mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढ्याच्या मातीमध्ये शिवाजी महाराजांचा मुक्काम होता ही एक खरोखरच अभिमानास्पद घटना : प्रा.नितीन बानुगडे पाटील

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 16, 2021
in मंगळवेढा, सोलापूर
मंगळवेढ्याच्या मातीमध्ये शिवाजी महाराजांचा मुक्काम होता ही एक खरोखरच अभिमानास्पद घटना : प्रा.नितीन बानुगडे पाटील

टीम मंगळवेढा टाइम्स ।

शिवचरित्र डोक्यावर घेऊन नाचायचा नाही तर डोक्यात घालायचा विषय आहे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध वक्ते प्रा.नितीन बानुगडे पाटील यांनी व्यक्त केले ते सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या शिवचरित्र या विषयावर व्याख्यान देताना बोलत होते.

व्याख्यानाचे उदघाटन धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा शिवाजीराव काळुंगे,बाबुभाई मकानदार,हिरालाल बागवान, जयदीप रत्नपारखी,प्रभाकर घुले,अजीम शेख,विष्णुपंत जगताप,पांडुरंग नकाते,संतोष बुरकुल,युवराज लुगडे,मंडळाचे अध्यक्ष प्रशांत गायकवाड ज्ञानेश्वर कौंडुभैरी आदी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.

१८ नोव्हेंबर १६६५ रोजी मंगळवेढ्याच्या मातीमध्ये शिवाजी महाराजांचा मुक्काम होता ही एक खरोखरच अभिमानास्पद घटना आहे.

रयतेचा लोक कल्याणकारी राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची जगाला संपूर्ण ओळख आहे जो पेरतो तोच या मातीत कर्ता होतो उर्मी,ध्येय डोळ्यासमोर ठेवून अनेक नरदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये निर्माण केले.

वतनदारी मोडीत काढून वेतनदारी देणारा जगातील पहिला राजा म्हणुन छत्रपती शिवाजी महाराजांची खरी ओळख आहे ज्याला शेतात नांगर धरता येतो त्याला हातात तलवार धरण्याचे सामर्थ्य छत्रपतींनी निर्माण केले ११० किल्ले बांधून स्वराज्याचे रक्षण करणे त्याचबरोबर प्रत्येकाच्या हाताला काम मिळावे हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून शिवछत्रपतींनी रयतेची काळजी घेतली.

अर्थव्यवस्था गतिमान करण्यासाठी छत्रपतींनी फार मोठे कार्य केले आयात निर्यातीचे धोरण महाराजाकडून शिकले पाहिजे सुरतला जाऊन छापा टाकून छपाईचे यंत्र ताब्यात घेऊन देशातील श्री शिवाजी छापखाना म्हणून सुरू केला व तो आज देखील सुरत मध्ये मानाने उभा आहे प्रत्येक तरुणांनी मला ते होणार नाही, जमणार नाही अशी नकारार्थी वृत्ती न बाळगता आयुष्यात काटेकोरपणे नियोजन करून अंमलबजावणी केली.

तर यश निश्‍चितपणे मिळेल असा विचार व्यक्त करून छत्रपती शिवाजी महाराज अफजलखान भेटीचा असणारा प्रसंग उभा करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची व पराक्रमाची आठवण करून दिली.

एवढ्या मोठ्या संख्येने महिला भगिनी व रसिक श्रोते उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा विनायक कलुबर्मे यांनी केले तर आभार भारत मुढे यांनी मानले

ADVERTISEMENT

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढाशिवजयंती
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

धक्कादायक! मंगळवेढ्यातील विवाहित महिलेला पळवून नेवून केला बलात्कार; आरोपीला अटक

पुण्यात 2018 पासून 2023 पर्यंत वेळोवेळी, तरुणी म्हणतेय की? मंगळवेढ्यातील त्या तरुणाने…

February 3, 2023
मनसेचे अमित ठाकरे आज मंगळवेढ्यात; प्रत्येक तालुक्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार

मनसेचे अमित ठाकरे आज मंगळवेढ्यात; प्रत्येक तालुक्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार

February 3, 2023
धाडसी कारवाई! मंगळवेढ्यात पिकअपभरून 23 लाखांचा गुटखा आणला खरा; मात्र पोलिसांनी पकडला

धाडसी कारवाई! मंगळवेढ्यात पिकअपभरून 23 लाखांचा गुटखा आणला खरा; मात्र पोलिसांनी पकडला

February 2, 2023
धक्कादायक! पंढरपुरात तब्बल 137 भाविकांना अन्नातून विषबाधा; होऊ लागला मळमळ-उलटीचा त्रास

धक्कादायक! पंढरपुरात तब्बल 137 भाविकांना अन्नातून विषबाधा; होऊ लागला मळमळ-उलटीचा त्रास

February 2, 2023
मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

मंगळवेढ्यात ‘या’ मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स & मोबाईल शॉपीमध्ये नोकरीची संधी, घडवा एक लखलखते करियर; आजच करा अर्ज

February 2, 2023
दामाजी कारखान्याकडून अँडव्हान्स ऊसबिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा; ‘हा’ प्रकल्प उभारण्यात येणार

आला उन्हाळा! अमर इलेक्ट्रॉनिक्स आयोजित AC सर्विस कैम्प, A.C. कोणताही असो, कोठूनही घेतला असो सर्विस आम्ही देणार; तेही 50% डिस्काउंट सहित; संपर्क:-9975786514

February 2, 2023
शिवशंभो कलेक्शन आता नवीन जागेत; दिवाळी निमित्त खरेदीवर 10 टक्के डिस्काउंट

मंगळवेढ्यात कपड्यांचा अनोखा मॉल; 10 हजारांच्या खरेदीवर अनामिका क्लॉथ सेंटरकडून पाच हजारांची खरेदी मोफत

February 2, 2023
उत्सुकता संपली! दामाजी कारखान्याच्या अध्यक्षपदी शिवानंद पाटील तर उपाध्यक्षपदी ‘हे’ नाव निश्चित; आज होणार शिक्कामोर्तब

दामाजी कारखान्याकडून अँडव्हान्स ऊसबिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा; ‘हा’ प्रकल्प उभारण्यात येणार

February 2, 2023
अंगणवाडी सेविकांची निघाली भरती, सोलापूर जिल्ह्यात ‘एवढ्या’ जागा; शिक्षण अट, उमेदवार निवडीचा अधिकार, अर्ज प्रक्रिया सविस्तर माहिती जाणून घ्या..

अंगणवाडी सेविकांची निघाली भरती, सोलापूर जिल्ह्यात ‘एवढ्या’ जागा; शिक्षण अट, उमेदवार निवडीचा अधिकार, अर्ज प्रक्रिया सविस्तर माहिती जाणून घ्या..

February 3, 2023
Next Post
पंढरपूर ब्रेकिंग! कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल-रुक्मिणीचे मुखदर्शन तीन दिवस बंद राहणार

लगीन देवाचं! पंढरपुरात रंगला विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा

ताज्या बातम्या

धक्कादायक! मंगळवेढ्यातील विवाहित महिलेला पळवून नेवून केला बलात्कार; आरोपीला अटक

पुण्यात 2018 पासून 2023 पर्यंत वेळोवेळी, तरुणी म्हणतेय की? मंगळवेढ्यातील त्या तरुणाने…

February 3, 2023
मनसेचे अमित ठाकरे आज मंगळवेढ्यात; प्रत्येक तालुक्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार

मनसेचे अमित ठाकरे आज मंगळवेढ्यात; प्रत्येक तालुक्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार

February 3, 2023
धाडसी कारवाई! मंगळवेढ्यात पिकअपभरून 23 लाखांचा गुटखा आणला खरा; मात्र पोलिसांनी पकडला

धाडसी कारवाई! मंगळवेढ्यात पिकअपभरून 23 लाखांचा गुटखा आणला खरा; मात्र पोलिसांनी पकडला

February 2, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

दहावी बारावी परीक्षेबाबत विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना, परीक्षेला उशीरा याल तर परीक्षेला मुकाल; यावर्षी असणार असे बदल

February 2, 2023
धक्कादायक! पंढरपुरात तब्बल 137 भाविकांना अन्नातून विषबाधा; होऊ लागला मळमळ-उलटीचा त्रास

धक्कादायक! पंढरपुरात तब्बल 137 भाविकांना अन्नातून विषबाधा; होऊ लागला मळमळ-उलटीचा त्रास

February 2, 2023
मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

मंगळवेढ्यात ‘या’ मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स & मोबाईल शॉपीमध्ये नोकरीची संधी, घडवा एक लखलखते करियर; आजच करा अर्ज

February 2, 2023
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..