mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर साडे चार लाख बालकांना उद्या पोलिओ डोस

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-


जिल्ह्यात रविवार दि. १९ जानेवारी रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम राबविण्याची झेडपी आरोग्य विभागाने तयारी केली असून, ४ लाख ५८ हजार बालकांना मात्रा देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत सन १९८६ पासून पल्स पोलिओ लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. १९८७ साली राज्यात ३ हजार १२७ रुग्ण होते

.१९९८ मध्ये १२१ तर १९९९ मध्ये १८ रुग्ण आढळले होते. मोहिमेनंतर रुग्णांची संख्या कमी होत गेली. देशातून पोलिओचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने ही मोहीम सुरू आहे.

सन २00९ मध्ये एकही रुग्ण आढळला नाही, मात्र सन २0१0 मध्ये पाच रुग्ण आढळले. त्यानंतर आजतागायत एकही रुग्ण आढळलेला नाही. इतर देशातून आलेल्यांमध्ये पोलिओ आढळण्याची शक्यता असल्याने दरवर्षी ही मोहीम कायम ठेवण्यात येत आहे. पाच वर्षांच्या आतील बालकास पूर्वीच्या लसीकरण स्थितीचा विचार न करता ही लस दिली जाणार आहे. रविवारच्या मोहिमेनंतर २१ ते २३ जानेवारी या तीन दिवसात घरोघरी जाऊन लस दिली जाणार आहे.

जिल्ह्यात शहर मिळून ४३ कोटी ६४ लाख इतकी लोकसंख्या असून, ० ते ५ वर्षे वयोगटातील ४ लाख ५८ हजार ४ बालके आहेत. शहर आणि ग्रामीण भागातील २ हजार ७७९ लसीकरण केंद्रावर अधिकारी व कर्मचाऱ्यांसह ८ हजार ३३३ लोकांचे पथक सज्ज आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकारी: १५३, आरोग्य पर्यवेक्षक: ११, आरोग्य सहायक: २६२, आरोग्य सेवक: ३०३, सेविका: ६५५, अंगणवाडी सेविका: ४ हजार १८६, आशा: २ हजार ७६३ असे कर्मचारी सहभागी होणार आहेत.

प्रवास करणाऱ्या बालकांना लस देण्यासाठी बस व रेल्वेस्थानक, मंदिर, वीटभट्टी, साखर कारखान्याच्या ठिकाणी विशेष पथके कार्यरत राहणार आहेत. शहरात महापालिका आरोग्य, तालुक्यात नगरपालिका, सार्वजनिक आरोग्य आणि ग्रामीण भागात जिल्हा परिषद आरोग्य विभागाची यंत्रणा कार्यरत राहणार आहे. या पत्रकार परिषदेला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जयमाला बेळे, रफिक शेख उपस्थित होते.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post

मंगळवेढ्यातील गौण खनिजाच्या अवैध उत्खनना कडे कानाडोला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! मंगळवेढ्यात सख्खा भाऊच बनला ‘यमदूत’; कुऱ्हाडीच्या एका वाराने होत्याचे नव्हते झाले; खुनामागचं खरं कारण वाचून अंगावर येईल काटा

April 11, 2026
एकाच छताखाली २५ स्टॉल्स, सेवांचा पाऊस; एकाच दिवशी तब्बल ‘इतके’ हजार लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले; पाटकळ महसूल विभागात विक्रमी कामकाज

एकाच छताखाली २५ स्टॉल्स, सेवांचा पाऊस; एकाच दिवशी तब्बल ‘इतके’ हजार लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले; पाटकळ महसूल विभागात विक्रमी कामकाज

April 11, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

कारागृहातील ‘यारी’ पडली भारी! मंगळवेढ्यात भरदिवसा निर्जन स्थळी थरार; ३ लाखांचे दागिने आणि रोकड लंपास; गुन्हेगारांचे धाडस वाढले

April 11, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

मोठी बातमी! माजी सरपंचाची टोकाच्या पाऊलाने जीवनयात्रा संपली; विकासाचा ‘बालेकिल्ला’ ढासळला; मंगळवेढा तालुक्यात खळबळ

April 10, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

मंगळवेढ्यात राजकीय धमाका! अनिल सावंतांचे ‘शिवबंधन’; कार्यकर्त्यांच्या अनेक वर्षांच्या इच्छेची पूर्ती होणार

April 10, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

पतीने केला क्रूरतेचा कळस! ​मुलगी दे, नाहीतर मारून टाकीन; पतीने माहेरी घुसून पत्नीला रक्ताळले; मंगळवेढ्यात थरार; पती, सासू अन् नणंदेचा निर्लयीपणा

April 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा