मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा नगरपरिषदेची सर्वसाधरण सभा आज दुपारी १२ वाजता नगरपालिकेच्या सभागृहात बोलविण्यात आली असून सद्य परिस्थित सत्ताधा – यांमधील अंतर्गत धुसफूस पाहता ही बैठक वादळी होण्याची चिन्हे दिसत आहेत.
सभेत एकूण विविध चौवीस विषयांवर चर्चा होणार आहे.त्यात शहरात छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती अश्वारूड पूतळा बसविणे,संयुक्त समितीने मंजुर केलेल्या अकरा कामे हायमास्ट पोल , इलेक्ट्रीक पोल उभारणी , स्वच्छ सर्वेक्षण , कार्यालयीन इमारतीत सी.सी.टी.व्ही कॅमेरे वाढविणे, नागणेवाडी तलावाचे विद्युतीकरण , स्ट्रीट लाईट पोल , १३ नगरसेवकांनी नगराध्यक्षांना दिलेल्या पत्रातील कामे, नगरसेवक अनिल बोदाडे यांनी दिलेल्या पत्रातील कामे विषय महत्त्वाचे असून अनेक होणार विषयांवर मतभेद होण्याची शक्यता आहे.
नगरपालिका पक्षनेते पदी पांडुरंग नाईकवाडी यांची झालेली निवड , नगराध्यक्षा अरूणा माळी यांचे नगराध्यक्ष पद रद्द करण्याबाबत १८ पैकी ११ नगरसेवकांनी जिल्हाधिका – यांकडे केलेली तक्रार हे दोन कळीचे मुद्दे असून या अनुषंगानेच नगरसेवकांमधील मतभेद हे चव्हाट्यावर आले असून त्याचेच पडसाद या सभेत उमटणार असल्याची चर्चा होत आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज