mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

दामाजी कारखान्याने मागण्या पूर्ण करण्याची दिली लेखी हमी, स्वाभिमानी संघटनेचे आंदोलन स्थगित

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 23, 2020
in मंगळवेढा

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा येथील संत दामाजी सहकारी कारखान्याने अद्याप शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे पहिली उचल न दिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखान्यासमोर बेमुदत आंदोलन सुरू केले होते.

आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व दामाजी कारखान्याच्या संचालकांमध्ये समझोत्याची बैठक झाली. या बैठकीतून कार्यकारी संचालकाने एफआरपीची रक्कम आठ दिवसात व मागील थकीत 74 रुपयांचे बिल लवकरच देण्याबाबत दिलेल्या लेखी पत्रानुसार स्वाभिमानीने आठव्या दिवशी हे आंदोलन स्थगित केले.

यावेळी स्वाभिमानीचे पश्‍चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष अँड.राहुल घुले,सचिन पाटील, दत्तात्रय गणपाटील, जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, तालुकाध्यक्ष श्रीमंत केदार, राजेंद्र रणे, उपाध्यक्ष शंकर संगशेट्टी, हर्षद डोरले, रणजित बागल, रोहित भोसले, राहुल खांडेकर, सुधाकर मेटकरी, अनिल बिराजदार, अनिल अंजुटगी,

बाहुबली सावळे, संदीप पाटील, विजय पाटील, संदीप तळ्ळे, धनंजय पाटील, संभाजी पाटील आदींसह कारखान्याचे संचालक लक्ष्मण जगताप, भुजंगा आसबे, भारत निकम, कार्यकारी संचालक झुंजार आसबे, दगडू फटे उपस्थित होते.

जिल्ह्यात साखर कारखाने सुरू होऊन दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी गेला; परंतु एफआरपीप्रमाणे उसाचा दर अदा न केल्यामुळे शेतकऱ्यांबरोबर बहुतांश संघटनांनी जिल्ह्यातील अनेक कारखान्यांसमोर आंदोलने केल्यावर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी साखर कारखानदारांची बैठक घेऊन ऊस उत्पादकांना एफआरपीचा निर्णय 15 डिसेंबरपूर्वी घ्यावा, अशा सूचना दिल्या.

शेतकऱ्यांना एफआरपी व मागील गळीत हंगामातील 74 रुपये बिल न दिल्याच्या कारणामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन करण्यात आले.

दोन दिवसांपूर्वी कार्यकारी संचालकांनी कारखान्याची आर्थिक परिस्थिती, साखरेचे दर, साखर उतारा पाहता एफआरपीची रक्कम व उर्वरित बिल लवकर देण्याबाबत ठेवलेला प्रस्ताव संघटनेने अमान्य केला.

या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट घेऊन या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केल्यावर त्याबाबतचा अहवाल साखर सहसंचालकांकडे पाठवण्यात आला.

संचालकांनी देखील ही रक्कम शेतकऱ्यांना तातडीने अदा करण्याच्या सूचना दिल्या. शेवटी आठव्या दिवशी यात तोडगा निघाल्याने आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: दामाजी कारखानास्वाभिमानी शेतकरी संघटना

संबंधित बातम्या

राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले! मंगळवेढ्यात लवकरच फिरणार ‘बुलडोझर’; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश; ‘या’ चौकात होणार कारवाई

August 31, 2026
​स्मृतीवंदन! स्व.सुभाषराव शहा यांच्या स्मृतींना ‘सेवाकार्याने’ अभिवादन; १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम

रतनचंद शहा बँकेचे माजी चेअरमन स्व. सुभाषराव शहा यांची आज ८२ वी जयंती; मंगळवेढ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

August 31, 2026
कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून ‘सायकल बँक’ उपक्रम सुरु; आज विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वृद्धाश्रमात ‘मिष्टान्न भोजनाचे’ आयोजन; सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श

August 31, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

साप चावला तर जबाबदार कोण? मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ शाळेतील धोकादायक इमारतीच्या अवशेषांवरून पालकांचा प्रशासनाला थेट सवाल

August 30, 2026
धर्मगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! बहुजन साहित्य संघाच्या राज्य संमेलनात कै. बाबुराव जाधव विद्यालयाला आदर्श शाळा पुरस्कार

धर्मगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! बहुजन साहित्य संघाच्या राज्य संमेलनात कै. बाबुराव जाधव विद्यालयाला आदर्श शाळा पुरस्कार

August 30, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

राखी पौर्णिमेच्या दिवशीच काळाचा घाला: बहिणीकडे राखी बांधण्यासाठी गेलेल्या भावाचा भीषण अपघातात मृत्यू; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावावर शोककळा

August 29, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

विठाई परिवार बँकेचा उद्या तिसरा वर्धापन दिन; अवघ्या ३ वर्षांत १५० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पूर्ण; मोफत आरोग्य तपासणी आणि महिलांसाठी रक्षाबंधन विशेष ठेव योजना जाहीर

August 27, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

काम कागदावर, पैसे खिशात! ‘या’ गावात बोगस बिले काढून लाखोंचा अपहार; मंगळवेढा BDO कडे तक्रार दाखल

August 27, 2026
मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यास राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

संतभूमी मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांची वज्रमूठ; पक्षभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन

August 30, 2026
Next Post
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापुरात, भालके कुटुंबियांची घेणार भेट

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापुरात, भालके कुटुंबियांची घेणार भेट

ताज्या बातम्या

राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले! मंगळवेढ्यात लवकरच फिरणार ‘बुलडोझर’; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश; ‘या’ चौकात होणार कारवाई

August 31, 2026

जमीन मालकांसाठी मोठी खूशखबर! वारंवार मोजणीच्या त्रासातून अन् खर्चातून मुक्तता; शासकीय कार्यालयांमध्ये पुन्हा मोजणीची अट रद्द

August 31, 2026
​स्मृतीवंदन! स्व.सुभाषराव शहा यांच्या स्मृतींना ‘सेवाकार्याने’ अभिवादन; १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम

रतनचंद शहा बँकेचे माजी चेअरमन स्व. सुभाषराव शहा यांची आज ८२ वी जयंती; मंगळवेढ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

August 31, 2026
कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून ‘सायकल बँक’ उपक्रम सुरु; आज विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वृद्धाश्रमात ‘मिष्टान्न भोजनाचे’ आयोजन; सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श

August 31, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

साप चावला तर जबाबदार कोण? मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ शाळेतील धोकादायक इमारतीच्या अवशेषांवरून पालकांचा प्रशासनाला थेट सवाल

August 30, 2026
धर्मगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! बहुजन साहित्य संघाच्या राज्य संमेलनात कै. बाबुराव जाधव विद्यालयाला आदर्श शाळा पुरस्कार

धर्मगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! बहुजन साहित्य संघाच्या राज्य संमेलनात कै. बाबुराव जाधव विद्यालयाला आदर्श शाळा पुरस्कार

August 30, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..