टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज 96 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आज एकाच दिवशी 200 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. कोरोना चाचणीचे 41 अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत.
आज कोरोना चाचणीचे 1 हजार 375 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 1 हजार 279 अहवाल निगेटिव्ह आले असून 96 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचेही आजच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. ग्रामीण भागातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 35 हजार 578 झाली आहे.
त्यातील 32 हजार 888 जण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्णालयात सध्या 1 हजार 649 ऍक्टिव्ह कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
कोरोनामुळे आतापर्यंत 1 हजार 41 जणांचा मृत्यू झाला आहे.
आज ‘या’ गावातील मृत्यू
अक्कलकोटमधील भारत गल्ली येथील 78 वर्षीय पुरुष असून त्यांना 21 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता कुंभारी येथील अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
30 नोव्हेंबरला सकाळी 8 च्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ग्रामीण भागातील 12 हजार 9 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. इन्स्टिट्यूशन क्वारंटाईनमध्ये अद्यापही 3 हजार 86 जण आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज