टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज 144 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आजच्या अहवालाच्या एकाच दिवशी 93 कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
आज कोरोना चाचणीचे 2 हजार 986 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 2 हजार 842 अहवाल निगेटिव्ह आले असून 144 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
कोरोनामुळे चार जणांचा मृत्यू झाल्याचेही आजच्या या अहवालातून स्पष्ट झाले आहे. कोरोना चाचणीचे 58 अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत.
ग्रामीण भागातील अकरा हजार 828 जण सध्या होम क्वारंटाईनमध्ये आहेत. 2 हजार 610 जणांना सध्या इन्स्टिट्युन्शल क्वारंटाईन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील एकूण कोरोना बाधित व्यक्तींची संख्या आता 35 हजार 103 झाली आहे.
आजपर्यंत ग्रामीण भागातील 1 हजार 30 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.रुग्णालयात सध्या 1 हजार 810 ऍक्टिव्ह कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ग्रामीण भागातील 32 हजार 263 जण आत्तापर्यंत कोरोना मुक्त झाले आहेत.
आज ‘या’ भागातील रुग्णांचे मृत्यू
माळशिरसमधील 55 वर्षीय महिला व 85 वर्षीय पुरुष, पंढरपूर मधील गडम बिल्डींग मधील 71 वर्षिय पुरुष व करमाळा तालुक्यातील सालसे येथील 75 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज