mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

नऊ गुन्ह्यातील 18 तोळे दागिन्यांसह तिघांना अटक

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
नऊ गुन्ह्यातील 18 तोळे दागिन्यांसह तिघांना अटक

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-



पाटण तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील काही ठिकाणी घडलेल्या नऊ गुन्ह्यांमधील 18 तोळे सोन्याचे दागिने व दुचाकी असा सात लाख पन्‍नास हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत सराईत गुन्हेगारासह त्याच्या दोन सहकार्‍यांना ताब्यात घेण्यात पाटण पोलिसांना यश मिळाले आहे. अल्पावधीतच तपास करून मुद्देमालासह आरोपींना अटक करण्यात दाखवलेली तत्परता लक्षात घेऊन याबाबत संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना बक्षीस देण्याची शिफारस करण्यात आली आहे. दरम्यान, संशयितांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

यावेळी पाटणचे उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक थोरात, सहायक पोलिस निरीक्षक सौ. तृप्ती सोनवणे उपस्थित होत्या. धीरज पाटील म्हणाले, अटक केलेल्या संशयितांनी अशाप्रकारे नऊ ठिकाणी गुन्हे केले आहेत. त्यापैकी पाटण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन तसेच कराडमधील एक तर कोल्हापूर जिल्ह्यातील वडगाव, ता. हातकणंगले, वाठार ता. हातकणंगले, कोडोली, येळावे, अशा पाच व एकूण नऊ ठिकाणी हे सोन्याचे दागिने लंपास करण्याचे काम या आरोपीने केले होते. यापैकी पाटण तालुक्यातील एका गुन्ह्यातील दौलतनगर मरळी येथील वत्सलादेवी इंग्लिश मिडीयम स्कूलमधील पालक बैठकीसाठी फिर्यादींची मुलगी कु. रिद्धी वय वर्षे 13 हिचेसोबत परत जात असताना चोपदारवाडी गावाजवळून हा आरोपी एका दुचाकीवरून मागून येवून त्याने फिर्यादीच्या गळ्यातील तीन तोळे वजनाचे व एक तोळ्याचे मिनी गंठण दोन्ही मिळून सुमारे 61 हजार रूपयांचा ऐवज लंपास केला होता. त्यानंतर संबंधित फिर्यादीने दिलेल्या माहितीवरून व आरोपीच्या वर्णनानुसार पाटण पोलीसात गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर या वर्णनावरून आरोपीचा सीसीटिव्ही फुटेजद्वारे फोटो प्राप्त केला.

गोपनीय पद्धतीने आरोपीची दुचाकी व त्याचा शोध घेण्यात आला. त्यामध्ये तो आंबेघर ता. पाटण येथील जावई असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर हा सराईत गुन्हेगार लक्ष्मण चंद्रकांत चाळके (वय 28, रा. चांदोली वसाहत, आष्टा, ता. वाळवा, जिल्हा सांगली) हाच असल्याचे स्पष्ट झाले. संशयित आरोपीच्या घरी जाऊन तपास केला मात्र तो मिळून आला नाही. परंतु तो वापरत असलेली मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली. त्यानंतर वारंवार या आरोपीचा कसोशीने शोध घेतला असता तो सातत्याने आपली ठिकाणे बदलत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. पोलीस तपासात त्याने या गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार नऊ गुन्ह्यांमधील 18 तोळे सोन्याचे दागिने यात जप्त करण्यात आले. त्याला या चोरीत मदत करणार्‍या अजिंक्य विजय मळणगावकर रा. आष्टा ( सांगली ) याच्यासह अजून एक अशा एकूण तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना पाटण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post

हे अ‍ॅप डाऊनलोड केल्यास तुमचे बँक खाते होणार रिकामी, या बँकेने दिला इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कै.दत्ताजीराव भाकरे यांना आरोग्य सेवेतून आगळीवेगळी श्रद्धांजली; स्मृतीदिनानिमित्त आंधळगावात भव्य आरोग्य व रक्तदान शिबिर संपन्न

कै.दत्ताजीराव भाकरे यांना आरोग्य सेवेतून आगळीवेगळी श्रद्धांजली; स्मृतीदिनानिमित्त आंधळगावात भव्य आरोग्य व रक्तदान शिबिर संपन्न

March 24, 2026
विद्यार्थ्यांनो! मंगळवेढ्यात उद्यापासून “टॅली प्राईम जीएसटी”चे मोफत डेमो लेक्चर; सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचा उपक्रम

मंगळवेढ्यात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! ‘सारा कॉम्प्युटर’मध्ये CCC सह AI आणि कोडिंग कोर्सेसचे प्रवेश सुरू; आधुनिक काळाची गरज

March 24, 2026
नागरिकांनो लक्ष द्या! मंगळवेढ्यातील सर्व दवाखाने,क्लिनिक आज बंद राहणार

​जनसेवेतून आदरांजली! कै.दत्ताजीराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन; आज आंधळगावात नामवंत डॉक्टरांची टीम दाखल होणार

March 24, 2026
मंगळवेढ्यात विद्यार्थ्यांसाठी ‘सुवर्णसंधी’! एका कोर्सच्या फीमध्ये दुसरा कोर्स मोफत; ACTI कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटची ऑफर; महिला दिनानिमित्त मुलींना विशेष सवलत

​सावधान! फक्त सर्टिफिकेट महत्त्वाचे नाही, तर कौशल्य हवे; ACTI कॉम्प्यूटरचे विद्यार्थ्यांना थेट आवाहन

March 23, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांची फवारणी आता हायटेक! ड्रोन खरेदीसाठी मिळणार ‘इतके’ लाखांपर्यंत अनुदान; वेळेची आणि श्रमाची होणार बचत; असा घ्या लाभ

March 23, 2026
अभिमानास्पद लढा! मंगळवेढ्याचा महेंद्र गायकवाड ठरला महाराष्ट्र केसरीचा उपविजेता; मिळाली ‘ही’ बक्षिसे

महाराष्ट्र केसरी: महेंद्रची झुंज ठरली थरारक; मंगळवेढ्याचा ‘मान’ थोडक्यात हुकला; मैदानात काय घडलं?

March 23, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा