mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

ठाकरे सरकार तरी देईल काय मंगळवेढ्याच्या दुष्काळी भागाला न्याय?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
ठाकरे सरकार तरी देईल काय मंगळवेढ्याच्या दुष्काळी भागाला न्याय?

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-



मंगळवेढा तालुक्याचा दुष्काळग्रस्त भागाच्या शेतीला पाणी मिळावे म्हणून इथला शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून टाहो फोडत आहे.  2014 साली आमदार भारत भालके यांनी प्रयत्नांची पराकाष्टा करून या दुष्काळग्रस्त भागासाठी वरदान ठरणाऱ्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला मंजुरी मिळवून घेतली. पण राज्यात त्याचवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप-सेनेचे सरकार निवडून आले. 

जाहिरातीसाठी संपर्क:7588214814



आ.भालके हे त्यावेळी काँग्रेस पक्षातून निवडून घेऊन आमदार झाले. त्यामुळे विरोधी पक्षाचा आमदार म्हणून तत्कालीन फडणवीस सरकारने या योजनेकडे डोळेझाक केली.

सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार केला. तसेच मंत्रिमंडळातील खात्यांचे वाटपही झाले आहे. आता ठाकरे सरकार कशाप्रकारे सर्व प्रश्नांना न्याय देईल याकडे सर्व जनसामान्यांच्या नजरा लागल्या आहेत. 

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे  लोकप्रतिनिधी आमदार भारत भालके यांच्याकडून मतदार संघातील मतदारांकडून जास्तच अपेक्षा राहणार आहेत. कारण त्यांनी आपल्या आमदारकीच्या गेल्या दोन टर्ममध्ये विरोधी पक्षाचा आमदार असूनही मतदारसंघातील अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी अतिशय प्रामाणिक व पोटतिडकीने प्रयत्न केला बर्‍यापैकी प्रश्न मार्गी लागण्याचेही दिसले आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी पक्ष महाविकास आघाडीत सहभागी झाला. 

सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे आमदार भालके हे पहिल्यांदाच सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून मतदारसंघाच्या विशेषत: मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळग्रस्त भागाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी आमदार भालके यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी चर्चा होती या चर्चा सुरू असताना मंत्रिमंडळ विस्ताराकडे आमदार भालके यांच्यापेक्षाही मंगळवेढ्याच्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांचे जास्त लक्ष होते. कारण आमदार भारत भालके यांना मंत्रिपद म्हणजे आपल्या शिवारात पाणी येण्याची हमी असेच जणू या भागातील शेतकर्‍यांना वाटत होते. तशा चर्चाही वारंवार होत होत्या. पण मंत्रिमंडळात स्थान मिळाले नसल्यामुळे या भागातील शेतकरी नाराज झाले. 

पण मंत्रीपद मिळाले नाही तरीही आपला लोकप्रतिनिधी आपल्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी तसेच न्याय मिळवून देण्यासाठी खंबीर आहे या जाणिवेनेच या भागातील मतदारांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचार काळात आ.भारत भालके यांनी मी सत्ताधारी पक्षाचा आमदार नसल्यामुळे पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी पाच वर्ष वाया गेल्याचे जाहीरपणे मान्य करूनही निवडणुकीत भरभरून मतदान केले. अगदी पहिल्या निवडणुकीपासून ते नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीपर्यंत या भागाने आमदार भारत भालके यांच्यावर भरभरून प्रेम केले. 

त्याबदल्यात आ. भालके यांनीही या भागांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. योगायोगाने मंत्रिमंडळ विस्तारात जलसंपदा खाते राष्ट्रवादीकडे आहे. तसेच या खात्याचे राज्यमंत्री ना. बच्चू कडू यांचाही आ.भालके यांच्याशी स्नेह आहे. त्यामुळे आ.भारत भालके यांचेकडे मंगळवेढा तालुक्याचा दुष्काळी भाग आशाळभूत नजरेने पाहत आहे. 

मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठी सन २०१४ मध्ये राज्यमंत्रिमंडळाने निर्णय घेऊन २ टीएमसी पाण्याच्या उपलब्धतेमधून २४ दुष्काळग्रस्त गावातील सुमारे ११८२० हे. क्षेत्राला पाणी देण्यासाठी सुमारे ५३०.०० कोटी किमतीच्या योजनेस प्रशासकीय मान्यता दिली. जून २०१८ मध्ये  राज्यमंत्रिमंडळाने यामध्ये  फक्त एक टीएमसी पाण्यामध्ये ५१८० हेक्टर क्षेत्राला पाणी देण्याचे प्रस्तावित केले आहे. त्यामुळे नेमके कोणत्या गावातील किती क्षेत्र कमी होणार याची संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. पण आ. भारत भालके यांनी या योजनेचे पाणी कमी न होता कोणत्याही गावावर अन्याय न होता योजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे वारंवार सांगितले आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Maharashtra MazaMangalWedha

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला झुंडची प्रेक्षकांना उत्सुकता

अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला झुंडची प्रेक्षकांना उत्सुकता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

काम कागदावर, पैसे खिशात! ‘या’ गावात बोगस बिले काढून लाखोंचा अपहार; मंगळवेढा BDO कडे तक्रार दाखल

August 27, 2026
मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यास राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

संतभूमी मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांची वज्रमूठ; पक्षभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन

August 27, 2026
सोलापूर ग्रामीणमध्ये आज 244 जण कोरोनामुक्त, 223 नवे रुग्ण; वीस वर्षीय तरुणीचा मृत्यू

मोठी बातमी! कोरोनानंतर आता पुन्हा एका आजाराने डोके काढले वर; रुग्णांची संख्या वाढतेय झपाट्याने, गेल्या 24 तासांत…

August 26, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

प्रधानमंत्री आवास योजनेतून बाद ठरलेल्या पात्र लाभार्थ्यांना मोठी संधी; ‘या’ तारखेपूर्वी हमीपत्र सादर करण्याचे सभापती दीपाली ताड यांचे आवाहन

August 26, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

सोलापूर जिल्ह्यातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक प्रौढ व्यक्तीसाठी कडक आचारसंहिता लागू; शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापकांना नोंदवही ठेवण्याचे आदेश

August 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

बाबो..! कुत्र्याने कोंबडी पळवल्यावरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी; चौघांवर गुन्हा; कोंबडीच्या मागे कुत्रे लागल्यावरून चौघांकडून मारहाण

August 25, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा