मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
दुधनी
दिनांक १६ जानेवारी २०२० : अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथे सिद्धरामेश्वर यात्रेतील होम प्रदीपन सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडला. सायंकाळी श्री मल्लिकार्जुन मंदिर येथे मानच्या 5 नंदी ध्वजाना व सिद्धेश्वर महाराजांची पालखीची वेदोक्त पद्धतीने यथावत पूजा करण्यात आली त्या नंतर त्या पाचही नंदी ध्वज पुढे ढोल ताशा, व फटाक्यांच्या आतश बाजी करत लक्ष्मी गल्ली, कुंभार गल्ली, विरक्त मठ, गांधी चौक मार्गे सिद्धेश्वर मंदिरा कडे मार्गस्थ झाले.
मल्लिकार्जुन मंदिरात पालखीचे पूजन सिद्धरामेश्वर यात्रा कमिटीचे चेअरमन चंद्रकांत येगदी, शिवानंद माड्याळ, गिरमल्लप्पा सावळगी आणि सर्व सदस्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्या नंतर सवाद्य मिरवणुकीला चालना देण्यात आली. मिरवणुकीच्या मार्गात कुंभार गल्ली येथील महिलांनी रस्त्यावर नदीध्वाज व पालखीच्या स्वागतासाठी रस्त्यावर रांगोळीच्या पायघडी घालुन दर्शन घेतले.
होम विधीसाठी लागणाऱ्या लाकडाच्या पाच मोळ्या मांतेश शिवशरणप्पा पाटील व गद्दी परिवार यांच्या कडून सवाद्य वाजत गाजत होम कट्याकडे आणण्यात आले. नंदी ध्वज व पालखी सिद्धेश्वर मंदिरात आल्या नंतर होम कट्ट्यावर मैंदर्गी विरक्त मठाचे म.नि.प्र. महांतेश्वर महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात होमविधी सुरुवात करण्यात आले.
होम विधीचे मानकरी असलेले वे.मु. ईराय्या पुराणिक व वे.मु. चन्नविरय्या पुराणीक यांनी होम विधीचा कार्यक्रम चालू केले. त्या नंतर गीरमल्लप्पा सावळगी, सिद्धाराम मल्लाड, हनुमंतराव पाटील, मल्लिनाथ पाटील, यांनी होम कुंडात उतरून होम विधीस प्रारंभ केला कुंभार कन्येचा प्रतिक म्हणून बाजरीचा पेंडीस हिरवा शालू नेसून मणी मंगळसूत्र, जोडवे, हार-दांडा आदी सौभाग्य अलंकार घालून सजविण्यात आले. पूजाविधी झाल्या नंतर रात्री ११.०० वाजता होम प्रदिपानाचा कार्यक्रम पार पडला.
या वेळी भक्तांनी एकच जय घोष केला कि, श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज कि जय, श्री मल्लिकार्जुन महाराज कि जय, श्री शांतलिंगेश्वर महाराज कि जय व हर बोला हर ह्या जय घोषाने संपूर्ण परिसर दणाणून सोडला. या वेळी भक्तांनी होम प्रदिपणासाठी आलेल्या भाविकांनी आणलेली फळे होम मध्ये टाकून दर्शनाचा लाभ घेतला. त्या नंतर एक मेकांना तीळगुळ देवून मकर संक्रातीच्या शुभेच्छा दिल्या.
होम प्रदीपन कार्यक्रमास पंचकमिटीच्या अध्यक्ष चंद्रकांत येगदी, दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सातलींगप्पा म्हेत्रे, तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष शंकर म्हेत्रे, मल्लिनाथ माशाळ, शंकर भांजी, गुरुषांतप्पा परमशेट्टी, शिवानंद माड्याळ, सुभाष परमशेट्टी, मलकाजप्पा अल्लापुर, निंगणा सोळशे, मडीवाळप्पा गुड्डोडगी, बसण्णा धल्लू, सिद्धराम येगदी, मल्लिनाथ येगदी, रामचंद्र गद्दी, अंबण्णा निंबाळ, नंदकिशोर सांगोळगी, शिवानंद फुलारी, मल्लय्या मठपती, महेश बाहेरमठ, कल्लया बाहेरमठ यांच्यासह यात्रा पंच कमिटीचे सर्व सदस्य विविध संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व ग्रामस्थ व हजारो भाविक होम प्रदीपनसाठी उपस्थित होते.
श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त निघणाऱ्या मानाच्या नंदिध्वजांच्या (काठ्यांच्या मिरवणुक) मिरवणूक मार्गावर एकता फ्रेंड्स ग्रुप आणि चौडेश्वरी मित्र मंडळाच्या ७० ते ८० युवकांनी रांगोळीच्या पायघड्या घालून स्वागत केले. या रांगोळीच्या माध्यमातून WE Support CAA & NRC, स्त्रीभ्रूण हत्या थांबवा, दारू पासून मुक्ती यासह विविध सामजिक संदेश देण्यात आले. मनमोहक रंगसंगती, संदेशांमुळे रस्ते देखणे झाले होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज