पंढरपुरातील चंद्रभागा नदीकडेला असलेला नव्याने बांधण्यात आलेला घाट खचला असून त्यामध्ये चार ते पाच नागरिक दबले गेले आहेत.
दरम्यान, दबलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी भर काढण्यात येत आहे.
या घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी सचिन ढोले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर घटनास्थळी पोहोचले आहेत.
पंढरपूर शहरातील विविध झोपडपट्ट्यांमधील घरांमध्ये शिरले पावसाचे पाणी
पंढरपूर तालुक्यांमध्ये काल रात्रीपासून संततधार पाऊस पडत असल्याने पंढरपूर शहरातील विविध झोपडपट्ट्यांमधील घरांमध्ये पाणी घुसले आहे.
महसूल प्रशासनाने दिनांक 13 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र मध्ये पावसाच्या अतिवृष्टीचा इशारा दिला असून काल रात्रीपासून सुरू झालेला पाऊस आज दुपारी साडे तीन पर्यंत कसलाच न थांबल्यामुळे पंढरपूर शहरातील अनिल नगर आणि विविध भागातील इतर झोपडपट्ट्यांमध्ये ही गोरगरिबांच्या घरामध्ये पाणी घुसले असल्याने त्यांचे कौटुंबिक जीवन विस्कळीत झाले आहे.
शहरांमधील झोपडपट्ट्यांमध्ये नगरपरिषदेच्या वतीने राबवण्यात आलेली भुयार गटर योजना ही करून गेली दोन-तीन वर्ष होऊन गेले आहेत परंतु या गटारी मध्ये घनकचरा तुंबल्यामुळे या गटारी पावसाळी अगोदरच स्वच्छ करणे अपेक्षित असताना हे न केल्यामुळे आज विविध शहरांमधील झोपडपट्टी मधील घरांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे.
त्याचबरोबर संपूर्ण शहरातून शहराच्या कडेने मोठी ड्रेनेज लाईन टाकण्यात आले आहे त्या ड्रेनेज ला या लहान मोठ्या शहरातील घरी गटारी जोडल्या असत्या तर हे पाण्याचा नित्रा मोठ्या गटारीला होऊन गटारी स्वच्छ राहिल्यास त्यांनी झोपडपट्ट्यांमधील घरांमध्ये पाणी घुसले नसते परंतु तसे न केल्यामुळे झोपे पट्ट्यातील रहिवाशांना आता पावसाच्या पाण्यातच राहावे लागणार आहे हे मात्र नक्की.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज