देवानंद पासले । मोहोळ तालुक्यात चक्रीवादळाने व पुराणे झालेल्या नुकसानीची बाळराजे पाटील व अजिंक्यराणा पाटील यांनी केली पाहणी आ.यशवंत माने यांच्यासोबत पंचनामे करून मदत मिळवून देण्याच्या दिल्या सूचना
मोहोळ तालुक्यातील सीना, भीमा, नागाझिरा या नद्यांना पूर आल्यामुळे मोहोळ तालुक्यातील बर्याच गावांना याचा फटका बसला असून शेतकर्यांची उभी पिके पाण्यात तर गेलीच आहेत मात्र जमिनीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
बळीराजा अडचणीत असताना लोकनेते कारखान्याचे चेअरमन तथा जि प सदस्य बाळराजे पाटील यांनी मोहोळ तालुक्यातील सौंदणे, पासलेवाडीसह अन्य ठिकाणी पाण्यात उतरत नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करीत शेतकर्यांना शासकीय मदत मिळेपर्यंत आधार देत त्यांना मदत केली.
राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकार्यांनी आणि कार्यकर्त्यांनी प्रशासकीय उपाययोजनांची वाट न पाहात माजी आमदार राजन पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार गावागावामध्ये पुरात आडकलेल्या लोकांना सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत, माणुसकीच्या भावनेने सुरक्षित ठिकाणी हलवत मदत केली.
सीना नदी काठावरील अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने सर्वच गावांतील पूरग्रस्तांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेणार असल्याचे बाळराजे यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी भ्रमणध्वनीवरून मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत माने यांना तसेच संबंधित अधिकार्यांना याबाबतचे पंचनामे करून लवकरात लवकर या पूरग्रस्तांना कशी मदत मिळेल यासाठी प्रयन्त करण्याची मागाणी केली.
नंतर केलेल्या पाहणीमध्ये आमदार यशवंत माने यांच्यासोबत सौंदणे आदी भागातील शेतकरांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करीत मदत मिळवून देण्यासाठी प्रशासकीय अधिकार्यांना सूचना दिल्या.
अडचणीत असणार्या सर्व शेतकर्यांच्या पाठीशी लोकनेते परिवार खंबीरपणे उभा आहे. अचानक आलेल्या चक्रीवादळाच्या पावसामुळे सर्व शेतकर्यांचे अतोनात नुकसान झालेले असून शेतात काढणीस आलेले सर्व पिके वाहून गेली आहेत तर राहती घरेदेखील पडलेली दिसत आहेत.
अवकाळी पावसाच्या नुकसाणीमुळे बळीराजा अडचणीत सापडला आहे. माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि विद्यमान आमदार यशवंत माने यांच्या सहकार्याने आम्ही सर्व पदाधिकारी मदत मिळवून देण्यास प्रयत्नशील आहोत.-बाळराजे पाटील, चेअरमन लोकनेते शुगर
Balraje Patil and Ajinkyarana Patil inspected the damage to the farm
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज