मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा तालुक्यातील उचेठाण येथील बापू हरिचंद्र लोखंडे (वय२५) याने अज्ञात कारणावरून घरातील लोखंडी वाशाला केबलच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
ही घटना शनिवारी घडली असून पोलिसात आकस्मात नोंद झाली आहे.
या घटनेची हकीकत अशी की यातील मयत बापू लोखंडे याने अज्ञात कारणावरून शनिवारी सूर्योदयापूर्वी दामाजी कारखाना चौकात असलेल्या पत्र्याच्या घरात लोखंडी वास्याला केबलच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची खबर हरिचंद्र लोखंडे यांनी दिल्यानंतर पोलिसांनी अकस्मात मयत अशी नोंद केली आहे.
पोलिसांनी शवविच्छेदन करून प्रेत राखून ठेवले आहे मृत्यु चे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल घोळसगावकर हे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज