मंगळवेढा:समाधान फुगारे
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी तीन टप्प्यात केली जाणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अचूक अपलोड करण्याचे काम मिशन मोडवर करावे, असे निर्देश सहकार विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला यांनी दिले.
जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे योजना अंमलबजावणी प्रशिक्षणात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी व बॅंक अधिकारी यावेळी उपस्थित होते.
योजनेच्या संस्करण व प्रकियेसाठी माहिती आणि तंत्रज्ञान विभागाद्वारे 1 फेब्रुवारीपासून मध्यवर्ती पोर्टल कार्यान्वित होईल. बॅंकांनी त्यात शेतकऱ्यांची आधार संलग्न माहिती 15 फेब्रुवारीपर्यंत अपलोड करावी. अपलोड केलेल्या माहितीला पोर्टलद्वारे निकष लावून पात्र कर्ज खात्यांना विशिष्ट क्रमांक दिला जाईल.
उर्वरित आधार संलग्न कर्ज खात्यांची माहिती 16 फेब्रुवारी ते 5 मार्च तसेच 6 मार्च ते 25 मार्च या कालावधीत तीन टप्प्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. बॅंकांनी मार्गदर्शक सूचनेनुसार योग्य कार्यपद्धती अवलंबून काळजीपूर्वक माहिती अपलोड करण्याचे काम करावे, असेही निर्देश श्रीमती शुक्ला यांनी दिले.
प्रक्रिया होणार तीन टप्प्यांत
बॅंक अधिकाऱ्यांनी 28 रकान्यांच्या प्रपत्रात शेतकऱ्यांची माहिती काळजीपूर्वक अचूक भरावी. एकदा पोर्टलवर माहिती अपलोड झाल्यावर त्यामध्ये बदल करण्याचे अधिकार फक्त जिल्हाधिकाऱ्यांनाच देण्यात आलेले आहेत. या योजनेच्या अंमलबजाणीतून थकीत कर्ज वसूल होणार असल्याने बॅंकांनी शेतकऱ्यांचे आधार क्रमांक व बॅंक खात्याचा तपशील आदी माहिती अचूकपणे पोर्टलवर नोंदवावी.
शेतकऱ्यांनी त्यांचा आधार क्रमांक बॅंकेच्या, विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या कर्जखात्याशी संलग्न करावा, बॅंकांनी योजनेसाठी जिल्हास्तरीय नोडल अधिकारी नेमावे, ज्यांचे आधार क्रमांक कर्जखात्याला संलग्न नाहीत त्यांना भ्रमणध्वनीवर संदेश पाठवावा.
पुढच्या खरीप हंगामापूर्वी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी नवीन कर्जासाठी पात्र होईल, यादृष्टीने योजनांचे कार्यान्वयन योग्य पद्धतीने 1 एप्रिल पूर्वी होईल याची खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या. उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची मार्गदर्शक पुस्तिका वितरित करण्यात आली तसेच योजनेची माहिती देणारी चित्रफीत दाखविण्यात आली.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज