मंगळवेढा : समाधान फुगारे
प्रायमा पूर्व प्राथमिक विद्यालय (डिजिटल बालवाडी) च्या प्रांगणात ३० व्या वार्षिक स्नेहसंमेलन आणि मकर संक्रांतीचे औचित्य साधून माता पालक यांच्या करिता हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले.
जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
याच वेळी बालचमूंना देखील निमंत्रित करण्यात आले होते.
प्रायमामध्ये आयोजित केलेल्या हळदी कुंकू समारंभासोबतच सोलापूरी पावभाजी या अल्पोपहारची देखील सोय करण्यात आली होती. विशेष म्हणजे उपस्थित माता पालक आणि प्रायमामधील सर्वच बालचमूंनी पावभाजीचा मनसोक्त अस्वाद घेतला.
पालकांनी हळदी कुंकू सोबतच आयोजित केलेल्या पावभाजीच्या आयोजनाचे तोंडभरुन कौतुक केले. प्रायमा नेहमीच मुलां-मुलींच्या व पालकांच्याकरिता नवनवीन उपक्रम करित असते. या उपक्रमामुळे एक प्रकारे पालक मेळावा आणि गेटटुगेदर झाल्याचे पालकांनी समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमास मंगळवेढा शहर आणि तालुक्यातील प्रायमाच्या सर्वच बालचमू आणि माता पालक उपस्थिती होती.
प्रायमा स्नेहसंमेलनामध्ये फक्त मुलांना अल्पोपहार देण्याऐवजी मुलांसोबत माता पालकांना देखील हळदी कुंकूचे औचित्य साधत त्यांना देखील अल्पोपहार दिल्यामुळे मंगळवेढा शहर व तालुक्यातील प्रायमाच्या पालकांनी प्रायमातील संयोजक आणि शिक्षिका यांचे मनापासून कौतुक केले.
आमच्या प्रतिनिधीस प्रायमाचे संस्थापक अध्यक्ष नीलकंठ कुंभार म्हणाले, आपण नेहमीच स्नेहसंमेलनात मुलांनाच अल्पोपहार देत असतोच पण यावेळी माता पालकांना देखील अल्पोपहार देऊन पहावे असे वाटले म्हणून एक प्रयत्न करुन पाहिला आणि तो १०० टक्के यशस्वी झाला. विशेष म्हणजे मुलां-मुली सोबत पालकांनी देखील मनसोक्त अस्वाद घेतला त्यामुळे आमच्या संस्थेच्या संचालकांना, शिक्षिका व कर्मचारी वर्गांना देखील शाळेत एक वेगळाच उपक्रम झाल्याचा मनापासून आनंद झाला सर्वांनी समाधान व्यक्त केले.
प्रायमामधील हळदी कुंकू व अल्पोपहार कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या सचिवा वैशाली कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशालेच्या शिक्षिका सविता रत्नपारखी, लता कुलकर्णी, सारिका चव्हाण, अश्विनी टाकणे, पूजा ढोणे, सुनिता कुंभार, निता डोके, स्वाती माळी, गीता गुंगे, वैशाली खांडेकर, राधिका भगत, सुजाता मुदगूल, शिला पलंगे, सुजाता चिंचकर, गजानन कसगावडे यांनी परिश्रम घेतले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज