टीम मंगळवेढा टाईम्स ।
लक्ष्मी कृषी विकास प्रोडूसर कंपनी च्या माध्यमातून मंगळवेढा पंढरपूर मोहोळ माळशिरस या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना शाश्वत उपजीविका म्हणून दूध व्यवसाय सुरू करून उत्कृष्ट कामाची दखल घेऊन महाॲग्री एफपीओ फेडरेशनच्या राज्य उपाध्यक्षपदी तुळशीदास कारंडे यांची निवड करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात शेतकऱ्यांची स्थापना केलेल्या कंपन्यांना व्यवसायांचे विविध परवाने काढून देणे. शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योग उभे करणे शेतमालाच्या किंमती वाढीसाठी मूल्यवर्धन साखळी तयार करणे.
त्याचबरोबर शेतीमध्ये लागणाऱ्या विविध निविष्ठा सभासद शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे. याविषयी मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्याचे काम महाराष्ट्र फेडरेशन तर्फे केले जाते.
लक्ष्मी कृषी विकास प्रोडूसर कंपनी च्या माध्यमातून मंगळवेढा,पंढरपूर, सांगोला, माळशिरस तालुक्यातील उत्कृष्ट कार्याची दखल घेत फेडरेशनचे राज्य उपाध्यक्ष पदी त्यांची निवड करण्यात आली आहे.
फेडरेशनच्या माध्यमातून येणाऱ्या काळात जिल्हानिहाय शेतीपूरक व्यवसायाचे व प्रक्रिया उद्योगाचे क्लस्टर स्थापन केले जाणार असून शेती मालाच्या किंमतीत वाढ करण्यासाठी विशेष प्रयत्न फेडरेशन येणाऱ्या काळात करणार आहे.
तसेच गाव खेड्यामध्ये तयार होणारे शेतमाल हा परदेशी कंपन्यांना तसेच परदेशात पोहोचवण्याचे काम येणाऱ्या काळात फेडरेशन मार्फत करण्यात येणार आहे.
या फेडरेशनच्या कार्यामुळे शेतकरी बांधवांचे हित तसेच शेती पूरक व्यवसाय यांच्या वाढीस चालना मिळणार आहे शेतकरी बांधवासाठी उत्कृष्ट कार्य करण्याची संधी या माध्यमातून तुळशीदास कारंडे यांना उपलब्ध झालेली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज