टीम मंगळवेढा टाईम्स । संपुर्ण मराठा समाजाची मागणी आहे की,जो पर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारची सरकारी नोकर भरती घेण्यात येवू नये.मराठा आरक्षणाला सर्वेच्य न्यायालयात स्थगिती दिली आहे. यांचे मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी उमटत आहे.
त्याचेभान महाविकास आघाडी सरकारने ठेवावे.मराठा समाजाचा भावनाचा आदर करावा.अश्या अडचणीच्या काळात शासनाने पोलीस भरतीचा निर्णय जाहीर करून मराठा समाजाला चेतावणी देण्याचे काम केले जाते आहे.महाराष्ट्रात पोलीस नोकर भरतीच्या व सरकाराच्या निर्णया विरोधात आहे.सरकाराला माहिती असून सुद्धा तुम्ही पोलिस नोकर भरती काढली हे पुर्णत चुकीचे आहे.
मराठा समाजाला एकटे पाडण्याचा हा महाविकास आघाडी सरकाराचा डाव आहे.सध्या मराठा समाजाची मनस्थिती बिघडले असे सरकारने चुकीचे निर्णय घेवू नये.कारण मराठा समाजाला कोणाचे हक्क हिरावून घेयाचे नाही.तशी इच्छा पण मराठा समाजाची नाही.
आम्हाला आमचा हक्क हवाय.आणि या लढ्यात सर्व जाती समूह मराठा समाजाच्या बरोबर आहेत.मराठा मोठा भाऊ अडचणीत असल्यामुळे सर्व बाराबलूतेदार आणि बहुजन समाज हा लहान भावाप्रमाणे मराठा समाजाच्या सोबत आहे.आणि राहणार आहे.जे आरक्षण मराठा समाजाला मिळाले होते.
त्या प्रमाणे विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेश देण्यात यावेत.आणि जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयातून आरक्षण कायम होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारची पोलीस नोकर भरती व कोणतीच भरती काढू नये.सध्याच्या परिस्थितीत नोकर भरती केलीतर त्याविरोधात मराठा समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.
महाराष्ट्रातील सामाजिक सौहार्द टिकवून ठेवण्याची सर्वस्वी जबाबदारी महाविकास आघाडी सरकाराची आहे. आपण समाजाची भावाना लक्षात घेवून योग्य निर्णय घ्यावा.जर महाविकास आघाडी सरकारने जाणीवपूर्वक मराठा समाजाच्या आरक्षणाला व समाजाच्या भावानाशी खेळलातर मग मराठा समाज कोणत्याही मंत्र्याला महाराष्ट्रात फिरू दिले जाणार नाही अशा इशारा देण्यात आला.
Solve the problem of Maratha community, otherwise cancel the recruitment; Demand of Shivswarajya Youth Organization
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज