद काझी यांनी फिर्यादी दिग्वीजय मारूती वाकडे मंगळवेढा मधील शेतजमीन गट नं.149 ही जमीन त्यांचे मालकीचे आहे.
म्हणून अप्पर आयुक्त पूणे यांचेकडे रिव्हीजन अर्ज क्र. 662/13 अन्वये दावा दाखल करून सदर दाव्याचा निकाल त्यांचेबाजूने लावून घेण्याकरिता अप्पर आयुक्त पूणे यांचेसमक्ष कैलास पांडूरंग लोखंडे, संकलक पूणे पूराभिलेख, पूणे यांचे नावे बनावट सहीचे लेखी म्हणणे सादर करून कोर्टाची व फिर्यादीची तसेच इतर शेतक – याची फसवणूक केली आहे.
फसवणूक करून त्याआधारे फिर्यादीस व बाकी शेतकऱ्यांना मिळणारी नुकसान भरपाईची रक्कम हडप करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून आरोपी अकील अहमद सय्यद काझी, मुजहिद महमद युसुफ काझी, शकील अहमद सय्यद अहमद काझी यांच्याविरोधात भा.द.वि.कलम 420,465,466,467,468,471,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल बामणे हे करीत आहेत.
हेही वाचा :
: – मंगळवेढ्यात साईसमर्थ हॉस्पिटल फ्रॅक्चर,अँक्सिडेंट व अर्थोपेडिक केअरचे मंगळवारी उद्घाटन
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज