
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
अक्षरगंध साहित्य मंचच्या मंगळवेढा शाखाध्यक्षपदी ब्रह्मपुरी येथील कवी व पत्रकार प्रमोद बिनवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांची ही नियुक्ती जिल्हाध्यक्ष निलकंठ कुंभार यांनी केली असून अक्षरगंधचे संस्थापक दिगंबर भगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
प्रमोद बिनवडे हे मंगळवेढा तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष असून अक्षरगंधचे सक्रिय सदस्य आहेत. विविध वृत्तपत्रांमध्ये त्यांच्या अनेक कविता प्रसिद्ध झाल्या असून त्यांना यापुर्वी अनेक पुरस्कारानी गौरविण्यात आले आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












