मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी इरफान शेख (वय 21) याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश यु.ल. जोशी यांनी 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.11 सप्टेंबर रोजी शाळेला सुट्टी असल्याने एक अल्पवयीन मुलगा हा शाळेच्या मैदानावर पतंग उडविण्यासाठी गेला होता.
जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
त्याच्याबरोबर त्याचे 5 मित्रसुद्धा होते. तो मुलगा सायंकाळपर्यंत घरी न आल्याने त्याच्या वडिलांनी त्याला सर्वत्र शोधले आणि नंतर शाळेत गेले असता तो अल्पवयीन मुलगा हा त्याच्या मित्रांबरोबर बसला होता. वडिलांना पाहताच तो घाबरलेल्या अवस्थेत दिसून आला.
तेव्हा वडिलांनी त्याला विश्वासात घेऊन काय झाले असे विचारले असता पतंगाचा मांजा देतो म्हणून 10 रुपयांची नोट दाखवून इरफान शेख याने अनैसर्गिक अत्याचार केल्याचे सांगितले.
त्यानंतर आरोपी इरफान शेख याच्याविरूद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी तपास करून कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. हा खटला अतिरिक्त सत्र न्यायाधीश जोशी यांच्या कोर्टात चालला. यावेळी सरकारच्या वतीने 7 साक्षीदार तपासण्यात आले.
न्यायाधीशांनी दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून आरोपी इरफान शेख याला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली तसेच न्यायाधीशांनी सरकारच्या ‘मनोधैर्य’ योजनेतून पीडिताला 20 हजार रुपये देण्याचा आदेश दिला.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज