mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

वायरमनला अतिरिक्त कामाचा बोजा; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मंगळवेढा महावितरणचे कर्मचारी असुरक्षित

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 28, 2020
in मंगळवेढा
वायरमनला अतिरिक्त कामाचा बोजा; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मंगळवेढा महावितरणचे कर्मचारी असुरक्षित

 

अलीकडच्या काही दिवसांमध्ये मंगळवेढा तालुक्‍यातील महावितरणमध्ये कार्यरत असणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाल्याने महावितरणचे कर्मचारीच असुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले.

तालुक्‍यामध्ये विजेची मागणी वाढल्यामुळे वीज सबस्टेशनची संख्यादेखील वाढली आहे. अशा परिस्थितीत महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या कामाप्रमाणे मनुष्यबळ उपलब्ध करणे आवश्‍यक आहे. परंतु, आवश्‍यक त्या प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध केले नाही. अशा परिस्थितीत मंगळवेढा येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर त्यांच्या दैनंदिन कामाबरोबरच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या रोषाला देखील सामोरे जावे लागत आहे.

एका बाजूला विद्युत पुरवठा सुरळीत ठेवताना त्यांना जीव धोक्‍यात घालावे लागत आहे. विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर ग्राहकांकडून होणाऱ्या त्रासालाही सामोरे जावे लागते आणि ग्राहकांकडून थकीत बिलाची वसुली करताना विलंब झाल्यास अधिकारी व कर्मचाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या रोषालाही सामोरे जावे लागते. या दुहेरी कात्रीत सापडलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कौटुंबिक स्वास्थ्यासाठी देखील संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे.

अशा परिस्थितीत एखाद्या कर्मचाऱ्याकडे दोन ते तीन गावांचा कारभार आहे. त्यामध्ये महावितरणने ग्राहकांना वीज पुरवठा करताना सिंगल फेज आणि थ्री फेज अशी स्वतंत्र लाइन टाकून वीज पुरवठा केला आहे. त्यामुळे विजेमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर दोन्ही फिडर बंद ठेवावे लागतात. दुरुस्तीसाठी विलंब झाल्यास मात्र ग्राहकांकडून “जो भाग बंद आहे तोच भाग बंद ठेवावा, उर्वरित भाग का चालू ठेवला नाही’ असे शाब्दिक प्रहार सहन करावे लागतात.

कोरोनाच्या सात महिन्यांच्या काळात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आरोग्य, पोलिस आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांइतकेच ताकदीने काम करत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी योगदान दिले आहे. त्यांच्या कामाबद्दल कुठेही कौतुकाचे दोन शब्द व्यक्त केले जात नाहीत, अशी खंत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. शिवाय वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे कायम कर्मचारी सामोरे जातात; परंतु महावितरणच्या सबस्टेशनमध्ये कार्यरत कर्मचारी हे आउटसोर्सिंगचे आहेत. त्यांना महावितरणमधील बहुतांश कामांचा अनुभव नसतो. त्यामुळे त्यांच्याकडून सुद्धा एखादी चूक घडल्यानंतर महावितरण त्यांच्यावर कोणती कारवाई करणार, हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे.

एकाच कर्मचाऱ्याकडे जास्त गावे असल्यामुळे बिघाड दुरुस्ती करण्यासाठी चक्क ऑपरेटरला ते काम करावे लागले. त्यात त्याचा बळी गेल्यानंतर त्याची जबाबदारी त्याच्यावर ढकलण्यात येते. आतापर्यंत या कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर महावितरण या कुटुंबांकडे कसलेच लक्ष दिले नसल्याची नाराजी त्यांच्या नातेवाइकांनी व्यक्त केली. परंतु तालुक्‍यात महावितरणमध्ये असलेली रिक्त पदे भरण्याच्या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले आहे. नवीन कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची यादी प्रसिद्ध झाली; परंतु त्यांना नियुक्तिपत्र न दिल्यामुळे त्या कर्मचाऱ्यांवर कामाचा भार वाढला आहे. त्यांना नियुक्तिपत्र दिल्यास सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण काही अंशी कमी होणार आहे.

मागील पाच वर्षांच्या काळात विरोधी पक्षाचा आमदार म्हणून आमदार भारत भालके यांच्या मतदारसंघात तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केले; परंतु सध्या आमदार भालके हे सत्ताधारी पक्षाचे आहेत; किमान तालुक्‍यामध्ये असलेली महावितरणची रिक्त पदे भरावीत, कामामध्ये योग्य सुसूत्रता आणावी, स्थानिक कर्मचाऱ्यांना कामाच्या अतिरिक्त जबाबदारीतून मुक्त करावे, यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी होत आहे.(सकाळ)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढामहावितरण कर्मचारी

संबंधित बातम्या

पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

माझ्या जिवाला आईकडूनच धोका! तरुणीच्या उत्तराने पोलीसही चक्रावले; विवाह नोंदणीत कुटुंबप्रमुखाची संमती सक्तीची हवी; एका आईच्या अश्रूंनी पेटवला नवा सामाजिक प्रश्न; वारी परिवारानी केली मोठी मागणी

September 21, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

मतदार यादीतून तुमचं नाव तर गायब नाही ना? मंगळवेढेकरांसाठी ‘इतके’ दिवस अत्यंत महत्त्वाचे; विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन

September 20, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

मांडव उधळला! साखरपुडा झाला, मांडवही सजला… पण ऐनवेळी पोलिस पोहोचले; मंगळवेढ्यात बालविवाह रोखत पालकांना दणका; लिहून घेतले ‘हे’ हमीपत्र

September 17, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील सराईत गुन्हेगार महादेव इरकरवर MPDA; पोलिसांकडून मुसक्या आवळत येरवड्यात रवानगी

September 18, 2026
सदगुरू बागडे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज श्रीक्षेत्र मारोळी येथील मठावर विविध कार्यक्रमाचे आयोजन; ह.भ.प संदेश भोसले महाराज यांची माहिती

मारोळीत उसळणार भक्तीसागर! बागडे बाबांच्या पुण्यतिथीचा सोहळा आज उत्साहात संपन्न होणार ​भक्तांच्या उपस्थितीत होणार पुष्पवृष्टी; मठाधिपती संदेश भोसले महाराजांचे उपस्थितीचे आवाहन

September 17, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

राजकीय भूकंप! आता थांबायचं नाय, अनिल सावंतांना विधानसभेत पाठवायचंच; विठ्ठल परिवारातून थेट बंडाचे निशाण, प्रस्थापितांना उघड आव्हान

September 16, 2026
अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

September 15, 2026
माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

सेवेचा संकल्प, विकासाचा ध्यास! नितीन आबासाहेब इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला ते मंगळवेढ्यापर्यंत विधायक कार्याचा झंझावात; माणगंगा परिवारातर्फे महाआरोग्य शिबीराचे आयोजन

September 15, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्यात तोतया पोलिसांची दहशत; खुनाचा बनाव रचून शेतकऱ्याचे दागिने लंपास; एकाच दिवशी दोन घटनांनी खळबळ

September 14, 2026
Next Post
फायनान्स कंपनीची मुजोरी! मंगळवेढ्यात सामाजिक कार्यकर्त्यास दिली जीवे मारण्याची धमकी

सावधान! ऑनलाईन शॉपिंगमधून स्मार्टफोन्स मागवताय मग 'ही' बातमी वाचा

ताज्या बातम्या

नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मोठा निर्णय! सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांचा होणार कायापालट; वाचा सविस्तर योजना

September 22, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

समाज माध्यमावरील व्हायरल दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी खोटी; अफवांवर विश्वास ठेवू नका; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

September 22, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

माझ्या जिवाला आईकडूनच धोका! तरुणीच्या उत्तराने पोलीसही चक्रावले; विवाह नोंदणीत कुटुंबप्रमुखाची संमती सक्तीची हवी; एका आईच्या अश्रूंनी पेटवला नवा सामाजिक प्रश्न; वारी परिवारानी केली मोठी मागणी

September 21, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! तुकाराम मुंढे यांच्या प्रयत्नांना यश; रुग्णांना मिळणार ‘हा’ मोठा दिलासा; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

September 20, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

मतदार यादीतून तुमचं नाव तर गायब नाही ना? मंगळवेढेकरांसाठी ‘इतके’ दिवस अत्यंत महत्त्वाचे; विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन

September 20, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

​जमीन खरेदी-विक्रीत मोठा बदल! महाराष्ट्रात लवकरच ‘लँड टायटलिंग कायदा’; जमिनीच्या वादांवर सरकारचा कायमचा तोडगा

September 20, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा