मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) 2020-21 शैक्षणीक वर्षातील विविध अभ्यासक्रमांच्या घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये तंत्रशिक्षण, उच्च शिक्षण, वैद्यकीय आणि ललील कला आर्ट या अभ्यासक्रमांच्या 18 परीक्षांचा समावेश आहे.
जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
तंत्रशिक्षण विभागात अभियांत्रीकी/ तंत्रज्ञान (बीई/बीटेक), औषधनिर्माण, कृषी संबंधीत अभ्यासक्रम, दुग्धशाळा तंत्रज्ञान, मास्यविज्ञान या पदवी अभ्यासक्रमांची परीक्षा 13 एप्रिल ते 17 एप्रिल आणि 20 एप्रिल ते 23 एप्रिल 2020 या कालावधीत होणार आहे. “एमबीए’ आणि “एमएमएस’ पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 14 आणि 15 मार्च 2020, मास्टर इन कॉम्पीटर अप्लीकेशन (एमसीए) 28 मार्च, मास्ट इन अर्कीटेक्टर 10 मे, हॉटेल मॅनेजमेंट (पदवी) 10 मे, हॉटेल मॅनेजमेंटची (पदव्युत्तर) प्रवेश परीक्षा 16 मे रोजी होणार आहे.
उच्च शिक्षण विभागातअंतर्गत एलएलबी (पदवी – 5 वर्ष) प्रवेश परीक्षा 12 एप्रिल, एलएलबी (पदवी 3 वर्ष) 28 जून, शारिरीक शिक्षण (बी.पी.एड पदवी) 11 मे आणि मैदानावरील चाचणी 12 मे आणि 13 मे, बीएड आणि एमएड (इनटीग्रेटेड 3 वर्ष) 12 मे, शारिरीक शिक्षण (एमएड पदव्युत्तर) 14 मे आणि मैदानावरील चाचणी 15 आणि 16 मे, बीए/बीएससी बीएड (इनटीग्रटेड 4 वर्ष) 20 मे, मास्टर इन एज्युकेशन (एमएड) 26 मे, बॅचलर ऑफ एज्युकेशन (जनरल अँड स्पेशल) 13 जून आणि 14 जून.
वैद्यकीय शिक्षण मध्ये मास्टर ऑफ फिजीओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, ऑडीओ स्पीच लॅंगवेज पॉथोलॉजी, प्रोस्थेटीक्स अँड ऑथ्रोटीक्स जुलै-ऑगस्ट 2020. ललील कला (फाईन आर्ट) पदवी अभ्यासक्रमासाठी 10 मे (प्रॅक्टीकल) आणि 11 मे रोजी (ऑनलाईन) परीक्षा होणार आहे.
“सीईटी’ सेलतर्फे या प्रवेश परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आणि परीक्षेसंदर्भातील सूचना, माहिती पुस्तीका, प्रवेश अर्ज, प्रवेश नियम, शासन निर्णय ही माहिती www.mahacet.org या संकेतस्थळावरही प्रसिद्ध करण्यात आली आहे, असे आयुक्त संदीप कदम यांनी सांगितले आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज