मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
अल्पवयीन पुतणीला घरी नेऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या काकाला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. खटल्यादरम्यान पीडित मुलगी फितूर झाली होती. मात्र परिस्थितिजन्य पुराव्याचा आधारे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. व्ही. रोटे ही शिक्षा सुनावली.
या प्रकरणी पाच वर्षीय पीडित मुलीच्या आईने पौड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. ही घटना 13 ऑगस्ट 2013 रोजी पौडमधील मुगाव परिसरात घडली होती. संबंधित मुलगी आपल्या आई-वडील आणि दोन भावासोबत राहत. मुलीचे आई-वडील मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात.
घटनेच्या दिवशी तिच्या आईने मुलीला त्याच गावात राहणाऱ्या तिच्या आजीकडे सोडले व त्यानंतर त्या कामाला गेल्या होत्या.
या खटल्याचे कामकाज अतिरिक्त सरकारी वकील सुनील हांडे आणि ऍड. जावेद खान यांनी पाहिले. न्यायालयाने एकूण 10 साक्षीदार तपासले. जन्मठेपेबरोबर आरोपीला 10 हजार रुपयांची दंड सुनावण्यात आला आहे. ही रक्कम पीडित मुलीला नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावे, असे आदेशात नमूद केले आहे.
साक्षीदरम्यान पीडित मुलगी फितूर झाली होती. मात्र न्यायालयाने परिस्थितीजन्य पुरावा, मुलीच्या अंगावरील व कपड्यावरील रक्त. त्याच बरोबर आजीने आरोपीला मुलीला घेऊन जाताना पाहिले होते. या पुराव्याचा आधार घेत न्यायालयाने घेतला. आरोपीला त्याचा अंगावरील रक्ताबाबात योग्य खुलासा करता आला नाही.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज