मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
भीमा नदी पात्रात शेजारील आठ गावांना पुराचा फटका बसला असून नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करावेत अशा सूचना आ.भारत भालके यांनी प्रशासनाला दिल्या त्यांनी बुधवारी पूरग्रस्त भागाची पाहणी केली.
मंगळवेढा तालुक्यातील नदीकाठी असलेल्या उचेठाण,बठाण, तामदर्डी, राहटेवाडी, ब्रह्मपुरी, माचनूर, सिद्धापूर ,तांडोर, बोराळे, अरळी या नदीकाठी असलेल्या गावाला बुधवारी सकाळी आ भारत भालके यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देत पुराच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे करण्याच्या सूचना सोबत आलेल्या प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिल्या यामध्ये प्रामुख्याने नदीकाठी असलेल्या शेतकऱ्यांनी ऊस डाळिंब द्राक्षे केळी मका कडवळ या या पिकांचे उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अचानक आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. याबाबत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत अशा सूचना देण्यात आल्या याशिवाय तामदर्डी गावाला पुराच्या पाण्याने वेढा आणल्याने 96 कुटुंबे गावाबाहेर स्थलांतरित करावी लागणार आहे.
त्याशिवाय नागरिकांनी सतर्क राहून रात्री वाड्या-वस्त्यांवरील लोकांनी गावातील सुरक्षित ठिकाणी राहण्याबाबत नागरिकांबरोबर चर्चा केली अशातच तामदरडी ते बोराळे हा एकमेव रस्ता सुरू असून तो रस्ता कच्चा असल्याने वाहतूक अडचणीचे ठरत आहे. यावर जिल्हाधिकारी यांना दूरध्वनीवरून संपर्क साधत या ठिकाणी मुरूम टाकून वाहतुकीची व्यवस्था सुरळीत करण्याबाबत चर्चा केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ प्रांताधिकारी व तहसीलदार यांना मुरूम टाकून घेण्याची व्यवस्था करण्याबाबत सूचना दिली.
तामदर्डी गावासाठी होडी उपलब्ध करून देण्याबाबत भालके यांनी सूचना देत केरोसीन सह अन्नधान्याचा तुटवडा होऊ नये याकडे विशेष लक्ष देण्याबाबत सूचना दिल्या.
या पाहणी प्रसंगी प्रांताधिकारी उदयसिंह भोसले,तहसीलदार स्वप्नील रावडे ,गट विकास अधिकारी सुप्रिया पवार, उजनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता कोंडेकर ,महावितरणचे कार्यकारी अभियंता संजय शिंदे यांच्यासह तानाजी खरात,ईश्वर गडदे,विजय शिंदे,तानाजी पाटील,रमेश भांजे,रामचंद्र मळगे,बाबासाहेब पाटील, ज्ञानेश्वर पुजारी,संतोष सोनगे,दयानंद सोनगे,मारुती पवार ,महादेव फराटे,इराप्पा पुजारी आदींसह नागरिक उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज