फायनान्स व भिशीच्या माध्यमातून जास्त फायदा होण्याचे आमिष दाखवून प्रवीण रामजी पुजारी (रा. लेप्रसी कॉलनी, जीवन विकास नगर, कुमठा नाका) यांना साडेआठ लाख रुपयांना फसविल्याप्रकरणी चौघांविरुद्ध जेलरोड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
लक्ष्मीकांत लक्ष्मीनारायण कुरापाटी, अंबिका कुरापाटी, पूजा कुरापाटी (सर्वजण रा. वरद फायनान्स, सत्तर फूट रोड), नागेश पाचकंटी असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
कुरापाटी हे पिग्मी गोळा करण्यासाठी येत असल्याने पुजारी यांची चांगली ओळख झाली. त्या ओळखीतून ही रक्कम पुजारी यांनी संबंधितांना दिली होती. काही दिवसांनी पुजारी यांना पैशाची गरज पडली आणि त्यांनी कुरापाटी यांच्याकडे पैशांची मागणी केली.
मात्र, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.
दुकानदाराची नजर चुकवून दुकानातून पळविला मोबाईल
मोबाईल दुकानात मोबाईलचा स्टॉक लावत असताना दुकानदाराची नजर चुकवूनचोरट्याने मोबाईल चोरून नेला.
नितीन मोबाईल मॉल, नवी पेठेत ही घटना घडली आहे. या प्रकरणी सोमनाथ भीमाशंकर गायकवाड (रा. उत्तर कसबा, लोणार गल्ली) यांनी फौजदार चावडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादी सोमनाथ यांचे लक्ष नसल्याचा फायदा घेऊन व नजर चुकवून चोरट्याने मोबईल चोरून नेला.
या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलिस ठाण्यात झाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक श्री. पैकेकरी हे करीत आहेत.
पाच लाख रुपये आण म्हणून विवाहितेचा केला छळ
माहेरून पाच लाख रुपये घेऊन ये म्हणून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पती विनोद पारीख, भगीरथ पारीख, शांताबाई पारीख, महेंद्रकुमार पारीख, अर्चना पारीख (सर्वजण रा. सद्गुरू समर्थ सोसायटी, कांचन नगर, शेळगी) यांच्याविरुद्ध जोडभावी पेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
पूजा विनोद पारीख यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. विवाहानंतर चार ते पाच महिन्यांनी सासरकडील मंडळींनी बिझनेस करण्यासाठी माहेरून पैसे आण म्हणून शिवीगाळ करून दमदाटी करत मारहाण केली.
माहेरून पैसे आणले तरच नांदवणार म्हणून वारंवार मारहाण करीत होते, असेही फिर्यादीने पोलिसांना सांगितले. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक श्री. दाईंगडे हे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज