mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

खबरदार! बेडशीट गॅंगच्या नावाने खोटे संदेश सोशल मीडियावर व्हायरल करणारे पोलिसांच्या निशाण्यावर

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 23, 2020
in क्राईम, मंगळवेढा

बेडशीट व इतर वस्तू विकणाऱ्या पासून सावध रहा हे दरोडेखोर आहेत हे सर्व गावातील ग्रुपवर पाठवा असा मंगळवेढा पोलिस ठाण्याच्या नावाने खोटा व बनावट संदेश तयार करून ते सोशल मीडियावर ‘व्हायरल’ केला जात आहे.

याप्रकरणी पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांनी चौकशी सुरू केली आहे. कोणतीही पोस्ट खातरजमा जमा न करता नागरिकांत भीती निर्माण होईल असे खोटे मेसेज व्हाट्सआप वर पसरवणाऱ्या व्यक्तींचा सायबर गुन्हे शाखेमार्फत शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांनी दिला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, गेले काही दिवस सोशल मीडियावर विशेषतः व्हॉट्‌स अपवर  सौजन्य मंगळवेढा पोलीस स्टेशन यांच्या नावाने बोगस संदेश फिरत आहेत. चुकीची माहिती देणारे हे आवाहन करणारे संदेश व्हायरल होत आहेत.

बेडशीटसह वस्तू विकणारे दरोडेखोर आहेत अशा चुकीच्या मेसेजमुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण होत आहे.याबाबत पोलीस निरीक्षक गुंजवटे यांच्याशी संपर्क साधला असता  त्यांनी हा मेसेज चुकीचा आहे.

अशा प्रकारचे कोणतेही आवाहन मंगळवेढा पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले नसल्याची माहिती  दिली.त्यामुळे नागरिकांनी असे बेडशीट विकणाऱ्याबद्दल मंगळवेढा पोलीस ठाण्याच्या नावाने असणारे संदेश, आवाहन कोणतीही खात्री न करता पुढे पाठवू नयेत.

माहितीची सत्यता पडताळावी याबाबत पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा. व्हाट्सआप अडमिन नी असे मेसेज पाठवणाऱ्याला समज द्यावी अशा खोट्या अफवा पसरणे, खोटी माहिती पसरवणे हा गुन्हा असून मंगळवेढा पोलीस व  सायबर क्राईम पोलीस अशा घटनांवर लक्ष ठेवून आहेत. संबंधितांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात येणार आहे.

अफवेने घेतला होता पाच जणांचा जीव
खवे येथील नाथपंथी (डवरी) समाजाचे लोक धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे भिक्षा मागावयास गेल्यानंतर तेथील ग्रामस्थांनी मुले पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरून पाच लोकांना ग्रामपंचायतमध्ये कोंडुन बेदम मारहाण केली होती.

यामध्ये या पाच लोकांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली होती अशाप्रकारे अशा खोट्या मेसेज निष्पाप लोकांचा हकनाक जीव जाऊ शकतो याचे भान ठेवले पाहिजे. यासाठी गावोगावच्या पोलिस पाटील यांनी मुसाफिरी रजिस्टर मध्ये अनोळखी विक्रेत्यांची मोबाईल नंबर, आधार कार्ड अशी माहिती अद्ययावत ठेवावी.

सोने पॉलिश करून देणारे अथवा चेकिंग चालू आहे पोलीस असल्याचे सांगून सोने लाबवणाऱ्यापासून सावध रहा पोलीस अशा प्रकारे कोणालाही सोने देण्याबाबत सांगत नाहीत तरी नागरिकांनी एकाद्या अनोळखी व्यक्ती बदल संशय आल्यास थेट मंगळवेढा पोलिस ठाण्यात संपर्क करावा.

पोलीस सर्वोतोपरी तुमच्या मदतीला तयार असल्याचे आवाहन पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांनी केले आहे.(लोकमत)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढा पोलीस स्टेशन

संबंधित बातम्या

खळबळ! सोलापूरात महिलेवर अत्याचारप्रकरणी एका पोलिस निरीक्षकावर गुन्हा दाखल

माझा इतिहास भयानक, जेलमधून बाहेर आल्यावर सोडणार नाही; शासकीय कामादरम्यान बीएलओंसमोरच ताणली रिव्हॉल्व्हर; SIR नोंदणीवेळी थेट रिव्हॉल्व्हर रोखून धमकी

August 8, 2026
वाहतूक पोलिसाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

चालू हॉटेल मागून येऊन पेटवले, एक लाखाचे नुकसान; अज्ञात विकृतावर मंगळवेढ्यात गुन्हा दाखल; मंगळवेढ्यात नेमकं काय घडलं

August 8, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

मोठी खळबळ! मंगळवेढ्यात २६ वर्षीय विवाहित महिलेचे टोकाचे पाऊल; स्वयंपाक खोलीत ओढणीने घेतला गळफास; आत्महत्येचे कारण…

August 8, 2026
​मंगळवेढ्यातील महिलांनो सावधान! मॉर्निंग वॉक दरम्यान शिक्षिकेसोबत घडला धक्कादायक प्रकार

मंगळवेढ्यात मॉर्निंग वॉकला गेलेल्या ७१ वर्षीय महिलेचे सोन्याचे गंठण लांबवले; महिनाभरात दुसरी घटना, महिलांमध्ये घबराट

August 7, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

​मंगळवेढा हादरला! मुदतबाह्य दही, ताक आणि लस्सी बाजारात; ‘या’ दूध डेअरीवर एफडीएचा सर्जिकल स्ट्राईक; ​तुकाराम मुंढेचा दणका

August 7, 2026
स्वप्नातील घरासाठी नागरिकांची तुफान पसंती; ‘दामाजी सिटी’ ठरतेय मंगळवेढ्यातील पहिली पसंती; भरघोस प्रतिसादानंतर अंतिम टप्प्यात बुकिंग; 9890605962 आजच संपर्क साधा

स्वप्नातील घरासाठी नागरिकांची तुफान पसंती; ‘दामाजी सिटी’ ठरतेय मंगळवेढ्यातील पहिली पसंती; भरघोस प्रतिसादानंतर अंतिम टप्प्यात बुकिंग; 9890605962 आजच संपर्क साधा

August 8, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

मंगळवेढ्यात कर्जमाफीचा मोठा धमाका! ‘त्या’ एकाच गावातील ३५६ शेतकऱ्यांना जॅकपॉट

August 5, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्याने पूर्ण कर्ज फेडले, तरीही बँकेने जमीन परस्पर विकली; पोलिसांनीही माणुसकी सोडली, जबरदस्तीने जमिनीचा ताबा

August 4, 2026

कुत्रा पाळताय? मग खबरदार! श्वानाने बालिकेला चावल्यानंतर सोलापुरात मालकावर गुन्हा; ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शक्यता

August 4, 2026
Next Post
कौतुकास्पद! मंगळवेढा येथील इंग्लिश स्कूलचे 67 विद्यार्थी गुणवत्ता यादीत

कौतुकास्पद! मंगळवेढा येथील इंग्लिश स्कूलचे 67 विद्यार्थी गुणवत्ता यादीत

ताज्या बातम्या

खळबळ! सोलापूरात महिलेवर अत्याचारप्रकरणी एका पोलिस निरीक्षकावर गुन्हा दाखल

माझा इतिहास भयानक, जेलमधून बाहेर आल्यावर सोडणार नाही; शासकीय कामादरम्यान बीएलओंसमोरच ताणली रिव्हॉल्व्हर; SIR नोंदणीवेळी थेट रिव्हॉल्व्हर रोखून धमकी

August 8, 2026
वाहतूक पोलिसाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

चालू हॉटेल मागून येऊन पेटवले, एक लाखाचे नुकसान; अज्ञात विकृतावर मंगळवेढ्यात गुन्हा दाखल; मंगळवेढ्यात नेमकं काय घडलं

August 8, 2026
माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

​ग्रामीण तरुणाईला गावातच रोजगाराची सुवर्णसंधी; ‘कृषि उद्योजक निवड अभियानाला प्रारंभ; ‘माणगंगा परिवार’ आणि ‘ई-ॲग्री दुकान’चा ग्रामीण युवकांसाठी मोठा पुढाकार

August 8, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

मोठी खळबळ! मंगळवेढ्यात २६ वर्षीय विवाहित महिलेचे टोकाचे पाऊल; स्वयंपाक खोलीत ओढणीने घेतला गळफास; आत्महत्येचे कारण…

August 8, 2026
​मंगळवेढ्यातील महिलांनो सावधान! मॉर्निंग वॉक दरम्यान शिक्षिकेसोबत घडला धक्कादायक प्रकार

मंगळवेढ्यात मॉर्निंग वॉकला गेलेल्या ७१ वर्षीय महिलेचे सोन्याचे गंठण लांबवले; महिनाभरात दुसरी घटना, महिलांमध्ये घबराट

August 7, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

​मंगळवेढा हादरला! मुदतबाह्य दही, ताक आणि लस्सी बाजारात; ‘या’ दूध डेअरीवर एफडीएचा सर्जिकल स्ट्राईक; ​तुकाराम मुंढेचा दणका

August 7, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..