मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
पंढरपूर- मंगळवेढा रस्त्यावर वृक्षारोपण केल्यानंतर संरक्षणासाठी असलेल्या 10 लोखंडी जाळ्या अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्या.
श्री विठ्ठल – रुक्मिणी मंदिर समितीच्या माध्यमातून पंढरपूर- मंगळवेढा रस्त्यावर वृक्षारोपण केले जात आहे. विविध प्रकारची झाडे लावून संरक्षणासाठी लोखंडी जाळ्या (ट्री गार्ड) लावल्या जात आहेत.
गोपाळपूर, अनवली, सिद्धेवाडी परिसरात लावलेल्या प्रत्येकी सुमारे 700 रुपये किमतीच्या 10 संरक्षक जाळ्या (ट्री गार्ड) अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्या.
याप्रकरणी मंदिर समितीचे कर्मचारी अरुण सलगर यांनी पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास पोलिस करत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज