टीम मंगळवेढा टाईम्स।
विठ्ठल सहकारी कारखाना अडचणीतून बाहेर काढणे. मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावाचा पाणी प्रश्न मिटवणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री पाटील यांनी सांगितले.
आ. भारत भालके यांच्या निधनानंतर चा तिसऱ्या दिवशी च्या विधीसाठी व श्रद्धांजली वाहण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सरकोली (ता.पंढरपूर) येथे आले होते.
त्यावेळी ते बोलत होते. या दरम्यान आ. भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके व व्यकंटेश भालके यांनी तिसऱ्या दिवशीचे सर्व विधी पार पाडले.
पुढे पाटील म्हणाले, कोरोनामुळे सगळ्यात जादा पंढरपूरचे फार मोठे नुकसान झाले आहे. दिग्गज माणसं गेली. उपचारा दरम्यान आ. भालके नागरिकांचे प्रश्न सोडवत होते.
शेवटपर्यंत ते विठ्ठल सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी त्यांचे प्रयत्न होते. असे नेते खूप कमी असतात. अशा नेत्याचे निधन झाले यामुळे पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे फार मोठे नुकसान झाले आहे.
आमदार भालके सातत्याने मंत्रालयात येत होते. आजारी असल्यामुळे तुम्ही मंत्रालयात येऊ नका, आम्ही तुमची कामे मार्गी लावतो, असे आम्ही सर्वजण त्यांना सातत्याने सांगत होतो.
परंतु, कारखान्याच्या कामगारांना आणि सभासद शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, काम मार्गी लागल्याशिवाय मी जाणार नाही, अशी त्यांची चिकाटी होती.
दवाखान्यात आजारी असताना देखील भालके हे विठ्ठल कारखान्याच्या संदर्भात सातत्याने मोबाईलवरून पाठपुरावा करत होते. विठ्ठल कारखान्याचे धुराडे त्यांच्या चिकाटीमुळेच पेटू शकले.
यावेळी पालकमंत्री मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, आ. दीपक साळुंखे, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे व्हॉईस चेअरमन लक्ष्मण पवार, धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, रीपाई युवक आघाडीचे उपाध्यक्ष किर्तिपाल सर्वगोड, बबनराव आवताडे, संतोष सुळे, नागेश भोसले, किरण घाडगे, संदीप मांडवे, सुधीर धुमाळ यांच्यासह पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज