मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
बैलगाडीस जुंपलेल्या नवीन खोंडाने उडी मारल्याने बैलगाडी पलटी होऊन त्यामधील ऊसतोड कामगार ज्ञानेश्वर लक्षण सावंत (वय.५० रा.कागस्ट) यांच्या डोकीस मार लागल्याने गंभीर जखमी होऊन ते मयत झाले.
जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
या घटनेची पोलिसात आकस्मित मयत नोंद झाली आहे.
या घटनेची अधिक माहिती अशी की,यातील मयत ज्ञानेश्वर सावंत हे नवीन खोंडाला बैलगाडीला जुंपून शिकवीत असताना जगन्नाथ काकेकर यांच्या घराजवळ कॅनोलच्या बाजूस बैलाने उडी मारल्याने बैलगाडी पलटी होऊन ज्ञानेश्वर हे कॅनॉलच्या बाजूस दगडात पडून त्यांच्या डोकीस जबर दुखापत होऊन ते मयत झाले.
घटना दिनांक १७ रोजी सायंकाळी 6:30 च्या सुमारास मयताच्या घराजवळील कॅनॉलच्या बाजूस घडली असून याची खबर बापूसो काकेकर यांनी पोलिसात दिली आहे.
पोलिसांनी या घटनेचा व्हिसेरा राखून ठेवला आहे. अधिक तपास बोराळे बीटचे पोलीस हवालदार गायकवाड हे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज