मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
तुला नीटनेटके राहता येत नाही, तुला चांगलं वळण नाही,गाडी घेण्यासाठी वडिलांकडून तीन लाख रुपये घेऊन ये असे म्हणत विवाहितेला मानसिक व शारीरिक त्रास देत छळ केल्याप्रकरणी पती , सासू , सासरा यांच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी ,अडीच वर्षांपूर्वी लग्न झाल्यानंतर ते २४ जानेवारी पर्यंत फिर्यादी प्राजक्ता प्रसाद खडतरे यांना पती प्रसाद दादा खडतरे, सासू अनुराधा दादा खडतरे ,सासरा दादा बापू खडतरे हे किरकोळ कारणावरून त्रास देत होते . तुला नीटनेटके राहता येत नाही , तुला काम येत नाही , तुला चांगलं वळण नाही , तू पांढऱ्या पायाची आहेस , अडीच वर्षे झाले तुला मूल होत नाही.
तुझ्या वडिलांकडून गाडी घेण्यासाठी तीन लाख रुपये घेऊन ये असे म्हणत वारंवार त्रास देत होते . पती , सासू , सासरा यांनी अपमानास्पद मिळालेली वागणूक देत उपाशी पोटी ठेवून मानसिक व शारीरिक त्रास देत शिवीगाळ , दमदाटी करून मारहाण केली अशी फिर्याद प्राजक्ता प्रसाद खडतरे यांनी सांगोला पोलीस ठाण्यात दिली आहे . अधिक तपास पोना गवळी करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज